Xiaomi Mi 8X - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 09 Aug 2018 11:53:19 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 शाओमी मी 8 सीरीज मध्ये घेऊन येत आहे अजून एक फोन, मी 8एक्स नावाने झाला वेबसाइट वर लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8x-listed-on-3c-site-to-launch-in-mi-8-series-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8x-listed-on-3c-site-to-launch-in-mi-8-series-in-marathi/#respond Thu, 09 Aug 2018 11:52:37 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1649 हा फोन या सीरीज चा सर्वात स्वस्त फोन नसेल पण याचे वेगवेगळे वेरिएंट मीड रेंज मध्ये पावरफुल स्पेसिफिकेशन्स देतील.

The post शाओमी मी 8 सीरीज मध्ये घेऊन येत आहे अजून एक फोन, मी 8एक्स नावाने झाला वेबसाइट वर लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने मे महिन्यात आपला आठवा वर्धापनदिन साजरा करताना कंपनीच्या ‘मी सीरीज’ मध्ये तीन नवीन पावरफुल स्मार्टफोन लॉन्च केले होते. शाओमी ने मी 8, मी 8एसई आणि मी 8 इक्स्प्लॉरर एडिशन सादर केले होते. तसेच असता बातमी येत आहे की शाओमी लवकरच ही सीरीज वाढवणार आहे आणि यात अजून एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहेस. अनेक लीक्स नंतर आता पुन्हा एकदा शाओमी चा आगामी स्मार्टफोन मी 8एक्स सर्टिफिकेशन साइट वर दिसला आहे.

शाओमी मी 8एक्स चीनी सर्टिफिकेशन साइट 3सी वर दिसला आहे. काही दिवसांपूर्वी एक रेडियो ट्रांसमिशन वेबसाइट वर पण शाओमी चा एक फोन एम1808डी2टीई मॉडेल नंबर सह लिस्ट झाला होता. तर 3सी वेबसाइट वर हा फोन एम1808डी2टीई मॉडेल नंबर सोबत एम1808डी2टीटी आणि एम1808डी2टीसी नंबर मध्ये लिस्ट झाला आहे. 3सी च्या लिस्टिंग वरून स्पष्ट झाले आहे की शाओमी आपल्या मी सीरीज मध्ये अजून एक नवीन स्मार्टफोन मी 8एक्स लवकरच आणणार आहे.

मी 8एक्स बद्दल 3सी सर्टिफिकेशन साइट वर स्पेसिफिकेशन्स ची माहिती देण्यात आली नाही पण समजले आहे की शाओमी हा स्मार्टफोन तीन वेरिएंट मध्ये आणणार आहे. आधी आलेल्या लीक्स नुसार शाओमी मी 8एक्स मध्ये कंपनी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट देऊ शकते.

शाओमी मी 8एक्स बद्दल बोलले जात आहे की शाओमी मी 8 एक्स्प्लॉरर प्रमाणे या स्मार्टफोन मध्ये पण अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट मिळू शकतो. लीक्स नुसार मी 8एक्स च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा देण्यात येईल जो वर्टिकल शेप मध्ये असेल. फोनचा बॅक पॅनल ग्लॉसी फिनिश वाला असेल तसेच हा व्हाईट आणि ब्लू ह्यू कलर मध्ये सादर केला जाऊ शकतो. तर पावर बॅकअप साठी शाओमी मी 8एक्स मध्ये 3,100एमएएच ची बॅटरी असण्याची शक्यता आहे.

शाओमी मी 8एक्स बद्दल कंपनी ने अजूनतरी कोणतीही माहिती दिली नाही. पण बोलले जात आहे की शाओमी हा फोन मी 8 सीरीजच्या मी 8 स्मार्टफोन आणि मी 8 एसई स्मार्टफोन च्या मधील बजट मध्ये लॉन्च करेल. म्हणजे हा फोन या सीरीज चा सर्वात स्वस्त फोन नसेल पण याचे वेगवेगळे वेरिएंट मीड रेंज मध्ये पावरफुल स्पेसिफिकेशन्स देतील. मी 8एक्स ची नवीन माहिती मिळताच तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल.

