VivoVivo APEX - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 24 Jan 2019 13:21:00 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 12जीबी रॅम सह सादर झाला वीवोचा अपेक्स 2019, हा फोन आहे पूर्णपणे बटण आणि होल लेस https://www.91mobiles.com/marathi/vivo-apex-2019-official-12gb-ram-full-screen-fingerprint-sensor-button-less-design-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-apex-2019-official-12gb-ram-full-screen-fingerprint-sensor-button-less-design-in-marathi/#respond Thu, 24 Jan 2019 13:21:00 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3446 निश्चितच हा वीवोचा आतापर्यंत लॉन्च झालेल्या सर्व स्मार्टफोन्स पेक्षा वेगळा आणि शानदार आहे.

The post 12जीबी रॅम सह सादर झाला वीवोचा अपेक्स 2019, हा फोन आहे पूर्णपणे बटण आणि होल लेस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
वीवो ने काही दिवसांपूर्वी सांगितले होते कि कंपनी फेब्रुवारी मध्ये नवीन स्मार्टफोन सादर करणार आहे जो फक्त डिजाईन व लुक मध्ये खूप खास व अनोखा नसेल तर सोबतच या फोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पण याला इतरांपेक्षा वेगळा आणि दमदार ठरवतील. जेव्हा पासून घोषणा झाली आहे कि वीवो अपेक्स 2019 स्मार्टफोन आणणार आहे तेव्हापासून समोरून टेक विश्व् व स्मार्टफोन यूजर्स या फोनची वाट बघत आहेत. पण आज सर्व टेक प्रेमींची प्रतीक्षा संपवत वीवो ने अपेक्स 2019 सादर केला आहे. निश्चितच हा वीवोचा आतापर्यंत लॉन्च झालेल्या सर्व स्मार्टफोन्स पेक्षा वेगळा आणि शानदार आहे.

वीवो ने अपेक्स 2019 कालच लॉन्च झालेल्या मीजू जीरो प्रमाणे सुपर यूनिबॉडी डिजाईन वर बनेलला आहे. या फोन मध्ये एकही फिजिकल बटण देण्यात आलेले नाही किंवा या फोन मध्ये कोणताही स्लॉट व होल नाही. म्हणजे अपेक्स 2019 मध्ये सिर्म कार्ड स्लॉट देण्यात आलेला नाही किंवा कोणताही यूएसबी पोर्ट नाही. तसेच कंपनी ने या फोन मध्ये ऑडियो जॅक व स्पीकर ​ग्रिल पण देण्यात आलेले नाही. वीवो अपेक्स 2019 मधून पावर बटण तसेच वाल्यूम रॉकर बटण पण गायब आहे. या फोन मध्ये कोणताही हार्डवेयर बटण पण देण्यात आलेले नाही.

अपेक्स 2019 जगातील पहिला फोन बनला आहे ज्यात फुल ​स्क्रीन फिंगरप्रिंट रेक्ग्नेशन आहे. म्हणजे या फोनच्या संपूर्ण डिस्प्ले वर कुठेही फिंगर टच केल्यास हा अनलॉक होईल. साधारणतः फोन डिस्प्ले वर खालच्या बाजूलाच हा सेंसर असतो. पण वीवो अपेक्स 2019 चा संपूर्ण डिस्प्लेच या सेंसर ने बनला आहे. कुठेही टच करा, हा फोन यूजरचे फिंरगप्रिंट रीड करेल आणि फोन अनलॉक होईल. वीवो अपेक्स 2019 वॉटर व डस्ट प्रूफ आहे.

फोन पूर्णपणे ग्लॉस वर बनला आहे जी दोन्ही बाजूला कर्व्ड आहे. मजबूती देण्यासाठी ​अपेक्स 2019 ला स्क्रीन लेयरने प्रोटेक्ट केले गेले आहे. या फोन ई-सिम सपोर्ट आहे म्हणजे सिम एकदा एक्टिव केल्यास ते मोबाईल मध्ये टाकण्याची गरज नाही. फोन आपोआप सिम नेटवर्क वर चालेल. वीवो ने आपला हा फोन ​स्क्रीन साउंड टेक्नॉंलॉजीने सुसज्ज केला आहे. या फोनचा डिस्प्लेचा ध्वनी निर्मिती करतो. फोन मध्ये स्पीकरची गरजच नाही.

स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर अपेक्स 2019 वीवो द्वारा 12जीबी च्या पावरफुल रॅम सह सादर केला गेला आहे तसेच हा फोन 512जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. प्रोसेसिंग बद्दल बोलायचे तर कपंनी ने अपेक्स 2019 क्वालकॉमच्या सर्वात नवीन आणि ताकदवान चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 ने सुसज्ज केला आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये पॉप-अप कॅमेरा आहे. हा कॅमेरा सेल्फीची कमांड देताच फोन बॉडीच्या बाहेर येतो.

वीवो अपेक्स 2019 वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो. कंपनीने हा फोन मीका व्हाईट, टायटेनियम सिल्वर आणि स्ट्रोनियम लाइम कलर मध्ये सादर केला आहे.

The post 12जीबी रॅम सह सादर झाला वीवोचा अपेक्स 2019, हा फोन आहे पूर्णपणे बटण आणि होल लेस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-apex-2019-official-12gb-ram-full-screen-fingerprint-sensor-button-less-design-in-marathi/feed/ 0