Xiaomi Mi LED Tv 4A - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 05 Oct 2018 11:13:31 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 शाओमी फॅन्सना झटका : कंपनी वाढवू शकते मी एलईडी टीवीच्या किंमती https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-new-smart-tv-plant-india-mi-led-tv-price-may-increase-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-new-smart-tv-plant-india-mi-led-tv-price-may-increase-in-marathi/#respond Fri, 05 Oct 2018 11:13:31 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2382 मनु जैन ने ईशारा केला आहे की येत्या काही दिवसांत मी एलईडी टीवी 4ए च्या किंमती वाढू शकतात.

The post शाओमी फॅन्सना झटका : कंपनी वाढवू शकते मी एलईडी टीवीच्या किंमती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी चीनची अॅप्पल म्हणून ओळखली जाते पण ही कंपनी आज इंडियन टेक बाजारात राज्य करीत आहे. स्मार्टफोन बाजारात नंबर एक झाल्यानंतर सध्या कंपनी स्मार्ट टीवी बनवून सॅमसंग, सोनी व इतर कंपन्यांना टक्कर देत आहे. शाओमी ने जेव्हा आपला पहिला स्मार्ट टीवी लॉन्च केला होता तेव्हा भारतीयांनी तो हातोहात खरेदी केला होता. शानदार फीचर्स आणि कमी किंमतीच्या जोरावर शाओमी ने टेलीविजन बाजारात चांगला जम बसवला आहे. पण आता शाओमी कडून एक अशी बातमी आली आहे ज्याने फक्त शाओमी फॅन्स नव्हे तर शाओमी चे स्मार्ट टीवी विकत घेऊ पाहणारे लोक निराश होतील. शाओमी आपल्या स्मार्ट टीवी च्या किंमती वाढवणार आहे.

शाओमी येत्या काही दिवसांत आपल्या स्मार्ट टीवी च्या किंमती वाढवू शकते ही माहिती कंपनी चे हेड मनु कुमार जैन यांनी दिली आहे. शाओमी ने कालच तामिळनाडू मधील तिरूपती मध्ये कंपनी च्या स्मार्ट टीवी चा पहिला मॅन्युफॅक्चरिंग प्लांट सुरू केला आहे. या प्लांट मध्ये डिक्सॉन टेक्नोलॉजी शाओमी साठी स्मार्ट टीवी एसेंबल करेल. शाओमी च्या नवीन प्लांट मध्ये मी एलईडी टीवी 4ए 32-इंच आणि मी एलईडी टीवी 4ए 43-इंच बनवल्या जातील. शाओमीचा दावा आहे की कंपनी या प्लांट मधून प्रत्येक महिन्याला 1,00,000 टेलीविजनची निर्मिती करेल.

मेक इन इंडिया शाओमी स्मार्ट टीवी असल्यामुळे शाओमी फॅन्स आशा व्यक्त करत होते की आता या टेलीविजन च्या किंमती कमी होतील. पण त्या उलट मनु जैन ने ईशारा केला आहे की येत्या काही दिवसांत मी एलईडी टीवी 4ए च्या किंमती वाढू शकतात. मनु जैन यांचे म्हणेन आहे की जरी भारतात टीवी बनल्यामुळे टॅक्स कमी झाला तरी इथे लॉजिस्टिकची कॉस्ट वाढेल. तसेच फॅक्टरी प्लांट मध्ये लेबर खर्च पण वाढेल. मनु कुमार जैन यांनी डॉलर आणि रुपया मध्ये वाढलेल्या असमानतेकडे पण बोट दाखवले आहे.

91मोबाईल्सला शाओमी हेड ने सांगितले की रूपयांची घटणारी किंमत तसेच डॉलरची वाढत्या किंमतीमुळे कंपनीला मी एलईडी टीवी 4ए च्या किंमती वाढवाव्या लागू शकतात. शाओमी या किंमती लगेच वाढवणार नाही. पण येत्या काही दिवसांत शाओमी इंडिया कडून स्मार्ट टीवी च्या किंमती वाढवू शकते. प्लांट बद्दल बोलायचे तर शाओमीचा हा प्लांट तिरूपति मध्ये 32 एकरात पसरला आहे. या प्लांट मध्ये सध्या 850 लोक काम करतील जी सख्यां येत्या काळात वाढेल. नवीन वर्षाच्या सुरवाती पासून म्हणजे जानेवारी 2019 पासून शाओमी या प्लांट मधून 1 लाख मी एलईडी टीवी ची निर्मिती करेल.

The post शाओमी फॅन्सना झटका : कंपनी वाढवू शकते मी एलईडी टीवीच्या किंमती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-new-smart-tv-plant-india-mi-led-tv-price-may-increase-in-marathi/feed/ 0