The post शाओमी मी 8 सीरीज मध्ये घेऊन येत आहे अजून एक फोन, मी 8एक्स नावाने झाला वेबसाइट वर लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8x-listed-on-3c-site-to-launch-in-mi-8-series-in-marathi/feed/ 0
शाओमी मी8 एक्स ची माहिती झाली लीक, डुअल कॅमेरा सोबत असेल आॅन स्क्रीन फिंगरप्रिंट स्कॅनर https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8x-specification-and-image-leak-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8x-specification-and-image-leak-in-marathi/#respond Mon, 06 Aug 2018 09:24:06 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1579 फोटो मध्ये शाओमी मी 8एक्स चा मागचा पॅनल दिसत आहे जो ग्लास फिनश मध्ये आहे. फोन ची बॉडी कर्व्ड आहे आणि मागच्या पॅनल वर डुअल कमेरा स्पष्ट दिसत आहे

The post शाओमी मी8 एक्स ची माहिती झाली लीक, डुअल कॅमेरा सोबत असेल आॅन स्क्रीन फिंगरप्रिंट स्कॅनर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जून मध्ये शाओमी ने आपल्या मी 8 सीरीज मध्ये 3 मॉडेल सादर केले होते. कंपनी ने शाओमी मी 8, मी 8 एक्सपोज आणि मी 8एसई सादर केले होते. मी 8एसई या सीरीज मधील सर्वात स्वस्त फोन आहे आणि बोलले जात आहे की कंपनी हा भारतात सादर करू शकते. तसेच आज शाओमी च्या 8 सीरीज फोन बद्दल माहिती आली आहे. बातमी अशी आहे की कंपनी मी 8एक्स लॉन्च करणार आहे. या फोन चे लाइव फोटो समोर आले आहेत.

चीनी सोशल नेटवर्किंग साइट बेइबो वर फोन चे काही फोटो शेयर करण्यात आले आहेत. त्याचबरोबर शाओमी मी 8एक्स बद्दल खास माहिती पण आली आहे. फोटो मध्ये शाओमी मी 8एक्स चा मागचा पॅनल दिसत आहे जो ग्लास फिनश मध्ये आहे. फोन ची बॉडी कर्व्ड आहे आणि मागच्या पॅनल वर डुअल कमेरा स्पष्ट दिसत आहे. फोन मध्ये डुअल कॅमेरा वर्टिकल स्टाइल मध्ये देण्यात आला आहे. तर कॅमेरा च्या मध्ये फ्लॅश आहे.

फोन चे अन्य स्पेसिफिकेशन पाहता या फोन मध्ये तुम्हाला वीवो एक्स21 प्रमाणे स्क्रीन वर फिंगरप्रिंट स्कॅनर मिळू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार शाओमी मी 8एक्स क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट वर सादर केला जाऊ शकतो. या फोनच्या स्क्रीन साइज ची माहिती अजून मिळाली नाही पण एवढे मात्र सांगण्यात आले आहे की या फोन मध्ये सध्यातरी फेस रिकॉग्निशन सारखे फीचर्स मिळणार नाहीत. बॅटरी बद्दल बोलले जात आहे की कंपनी यात 3,100 एमएएच ची बॅटरी देऊ शकते.

शाओमी मी 8 बद्दल बोलायचे तर या फोन मध्ये 2248 X 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.21-इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन मीयूआई 10 वर चालतो जो एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.0 ओरियो आधारित आहे.

शाओमी मी 8 क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालतो जो सध्यातरी सर्वात ताकदवान चिपसेट पैकी एक आहे. हा फोन 6जीबी रॅम सह येतो तर कंपनी ने हा 64जीबी, 128जीबी आणि 256जीबी अशा तिन स्टोरेज मध्ये सादर केला आहे.

फोटोग्राफी साठी शाओमी मी 8 मध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यात 12-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर आहेत. तर फ्रंट ला 20-मेगा​​पिक्सल चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. मी 8 का सेल्फी कॅमेरा पण आर्टिफिशयल इंटेलिजेंस टेक्नोलॉजी वापरतो.

The post शाओमी मी8 एक्स ची माहिती झाली लीक, डुअल कॅमेरा सोबत असेल आॅन स्क्रीन फिंगरप्रिंट स्कॅनर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8x-specification-and-image-leak-in-marathi/feed/ 0