VoWi-Fi - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 10 Dec 2019 11:46:48 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Jio च्या आधी Airtel ने सुरु केली VoWi-Fi कॉलिंग सर्विस, नेटवर्क सिग्नलविना करता येईल कॉल https://www.91mobiles.com/marathi/airtel-vowi-fi-calling-launched-with-support-for-24-smartphones-know-what-is-vowifi-service-and-how-to-use/ https://www.91mobiles.com/marathi/airtel-vowi-fi-calling-launched-with-support-for-24-smartphones-know-what-is-vowifi-service-and-how-to-use/#respond Tue, 10 Dec 2019 11:46:48 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6018 या टेक्नॉलॉजीमुळे कमकुवत सिग्नल असल्यास पण चांगल्या कॉलिंगची मजा घेता येईल आणि इंडोर किंवा अंडरग्राउंड व बेसमेंट मध्ये पण चांगली कनेक्टिविटी मिळेल.

The post Jio च्या आधी Airtel ने सुरु केली VoWi-Fi कॉलिंग सर्विस, नेटवर्क सिग्नलविना करता येईल कॉल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेलीकॉम सेक्टर मध्ये क्रांती करत भारती एयरटेलने आपली VoWi-Fi किंवा वॉइस ओवर वाई-फाई सर्विस दिल्ली एनसीआर सर्कल मध्ये अधिकृपणे सादर केली आहे. काही महिन्यांपूर्वी रिपोर्ट समोर आला होता, ज्यात सांगण्यात आले होते कि बीएसएनएल आणि जियो या सर्विसची टेस्टिंग करत आहेत. तर आता एयरटेलने एक पाऊल पुढे टाकत हि सर्विस एका सर्कल मध्ये लॉन्च केली आहे आणि लवकरच हि इतर यूजर्स साठी पण सादर केली जाईल.

एयरटेल VoWi-Fi सर्विसला कंपनीने Airtel Wi-Fi कॉलिंगचे नाव दिले आहे. हि सर्विस चार स्मार्टफोन कंपन्यांच्या 24 हँडसेट साठी सादर केला गेला आहे, ज्यात ऍप्पल, वनप्लस, सॅमसंग आणि शाओमीचा समावेश आहे.

या हँडसेटना मिळाला सपोर्ट

एयरटेलच्या VoWi-Fi कॉलिंग सर्विसचा सपोर्ट iOS 13 वर काम करणाऱ्या – iPhone 6s, iPhone 6s Plus, iPhone 7, iPhone 7 Plus, iPhone SE, iPhone 8, iPhone 8 Plus, iPhone X, iPhone Xs, iPhone Xs Max, iPhone XR, iPhone 11 आणि iPhone 11 Pro व्यतिरिक्त Samsung च्या Galaxy J6, Galaxy On6, Galaxy M30s आणि Galaxy A10s; Xiaomi’s Poco F1, Redmi K20, and Redmi K20 Pro आणि OnePlus 7, OnePlus 7 Pro, OnePlus 7T आणि OnePlus 7T Pro ला मिळाला आहे. जर तुम्ही हे फोन्स वापरत असाल तर या सर्विसचा लाभ घेऊ शकता.

विशेष म्हणजे Airtel आपली हि वॉयस ओवर वाई-फाई (VoWi-Fi) कॉलिंग सर्विस भारतातील इतर ठिकाणी टेस्ट करत आहे. यावरून स्पष्ट आहे कि येत्या काळात या सर्विसचा लाभ इतर शहरांतील एयरटेल यूजर्सना पण मिळेल.

असा करा VoWi-Fi च्या मदतीने कॉल

VoWi-Fi फीचरचा वापर करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी आपल्या हँडसेटच्या कॉल सेटिंग्स मेन्यू मध्ये जाऊन हे फीचर ऑन करावे लागेल. जे तुम्हाला Wi-Fi Calling सेटिंग्स मध्ये दिसेल. जर डिवाइस मध्ये नेटवर्क नसेल तरी हि सर्विस एक्टिवेट करता येईल. एयरटेलच्या या सेवेसाठी एका ऍक्टिव्ह वाई-फाई नेटवर्कची गरज आहे. हि फेसटाइम, व्हाट्सऍप व मेसेंजर कॉलिंग प्रमाणे काम करते.

जाणून घ्या VoWi-Fi म्हणजे काय

VoWi-Fi म्हणजे वॉयस ओवर वाई-फाई. सध्या भारतात VoLTE म्हणजे वॉयस ओवर एलटीई सर्विस उपलब्ध आहे. VoLTE सर्विस मध्ये वॉयस कॉल सिम नेटवर्क मधील इंटरनेट द्वारे केला जातो. तसेच येणाऱ्या कॉल मुळे पण फोन मधील इंटरनेट स्पीड कमी होत नाही. पण VoWi-Fi मध्ये वॉयस कॉल करण्यासाठी सिम नेटवर्क आणि त्यातील इंटरनेटची पण जरूरत गरज पडत नाही. म्हणजे फोन मध्ये सिग्नल नसल्यास पण एखाद्या वाई-फाई नेटवर्कच्या माध्यमातून कॉल करता येईल. या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून वॉयस सर्विस आईपी द्वारे वाई-फाई नेटवर्क वर डिलीवर केली जाते.

या अनोख्या टेक्नॉलॉजी मुळे ग्राहक कोणत्याही मोबाईल नेटवर्कविना कॉल करू शकतात. VoWi-Fi चा सर्वात मोठा फायदा दुर्गम आणि ग्रामीण विभागांना मिळेल जिथे टेलीकॉम कंपन्यांचे टॉवर नसतात आणि नेटवर्क कमी मिळतो. या टेक्नॉलॉजीमुळे कमकुवत सिग्नल असल्यास पण चांगल्या कॉलिंगची मजा घेता येईल आणि इंडोर किंवा अंडरग्राउंड व बेसमेंट मध्ये पण चांगली कनेक्टिविटी मिळेल.

The post Jio च्या आधी Airtel ने सुरु केली VoWi-Fi कॉलिंग सर्विस, नेटवर्क सिग्नलविना करता येईल कॉल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/airtel-vowi-fi-calling-launched-with-support-for-24-smartphones-know-what-is-vowifi-service-and-how-to-use/feed/ 0