Xiaomi Mi 10 Pro 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 20 Mar 2020 14:09:11 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 31 मार्चला भारतात लॉन्च होईल 108एमपी कॅमेरा असलेला Xiaomi चा पावरफुल फोन Mi 10 5G https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10-5g-to-launch-in-india-on-31-march-with-108mp-camera-battery-chipset-full-specs-price-variant-sale/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10-5g-to-launch-in-india-on-31-march-with-108mp-camera-battery-chipset-full-specs-price-variant-sale/#respond Fri, 20 Mar 2020 14:09:11 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6854 अमेझॉनच्या ट्वीट नंतर स्पष्ट झाले आहे कि Xiaomi Mi 10 भारतात या शॉपिंग साइट वर विक्रीसाठी उपलब्ध होईल. सीरीज अंतर्गत एकच फोन लॉन्च होईल कि दोन हे अजून निश्चित समजले नाही.

The post 31 मार्चला भारतात लॉन्च होईल 108एमपी कॅमेरा असलेला Xiaomi चा पावरफुल फोन Mi 10 5G first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने कालच आपल्या अधिकृत ट्वीटर हँडल वर ट्वीट करून सांगितले होते कि कंपनी लवकरच भारतात आपल्या ‘मी सीरीज’ चा विस्तार करत नवीन स्मार्टफोन लॉन्च करेल. काल शाओमीने असा खुलासा तर केला होता कि मी सीरीजचा हा आगामी स्मार्टफोन 108 मेगापिक्सल रियर कॅमेऱ्यासह येईल, पण कंपनीने फोनची लॉन्च डेट सांगितली नव्हती. परंतु आज आपल्या इंडियन फॅन्सना खुशखबर देत शाओमीने Mi 10 सीरीजच्या या नवीन फोनची लॉन्च डेट सांगितली आहे.

शाओमीने ट्वीट करून खुलासा केला आहे कि येत्या 31 मार्चला कंपनी भारतात आपला नवीन स्मार्टफोन Xiaomi Mi 10 लॉन्च करेल. कंपनी कोरोनामुळे कोणताही ईवेंट करणार नाही तर ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर लाईव स्ट्रीमिंगच्या माध्यमातून हा डिवाईस को भारतीय बाजारात आणेल. Xiaomi ने आपल्या ट्वीट मध्ये या आगामी फोनचे नाव Mi 10 5G असे सांगितले आहे, ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि हा भारतात येणारा शाओमीचा पुढील 5जी फोन असेल.

Xiaomi Mi 10 5G चा लॉन्च ईवेंट 31 मार्च दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल जो शाओमीच्या अधिकृत वेबसाइट सोबतच फेसबुक, ट्वीटर व यूट्यूब सारख्या ब्रँडच्या सर्व सोशल प्लॅटफॉर्म वर लाईव बघता येईल. आशा आहे कि शाओमी मी 10 फोनच्या लॉन्च बद्दल ई-कॉमर्स साईट अमेझॉन इंडियाने पण ट्वीट केले होते. अमेझॉनच्या ट्वीट नंतर स्पष्ट झाले आहे कि Xiaomi Mi 10 भारतात या शॉपिंग साइट वर विक्रीसाठी उपलब्ध होईल. सीरीज अंतर्गत एकच फोन लॉन्च होईल कि दोन हे अजून निश्चित समजले नाही.

Xiaomi Mi 10 Pro

शाओमी मी10 प्रो सीरीजचा मोठा मॉडेल आहे. या फोन मध्ये पण 1080 × 2340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेली 6.67 इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. मी 10 प्रो पण कंपनीने कर्व्ड डिजाईन वर बनवला आहे आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजीने सुसज्ज करून बाजारात आणला आहे. Xiaomi Mi 10 Pro पण एक 5G फोन आहे जो क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट वर चालतो. कंपनीने हा डिवाईस एंडरॉयड 10 आधारित मीयूआई 11 वर लॉन्च केला आहे.

Xiaomi Mi 10 Pro च्या कॅमेरा सेग्मेंट बद्दल बोलायचे तर फोन मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर 108 मेगापिक्सलचा ISOCELL Bright HMX सेंसर देण्यात आला आहे ज्या सोबत 20 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 12 मेगापिक्सलची शार्ट टेलीफोटो लेंस आणि 8 मेगापिक्सलची मोठी टेलीफोटो लेंस आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वरील पंच होल मध्ये 20 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. हा डिवाईस पावर बॅकअपसाठी 50वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीने सुसज्ज असलेल्या 4,500एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

Xiaomi Mi 10

शाओमी मी 10 बद्दल आधी बोलूया, हा स्मार्टफोन 1080 × 2340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.67 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल कर्व्ड एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते तसेच शाओमीने फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजीने सुसज्ज केला आहे. हा स्मार्टफोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर लॉन्च झाला आहे जो मीयूआई 11 वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी Xiaomi Mi 10 मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट देण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा चिपसेट 5G कनेक्टिविटीला सपोर्ट करतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Xiaomi Mi 10 च्या बॅक पॅनल वर चार रियर कॅमेरा सेंसर्स देण्यात आले आहेत ज्यात 108 मेगापिक्सलचा प्राइमरी ISOCELL Bright HMX सेंसरचा समावेश आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 13 मेगापिक्सलच्या वाइड अँगल लेंस आणि दोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या कॅमेरा सेंसर्सला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी या फोन मध्ये 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. शाओमी मी10 30वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेल्या 4,780एमएएच च्या बॅटरी सह लॉन्च केला गेला आहे.

