Xiaomi Mi A1 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 03 Oct 2018 11:20:34 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 शाओमी मी ए1 मध्ये झाला ब्लास्ट, झोपेत असताना घडली दुर्घटना https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a1-caught-fire-explode-and-blast-while-charging-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a1-caught-fire-explode-and-blast-while-charging-in-marathi/#respond Wed, 03 Oct 2018 11:20:34 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2348 जरी ही घटना भारतात घडली नसली तरी देशात शाओमी फोन वापरणारे लोक भरपूर आहेत आणि अशा दुर्घटना स्मार्टफोन यूजर्स मध्ये भीती निर्माण करतात.

The post शाओमी मी ए1 मध्ये झाला ब्लास्ट, झोपेत असताना घडली दुर्घटना first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी चीन मधील अॅप्पल म्हणून ओळखली जाते. चीनच्या बाहेर पण या कंपनी ने आपली चांगली पकड बनवली आहे. शाओमी सध्या भारतातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँड बनली आहे आणि लो व मीड बजट सेग्मेंट मध्ये सर्वात जास्त विक्री करणारी कंपनी आहे. जेवढे नाव मोठे असते तेवढ्याच मोठ्या जबाबदार्‍या पण वाढतात आणि लोकांचा विश्वास कायम ठेवावा लागतो. पण नुकतीच एक दुर्घटना समोर आली आहे ज्यामुळे शाओमीला डाग लागू शकतो. शाओमी च्या हिट स्मार्टफोन मी ए1 मध्ये आग लागल्याची बातमी आली आहे ज्यामुळे शाओमी सोबतच स्मार्टफोन यूजर्स मध्ये पण भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शाओमी मी ए1 स्मार्टफोन मध्ये आग लागल्याची बातमी समोर आली आहे. शाओमी च्या मी फोरम वर एका यूजरने या घटनेची माहिती दिली. मी फोरम वर न्यूज अपडेट करणार्‍या यूजरने सांगितले आहे की त्याचा मित्र शाओमी मी ए1 स्मार्टफोन वापरतो. एका रात्री तो फोन आपल्या बेड जवळ ठेऊन झोपला होता. फोन चार्जिंगला लावण्यात आला होता आणि अचानक त्यात आग लागली. सुदैवाने आग वाढण्याच्या आणि ब्लास्ट होण्याआधी फोन यूजरला जाग आली होती आणि त्याने आपला जीव वाचवला.

पोस्ट नुसार यूजर ने आठ महिन्यांपूर्वी शाओमी मी ए1 स्मार्टफोन विकत घेतला होता आणि या आठ महिन्यात स्मार्टफोन यूजरला कधी फोन गरम झाल्याच्या समस्येला सामोरे जावे लागले नव्हते. रात्री झोपताना यूजर ने फोन चार्जिंग ला लावला होता आणि त्याच दरम्यान फोनला आग लागली आणि तो ब्लास्ट झाला. स्मार्टफोन यूजरने दावा केला आहे की तो फोनचा आॅरिजनल चार्जर वापरतो आणि त्या रात्री पण त्यांनी आॅरिजनल चार्जरच वापरला होता.

शाओमी मी ए1 यूजरने सांगितले की जर त्याचा फोन दूरवर नसता तर त्याला पण या ब्लास्टचा त्रास झाला असता. ही दुर्घटना होऊन एक आठवडा होत आला पण अजूनही शाओमी ने यूजरशी संपर्क साधला नाही किंवा मी ए1 सोबत झालेल्या या दुर्घटने वर कोणती प्रतिक्रिया पण दिली नाही. जरी ही घटना भारतात घडली नसली तरी देशात शाओमी फोन वापरणारे लोक भरपूर आहेत आणि अशा दुर्घटना स्मार्टफोन यूजर्स मध्ये भीती निर्माण करतात.

The post शाओमी मी ए1 मध्ये झाला ब्लास्ट, झोपेत असताना घडली दुर्घटना first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a1-caught-fire-explode-and-blast-while-charging-in-marathi/feed/ 0