Xiaomi Mi Note 10 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 07 Nov 2019 11:08:51 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 108MP कॅमेऱ्यासह शाओमीने लॉन्च केले दोन दमदार स्मार्टफोन Mi Note 10 आणि Note 10 Pro, जाणून घ्या फरक https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-note-10-and-mi-note-10-pro-launch-with-108mp-penta-camera/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-note-10-and-mi-note-10-pro-launch-with-108mp-penta-camera/#respond Thu, 07 Nov 2019 11:08:51 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5704 Mi Note 10 ची किंमत जवळपास 43,227 रुपये आणि Mi Note 10 Pro जवळपास 53,000 रुपयांमध्ये आला आहे.

The post 108MP कॅमेऱ्यासह शाओमीने लॉन्च केले दोन दमदार स्मार्टफोन Mi Note 10 आणि Note 10 Pro, जाणून घ्या फरक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चिनी स्मार्टफोन कंपनीने आज स्पेन मध्ये आयोजित एका इवेंट मध्ये आपल्या Mi सीरीज मध्ये Mi Note 10 आणि Note 10 Pro लॉन्च केले आहेत. या दोन्ही फोन्स मध्ये 108 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच कंपनीने इवेंट मध्ये आपला Redmi Note 8T पण लॉन्च केला आहे. Mi Note 10 अलीकडेच लॉन्च झालेल्या Mi CC9 Pro चा ग्लोबल वेरिएंट आहे.

Mi Note 10 आणि Mi Note 10 Pro बद्दल बोलायचे तर दोन्ही फोन मध्ये फक्त कॅमेरा लेंसचा फरक आहे. Mi Note 10 च्या प्राइमरी 108 मेगापिक्सल मध्ये 7पी लेंस आहे. तर Mi Note 10 Pro च्या 108 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा मध्ये 8 पी लेंस आहे.

त्याचबरोबर Mi Note 10 मध्ये 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. तर Mi Note 10 Pro मध्ये 8जीबी रॅम व 256जीबी इंटरनल स्टोरेज आहे. याव्यतिरिक्त दोन्ही फोन्सचे स्पेसिफिकेशन्स एकसारखे आहेत. किंमतीबद्दल बोलायचे तर Mi Note 10 ची किंमत जवळपास 43,227 रुपये आणि Mi Note 10 Pro जवळपास 53,000 रुपयांमध्ये आला आहे.

Mi Note 10 आणि Mi Note 10 Pro चे स्पेसिफिकेशन्स अगदी Mi CC9 Pro सारखेच आहेत. या दोन्ही फोन्स मध्ये 6.47-इंचाचा फुल-HD+ (1080×2340 पिक्सल) डिस्प्ले, क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 730G प्रोसेसर देण्यात आला आहे.

तसेच या दोन्ही फोन मध्ये पेंटा कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोन मध्ये 108MP प्राइमरी शूटर, एक 20MP अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा, 2X ऑप्टिकल जूम सह 12MP कॅमेरा, 50x डिजिटल जूम सपोर्ट सह 5MP कॅमेरा आणि एक मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. तर फ्रंटला 32MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आणि 30w फास्ट चार्जिंग सह 5,260mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post 108MP कॅमेऱ्यासह शाओमीने लॉन्च केले दोन दमदार स्मार्टफोन Mi Note 10 आणि Note 10 Pro, जाणून घ्या फरक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-note-10-and-mi-note-10-pro-launch-with-108mp-penta-camera/feed/ 0