Xiaomi Mi Mix Alpha - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 07 Apr 2020 13:25:22 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Xiaomi करू शकते धमाका, अनोख्या स्मार्टफोनचे पेटंट केले फाइल https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-patents-a-phone-with-waterfall-display-unique-phone/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-patents-a-phone-with-waterfall-display-unique-phone/#respond Tue, 07 Apr 2020 13:25:22 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7028 सप्टेंबर 2019 मध्ये Xiaomi ने स्मार्टफोनच्या नवीन UI साठी चाइनीज पेटंट ऑफिस CNIPA कडे एक डिजाइन पेटंट फाईल केले होते.

The post Xiaomi करू शकते धमाका, अनोख्या स्मार्टफोनचे पेटंट केले फाइल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चिनी स्मार्टफोन कंपनी शाओमी बद्दल एक बातमी समोर आली आहे, ज्या नुसार कंपनी एका आगळ्यावेगळ्या स्मार्टफोन वर काम करत आहे. शाओमी या अपकमिंग स्मार्टफोन मध्ये वॉटरफाल स्क्रीन आणि अंडर-डिस्प्ले कॅमेरा देऊन हा फोन सर्वात अनोख्या फोन्सच्या लिस्ट मध्ये सामील करेल.

याआधी कंपनीने Mi Mix Alpha एका शानदार आणि आगळीवेगळ्या डिजाइन सह सादर केला आहे. हा एक कॉन्सेप्ट फोन होता जो कोणत्याही मार्केट मध्ये विकला गेला नाही. तर आता कंपनीने या फोनच्या धर्तीवर एक नवीन स्मार्टफोनच्या डिजाइनचा पेटंट फाइल केला आहे.

सप्टेंबर 2019 मध्ये Xiaomi ने स्मार्टफोनच्या नवीन UI साठी चाइनीज पेटंट ऑफिस CNIPA कडे एक डिजाइन पेटंट फाईल केले होते. हे पेटंट 3 एप्रिल 2020 ला प्रकाशित झाले होते आणि आता याचा समावेश WIPO (वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑफिस) च्या ग्लोबल डिजाइन डाटाबेस मध्ये पण केला गेला आहे. या यूआई नुसार स्मार्टफोनची स्क्रीनच्या दोन्ही बाजूंना 60 टक्क्यांपेक्षा जास्त स्क्रीन सरफेस असेल. या फोनच्या यूजर इंटरफेस बाबत बोलायचे तर यात साइड कंट्रोल सह 90 डिग्री राउंडेड स्क्रीन असेल. शाओमीच्या या नवीन स्मार्टफोनच्या मागे स्क्रीन नसेल.

हि कर्व्ड स्क्रीन Mi Mix अल्फा प्रमाणे बोल्ड नाही, जी बॅक पॅनलचा अधिकतम भाग कवर करते. कडेवर डिस्प्ले, होम स्क्रीन वर बॅटरी इंडिकेटर आणि नेटवर्क स्ट्रेंथ सारखे स्टेटस आयकॉन दिसतील.

फोनची स्क्रीन बाजूला इतकी पुढे जाते कि कंट्रोल इंटरफेस पण डिस्प्ले मध्ये येतो. पेटंट मध्ये यूजर इंटरफेस आणि मागील बाजूवर फोकस केला गेला आहे. फोनचा फ्रंट कॅमेरा स्क्रीनच्या खाली असेल. जून 2019 मध्ये शाओमी आणि ओप्पोने कॅमेरा अंडर स्क्रीन सह प्रोटोटाइप स्मार्टफोन शोकेस केला होता. शाओमी या पेटंटेड डिजाइन सह कोणता स्मार्टफोन घेऊन येईल हे सजून समजलेले नाही.

सोर्स

The post Xiaomi करू शकते धमाका, अनोख्या स्मार्टफोनचे पेटंट केले फाइल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-patents-a-phone-with-waterfall-display-unique-phone/feed/ 0
Xiaomi फोल्डेबल फोन दिसला सर्टिफिकेशन साइट वर, असू शकतो Mi MIX Fold https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-mix-fold-foldable-phone-spotted-on-certification-site/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-mix-fold-foldable-phone-spotted-on-certification-site/#respond Fri, 31 Jan 2020 12:02:29 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6461 हि डिजाइन बघून वाटत आहे कि हा फोन Mi Fold किंवा Mi MIX Fold असू शकतो. याची डिजाइन Huawei Mate X प्रमाणे असेल.

The post Xiaomi फोल्डेबल फोन दिसला सर्टिफिकेशन साइट वर, असू शकतो Mi MIX Fold first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने गेल्या वर्षी काही फोल्डेबल फोनच्या डिजाइन पेटेंट केल्या होत्या. कंपनीच्या कॉन्सेफ्ट फोनची झलक पण गेल्यावर्षी दिसली होती ज्याची कूल डिजाइन खूप कुल होती. तर आता 91मोबाईल्सला शाओमी फोल्डेबल फोनच्या डिजाइनची माहिती मिळाली आहे. हे पेटेंट चाइनीज सर्टिफिकेशन साइट CNIPA वर आले आहे. हि डिजाइन बघून वाटत आहे कि हा फोन Mi Fold किंवा Mi MIX Fold असू शकतो. याची डिजाइन Huawei Mate X प्रमाणे असेल.

या फोनच्या फोटो वरून दिसत आहे कि फोन मध्ये फ्लेक्सिबल स्क्रीन आणि मोठी हिंज आतल्या बाजूला असेल. हिंजच्या मदतीने फोन हॉरिजोंटली फोल्ड करता येईल. या फोनची डिजाइन Huawei Mate X स्मार्टफोन प्रमाणे असेल. शाओमी हँडसेट कर्व्ड डिस्प्ले आणि साइड बार डुअल कॅमेरा एलईडी फ्लॅश सह येईल. फोनचा कॅमेरा मॉड्यूल नॉच मध्ये असेल कि अंडर-डिस्प्ले हे अजून स्पष्ट झाले नाही.

Mi MIX Fold टॅबलेट साइज स्क्रीन सह येईल. तसेच हँडसेट मध्ये डुअल कॅमेरा सेटअप असेल जो फ्रंट कॅमेऱ्याचे काम पण करेल. याच्या मदतीने सेल्फी आणि वीडियो कॉलिंग करता येईल. हा स्मार्टफोन शाओमी कस्टम एंडरॉयड स्किन MIUI वर चालेल. तसेच या फोन मध्ये मल्टी-ऍक्टिव्ह विंडोज सपोर्ट असू शकतो.

अजूनही Mi MIX Fold च्या स्पेसिफिकेशन्स बद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण आशा व्यक्त केली जात आहे कि फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 865 SoC सह सादर केला जाऊ शकतो. गेल्यावर्षी कंपनीने Mi MIX Alpha स्नॅपड्रॅगॉन 855 SoC सह सादर केला होता. याचा अर्थ असा कि कंपनी या वेळी नवीन फ्लॅगशिप चिपसेटचा वापर करेल.

The post Xiaomi फोल्डेबल फोन दिसला सर्टिफिकेशन साइट वर, असू शकतो Mi MIX Fold first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-mix-fold-foldable-phone-spotted-on-certification-site/feed/ 0