The post 31 मार्चला भारतात लॉन्च होईल 108एमपी कॅमेरा असलेला Xiaomi चा पावरफुल फोन Mi 10 5G first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10-5g-to-launch-in-india-on-31-march-with-108mp-camera-battery-chipset-full-specs-price-variant-sale/feed/ 0
16जीबी रॅम, 5250एमएएच बॅटरी आणि 108एमपी कॅमेर्‍यासह सर्वात पावरफुल फोन बनेल Xiaomi Mi 10 Pro https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10-pro-5g-16gb-ram-65w-5250-mah-battery-108mp-camera-snapdragon-865-chipset-specs-leak/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10-pro-5g-16gb-ram-65w-5250-mah-battery-108mp-camera-snapdragon-865-chipset-specs-leak/#respond Thu, 30 Jan 2020 10:44:15 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=6438 फोन चे नाव Mi 10 Pro 5G लिहिण्यात आले आहे ज्यावरून समजते की हा डिवाईस 5जी कनेक्टिविटी सह लॉन्च होईल.

The post 16जीबी रॅम, 5250एमएएच बॅटरी आणि 108एमपी कॅमेर्‍यासह सर्वात पावरफुल फोन बनेल Xiaomi Mi 10 Pro first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँड बनलेली Xiaomi गेल्या काही दिवसांपासून इंटरनल मीडिया मध्ये चर्चेत आहे. बातमी अशी आहे की कंपनी येत्या 11 फेब्रुवारीला अंर्तराष्ट्रीय टेक मंचावर आपल्या ‘मी सीरीज’ चा विस्तार करणार आहे आणि सीरीज मध्ये कंपनीचे दोन पावरफुल स्मार्टफोन Xiaomi Mi 10 आणि Mi 10 Pro लॉन्च केले जातील. कंपनीने अजूनतरी या दोन्ही स्मार्टफोन्सची माहिती दिली नाही पण वेगवेगळ्या लीक्स मध्ये फोनचे अनेक डिटेल्स समोर आले आहेत. आज पुन्हा Xiaomi Mi 10 Pro संबंधित एक नवीन लीक समोर आला आहे ज्यात सांगण्यात आले आहे की हा डिवाईस 16 जीबी च्या ताकदवान रॅम सह लॉन्च होईल.

Xiaomi Mi 10 Pro च्या या ताज्या लीक मध्ये चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर एक पोस्ट शेयर करण्यात आली आहे ज्यात फोनच्या सेटिंग मेन्यूचा स्क्रीनशॉट शेयर केला गेला आहे. या स्क्रीनशॉट मध्ये सेटिंग मेन्यू मध्ये ‘अबाउट’ पेज ओपन आहे ज्यात फोनचे अनेक स्पेसिफिकेशन्स लपलेले आहेत. या स्क्रीनशॉट मध्ये फोन चे नाव Mi 10 Pro 5G लिहिण्यात आले आहे ज्यावरून समजते की हा डिवाईस 5जी कनेक्टिविटी सह लॉन्च होईल.

पावरफुल स्पेसिफिकेशन्स

शाओमी मी 10 प्रो चे स्पेसिफिकेशन्स पाहता शेयर केल्या गेलेल्या फोटो वरून समजते कि हा स्मार्टफोन 2080 X 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. लीकनुसार हा स्मार्टफोन 16 जीबी च्या पावरफुल रॅम सह लॉन्च केला जाऊ शकतो सोबतच डिवाईस मध्ये 512 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. Mi 10 Pro 5G फोटो मध्ये मीयूआई 11 वर्जन सह दाखवण्यात आला आहे तसेच फोन मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 865 चिपसेट मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Xiaomi Mi 10 Pro 5G कंपनी क्वॉड रियर कॅमेरा सेटअप वर लॉन्च करू शकते. लीकनुसार हा फोन 108 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसरला सपोर्ट करेल. त्याचबरोबर मी 10 प्रो च्या बॅक पॅनल वर 16 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर आणि 12 मेगापिक्सल व 5 मेगापिक्सलचे दोन इतर कॅमेरा सेंसर मिळू शकतात. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 5,250एमएएच ची बॅटरी असल्याचे समोर आले आहे. अजून एका लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि शाओमीचा हा स्मार्टफोन 65वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल.

Xiaomi ने अजूनतरी Mi 10 आणि Mi 10 Pro ची लॉन्च डेट शेयर केली नाही पण काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या एका पोस्टरनुसार शाओमी 11 फेब्रुवारीला शांघाय मध्ये एका ईवेंटचे आयोजन करेल आणि या ईवेंटच्या मंचावरून मी 10 आणि मी 10 प्रो स्मार्टफोन टेक मंचावर येतील. विशेष म्हणजे 11 फेब्रुवारीला Samsung पण एक इंटरनेशनल ईवेंट आयोजित करणार आहे ज्यात Galaxy S20 लॉन्च केला जाईल. सॅमसंगने आपल्या या ईवेंट ‘Galaxy Unpacked’ नाव दिले आहे आणि याच दिवशी सॅमसंगचा फोल्डेबल फोन टेक मार्केट मध्ये येऊ शकतो. असे जरी असले तरी 91मोबाईल्सने लीक मध्ये समोर आलेल्या स्पेसिफिकेशन्सना दुजोरा दिला नाही.

The post 16जीबी रॅम, 5250एमएएच बॅटरी आणि 108एमपी कॅमेर्‍यासह सर्वात पावरफुल फोन बनेल Xiaomi Mi 10 Pro first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10-pro-5g-16gb-ram-65w-5250-mah-battery-108mp-camera-snapdragon-865-chipset-specs-leak/feed/ 0