VOOC 4.0 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 19 Sep 2019 13:18:15 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 OPPO K5 होने वाला आहे लॉन्च, VOOC 4.0 टेक्नॉलॉजी सह Redmi K20 Proला देईल टक्कर https://www.91mobiles.com/marathi/oppo-k5-vooc-4-0-fast-charging-technology-to-launch-soon-with-reno-ace-65w-supervooc-30w-wireless-flash-charge/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-k5-vooc-4-0-fast-charging-technology-to-launch-soon-with-reno-ace-65w-supervooc-30w-wireless-flash-charge/#respond Wed, 18 Sep 2019 13:47:56 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5351 Oppo Reno Ace जगातील सर्वात वेगवान चार्जिंग असलेला स्मार्टफोन असेल.

The post OPPO K5 होने वाला आहे लॉन्च, VOOC 4.0 टेक्नॉलॉजी सह Redmi K20 Proला देईल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने काल शक्तिप्रदर्शन करत टेक मंचावर एक साथ तीन नवीन टेक्नोलॉजी सादर केल्या आहेत. कंपनीने 65W SuperVOOC 2.0 टेक्नॉलॉजी , 30W Wireless VOOC Flash Charge टेक्नॉलॉजी आणि VOOC Flash Charge 4.0 टेक्नॉलॉजी ऑफिशियली लॉन्च केल्या आहेत. OPPO ने आधीपण सांगितले आहे कि 65W SuperVOOC 2.0 सर्वात आधी Reno Ace स्मार्टफोन मध्ये येईल. आता कंपनीने अशी घोषणा पण केली आहे कि VOOC 4.0 टेक्नॉलॉजी ओपो के सीरीजच्या आगामी स्मार्टफोन OPPO K5 सह बाजारात येईल.

OPPO K5 च्या नावाचा खुलासा करत कंपनीने ईशारा केला आहे कि हा स्मार्टफोन लवकरच टेक मंचावर येईल. विशेषे म्हणजे OPPO K5 कंपनीच्या के सीरीज मधील OPPO K3 स्मार्टफोनचा प्रगत वर्जन असेल. कंपनीने OPPO K5 स्मार्टफोनच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची जास्त माहिती दिली नाही पण हे निश्चित झाले आहे कि OPPO K5 स्मार्टफोन VOOC 4.0 फास्ट चार्ज टेक्नॉलॉजी सह बाजारात येईल.

फोन मधील VOOC 4.0 टेक्नॉलॉजी पाहता हि टेक्नॉलॉजी 30वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. विशेष म्हणजे भारतात Xiaomi चा हाईएंड स्मार्टफोन Redmi K20 Pro 27वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. VOOC 4.0 बद्दल OPPO ने सांगितले कि या टेक्नॉलॉजीमुळे 4,000एमएएच बॅटरी असलेला स्मार्टफोन फक्त 30 मिनिटांत 67 टक्क्यांपर्यंत चार्ज करता येईल. तसेच 73 मिनिटांत हि बॅटरी फुल 100 टक्के चार्ज होईल.

OPPO ने VOOC 4.0 हि टेक्नॉलॉजी आधीच्या वर्जन म्हणजे VOOC 3.0 पेक्षा 12 टक्के वेगवान असल्याचे सांगितले आहे. तसेच VOOC 4.0 टेक्नॉलॉजी सह चार्जिंग चालू असताना फोनची बॅटरी आणि तापमान पण संतुलित केले जाईल. ओपोचे स्टेटमेंट पाहता असे बोलले जात आहे कि OPPO K5 मध्ये 4,000एमएएच पेक्षा जास्त पावर असेलेली बॅटरी मिळेल.

OPPO Reno Ace

कंपनीच्या वाइस प्रेजिडेंटने Oppo Reno Ace स्मार्टफोनच्या नावाचा खुलासा करत असे सांगितले आहे कि पुढल्या महिन्यात हा फोन मास प्रोडक्शन साठी जाईल. पण या फोनचे स्पेसिफिकेशन्स कसे असतील हि माहिती अजूनह गुप्त ठेवण्यात आली आहे. हे निश्चित झाले आहे कि Oppo Reno Ace कंपनी 65W SuperVOOC fast charging technology सह लॉन्च होईल. Oppo Reno Ace जगातील सर्वात वेगवान चार्जिंग असलेला स्मार्टफोन असेल.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी ब्रायन यांनी एक फोनचा फोटो पण शेयर केला होता जो आता Oppo Reno Ace असल्याचे बोलले जात आहे. फोटो मध्ये फोन कर्व्ड बेजल लेस डिस्प्ले सह दिसला होता ज्यात स्क्रीनच्या दोन्ही बाजूला बॉडी पार्ट नव्हता आणि डिस्प्ले बॅक पॅनलकडे कर्व्ड होता. या फोटो मध्ये डिस्प्लेचा वरचा आणि खालचा भाग पण अल्ट्रा स्लीम दाखवण्यात आला होता. फोनच्या फ्रंट पॅनल वर कोणतेही सेंसर, बटण व नॉच नाही.

Oppo Reno Ace बद्दल बोलले जात आहे कि हा फोन एक प्रीमियम डिवाईस आले जो फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये लॉन्च केला जाईल. या फोन मध्ये 90हर्ट्ज रिफ्रेश रेट वाली डिस्प्ले दिला जाऊ शकतो. तसेच चर्चा अशी आहे कि Oppo Reno Ace क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 855+ चिपसेट वर लॉन्च केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन येत्या 10 ऑक्टोबरला टेक मंचावर येईल.

The post OPPO K5 होने वाला आहे लॉन्च, VOOC 4.0 टेक्नॉलॉजी सह Redmi K20 Proला देईल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-k5-vooc-4-0-fast-charging-technology-to-launch-soon-with-reno-ace-65w-supervooc-30w-wireless-flash-charge/feed/ 0