Vivoiaomi - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 17 Dec 2019 15:14:22 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Realme ने पहिल्या वर्षात विकले 150 लाख स्मार्टफोन, पुढच्या वर्षाचे ध्येय 300 लाख https://www.91mobiles.com/marathi/realme-sold-15-million-smartphone-in-first-year-of-operation-india-to-double-sales-in-2020/ https://www.91mobiles.com/marathi/realme-sold-15-million-smartphone-in-first-year-of-operation-india-to-double-sales-in-2020/#respond Tue, 17 Dec 2019 15:14:22 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6064 Realme ने आपल्या फेस्टिवल सेल मध्ये एका महिन्यात 5.2 मिलियन म्हणजे 52 लाख स्मार्टफोन यूनिट विकले होते.

The post Realme ने पहिल्या वर्षात विकले 150 लाख स्मार्टफोन, पुढच्या वर्षाचे ध्येय 300 लाख first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme X2 भारतीय बाजारात आला आहे. या फोन मुळे रियलमी इंडियन मार्केट मधील एकमेव असा स्मार्टफोन ब्रँड बनला आहे ज्याचे सर्वात जास्त 64 मेगापिक्सल कॅमेरा असेल स्मार्टफोन्स आहेत. Realme ने कमी काळात भारतीय मोबाईल बाजारातील एका मोठ्या हिस्स्यावर कब्जा केला आहे. Realme फॅन फॉलोइंग सतत वाढत आहे आणि तेवढ्याच वेगाने कंपनी प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या पुढे जात आहे. अनेक नवीन रेकॉर्ड करत Realme ने अजून एक धक्कादायक घोषणा केली आहे कि आपल्या पहिल्या वर्षातच या ब्रँडने भारतात 15 मिलियन म्हणजे 150 लाख स्मार्टफोन विकले आहेत.

Realme संबंधित हि मोठी बातमी स्वतः ब्रँडचे सीईओ माधव सेठ यांनी सांगितली आहे. न्यूज एजेंसी पीटीआई कडून समोर आलेल्या माहिती नुसार Realme ने भारतात आपल्या पहिल्या वर्षात 15,000,000 स्मार्टफोन यूनिट विकले आहेत. 150 लाख या आकड्याला स्पर्श करत असताना माधव सेठ म्हणाले कि पहिल्या वर्षात मिळालेली हि उपलब्धी त्यांना अजून मोठी करायची आहे तसेच त्यांनी ध्येय ठरवले आहे कि साल 2020 मध्ये संख्या वाढवून दुप्पट व्हावी. विशेष म्हणजे मे 2018 मध्ये Realme ने भारतात आपले स्मार्टफोन विकायला सुरवात केली होती.

सर्वात वेगवान ब्रँड

Realme ने मे 2018 मध्ये आपल्या सुरवातीनंतर एक वर्षात 15 मिलियन स्मार्टफोन विकले आहेत. या आकड्यांसह Realme इंडियन मार्केट मध्ये सर्वात वेगाने वाढणाऱ्या ब्रँड्स पैकी एक बनला आहे. कंपनीचे ध्येय दुसऱ्या वर्षात हि संख्या दुप्पट म्हणजे 300 लाख करायची आहे. अलीकडे आईडीसीने शेयरकेलेल्या एका रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि Realme ने भारतीय मोबाईल बाजारात 14.3 टक्के मार्केट शेयर वर कब्जा केला आहे ज्यामुळे हा देशातील चौथा सर्वात मोठा स्मार्टफोन ब्रँड बनला आहे.

Xiaomi – Samsung ला टक्कर

Realme च आहे वेग सर्वात जास्त टक्कर Xiaomi आणि Samsung ला देत आहे. आईडीसी च्या रिपोर्ट तिसऱ्या तिमाहीचा होता ज्यात Xiaomi चा मार्केट शेयर सर्वात जास्त 27.1 टक्के होता तसेच 18.9 टक्के मार्केट शेयर सह Samsung दुसऱ्या नंबर वर होती. एका वर्षातच 14 टक्के पेक्षा पण जास्त हिस्सेदारी मिळवणारी Realme मुळे शाओमीच्या जागेला आणि सॅमसंगच्या साम्राज्याला खतरा वाटत आहे. तसेच या लिस्ट मध्ये 15.2 टक्के मार्केट शेयर सह Vivo तिसऱ्या स्थानी होती.

दिवाळीत विकले 52 लाख स्मार्टफोन

Realme ने आपल्या फेस्टिवल सेल मध्ये एका महिन्यात 5.2 मिलियन म्हणजे 52 लाख स्मार्टफोन यूनिट विकले होते. कंपनीनुसार 30 सप्टेंबर पासून 31 ऑक्टोबर पर्यंत वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म व रिटेल स्टोर्स वर आयोजित फेस्टिवल सेल मध्ये Realme चे 5.2 मिलियन पेक्षा पण जास्त स्मार्टफोन विकले आहेत. फक्त एका महिन्यातच 52 लाख स्मार्टफोन विकून Realme ने नवीन रेकॉर्ड बनवला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत Realme ने 160 टक्के वाढ नोंदवली आहे.

जगातील 7वा स्मार्टफोन ब्रँड

Realme गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 808 टक्क्यांची वाढ नोंदवून जगातील 7वा सर्वात मोठा स्मार्टफोन ब्रँड पण बनली आहे. गेल्या वर्षी Realme जगभरात 47व्या स्थानी होती. तर यावर्षी दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत तिसऱ्या तिमाहीत Realme ने थेट 3 टक्क्यांवरून 18 टक्क्यांची वाढ केली आहे. एका रिपोर्ट मध्ये खुलासा झाला होता कि Realme ने गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 6 पट जास्त वेगाने आपला विस्तार केला आहे. साल 2019 च्या तिसऱ्या तिमाहीत Realme ने ग्लोबल मार्केट मध्ये 10 मिलियन म्हणजे 1 कोटी स्मार्टफोन्सची शिपमेंट केली होती.

लवकरच येईल Realme ची ऑफलाईन सीरीज

माधव सेठ यांनी पण कंफर्म कर केले आहे कि कंपनी लवकरच भारतात आपली ऑफलाईन एक्सक्लूसिव स्मार्टफोन सीरीज आणणार आहे. हि स्मार्टफोन सीरीज फक्त ऑफलाईन प्लॅटफॉर्म वर लॉन्च होईल आणि या सीरीज अंतर्गत लॉन्च होने वाले स्मार्टफोन फक्त रिटेल स्टोर्स वरच सेल साठी उपलब्ध होईल. माधव सेठ यांनी सांगितले कि नवीन वर्ष सुरु होण्याआधी म्हणजे डिसेंबर महिन्याच्या शेवटी Realme अधिकृतपणे या सीरीजचे नाव सांगेल. या सीरीजचे फोन मीड प्रीमियम रेंजचे असतील.

The post Realme ने पहिल्या वर्षात विकले 150 लाख स्मार्टफोन, पुढच्या वर्षाचे ध्येय 300 लाख first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-sold-15-million-smartphone-in-first-year-of-operation-india-to-double-sales-in-2020/feed/ 0