Xiaomi 11T Pro 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 05 Aug 2022 09:58:32 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 108MP कॅमेरा आणि पटकन फुलचार्ज होणाऱ्या Xiaomi 11T Pro 5G वर 15,000 रुपयांची सूट https://www.91mobiles.com/marathi/huge-discount-on-xiaomi-11t-pro-5g-with-108mp-camera-and-120w-fast-charging-know-this-special-deal/ https://www.91mobiles.com/marathi/huge-discount-on-xiaomi-11t-pro-5g-with-108mp-camera-and-120w-fast-charging-know-this-special-deal/#respond Fri, 05 Aug 2022 09:58:32 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12024 शाओमीनं गेल्यावर्षी एक भन्नाट स्मार्टफोन भारतात सादर केला होता. या हा फोन Xiaomi 11T Pro 5G नावानं ग्राहकांच्या भेटीला आला होता. शाओमीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर आकर्षक डिस्काउंटसह विकला जात आहे. या दमदार डिवाइसमध्ये 108 मेगापिक्सलचा शानदार कॅमेरा आहे, तसेच या फोनवर कंपनी मोठ्या डिस्काउंटसह युट्युबचं 3 महिन्यांचं प्रीमियम सब्सक्रिप्शन देखील मोफत देत […]

The post 108MP कॅमेरा आणि पटकन फुलचार्ज होणाऱ्या Xiaomi 11T Pro 5G वर 15,000 रुपयांची सूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमीनं गेल्यावर्षी एक भन्नाट स्मार्टफोन भारतात सादर केला होता. या हा फोन Xiaomi 11T Pro 5G नावानं ग्राहकांच्या भेटीला आला होता. शाओमीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर आकर्षक डिस्काउंटसह विकला जात आहे. या दमदार डिवाइसमध्ये 108 मेगापिक्सलचा शानदार कॅमेरा आहे, तसेच या फोनवर कंपनी मोठ्या डिस्काउंटसह युट्युबचं 3 महिन्यांचं प्रीमियम सब्सक्रिप्शन देखील मोफत देत आहे. तसेच हा फोन बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरसह देखील स्वस्तात विकत घेता येईल. चला जाणून घेऊया या फोनवर मिळणाऱ्या डील्सबाबत सविस्तर.

Xiaomi 11T Pro 5G वरील ऑफर

Xiaomi 11T Pro 5G स्मार्टफोन Amazonवर सुमारे 52,999 रुपयांमध्ये विकला जातो. परंतु सध्या सेलमध्ये यावर 28 टक्के 15,000 रुपयांचा मोठा डिस्काउंट दिला जात आहे. या ऑफरनंतर तुम्ही हा फोन फक्त 37,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. तसेच कंपनी या डिवाइसवर बँक ऑफर अंतगर्त 3,000 रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट देत. या बँक ऑफरसाठी कमीत कमी 32,999 रुपयांचं ट्रँजॅक्शन करणं आवश्यक आहे. तसेच एसबीआय क्रेडिट कार्डवर 10% इंस्टंट डिस्काउंट मिळेल. तर ईएमआय ट्रँजॅक्शनवर देखील 10% की सूट मिळत आहे. फोनवर नो कॉस्ट ईएमआय ऑप्शन देखील उपलब्ध आहे. तसेच तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करून या फोनवर 17,800 रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट मिळवू शकता. म्हणजे हा डिवाइस फक्त 20,199 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Xiaomi 11T Pro 5G चे स्पेसिफिकेशन

फोनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी प्लस अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यात 1080×2400 का पिक्सल रिजॉल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट मिळतो. डिस्प्लेला गोरिल्ला ग्लास विक्टसची सुरक्षा देण्यात आली आहे. फोनच्या सुरक्षेसाठी साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. चांगल्या ऑडियोसाठी डॉल्बी ऑडिओ सपोर्ट देखील देण्यात आला आहे.

स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर देण्यात आला आहे तसेच ग्राफिक्ससाठी Adreno 660 GPU मिळतो. बॅटरीच्या बाबतीत फोनमध्ये 5000mAh ड्युअल सेल बॅटरी देण्यात आली आहे, जी 120W HyperCharge टेक्नॉलॉजीसह येते. कंपनीचा दावा आहे की हा फोन फक्त 17 मिनिटांत फुल चार्ज होतो. हा शाओमी फोन अँड्रॉइड 11 आधारित MIUI 12.5 वर चालतो.

Xiaomi 11T Pro 5G फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 108 मेगापिक्सलचा सॅमसंग HM2 सेन्सर मुख्य कॅमेऱ्याचे काम करतो. तर सोबतीला 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

The post 108MP कॅमेरा आणि पटकन फुलचार्ज होणाऱ्या Xiaomi 11T Pro 5G वर 15,000 रुपयांची सूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huge-discount-on-xiaomi-11t-pro-5g-with-108mp-camera-and-120w-fast-charging-know-this-special-deal/feed/ 0