Xiaomi Phone Offers - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 16 Mar 2021 12:50:33 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Xiaomi Redmi 9 सीरज मधील 9 फोन्सच्या किंमती झाल्या कमी, Note 9 Pro Max च्या किंमतीत मोठी कपात https://www.91mobiles.com/marathi/price-drop-on-xiaomi-redmi-note-9-redmi-note-9-pro-max-redmi-note-9-pro-redmi-9-redmi-9i-redmi-9-prime-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/price-drop-on-xiaomi-redmi-note-9-redmi-note-9-pro-max-redmi-note-9-pro-redmi-9-redmi-9i-redmi-9-prime-in-india/#respond Tue, 16 Mar 2021 12:50:33 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10336 Redmi 9 Prime, Redmi Note 9 आणि Redmi Note 9 Pro सह अनेक डिवाइसेसचा समावेश आहे.

The post Xiaomi Redmi 9 सीरज मधील 9 फोन्सच्या किंमती झाल्या कमी, Note 9 Pro Max च्या किंमतीत मोठी कपात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जर तुम्ही Xiaomi फोन विकत घेण्याचा विचार करत असाल आणि एखाद्या चांगल्या ऑफरची वाट बघत असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. कंपनीने एकसाथ 9 फोन्सच्या किंमती 300 रुपयांपासून 2,000 पर्यंतची कपात केली आहे. खास बाब अशी की या ऑफरमध्ये कंपनीच्या ताकदवान फोन Redmi Note 9 Pro Max पण मोठ्या ऑफरसह विकत घेता येईल. या फोनवर कंपनी 2,000 रूपयांची सुट देत आहे. आधी Xiaomi Redmi Note 9 Pro Max किंमत 16,999 रुपये होती. पण आता हा 14,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

शाओमीची ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे. कंपनी द्वारे ही ऑफर 16 मार्च पासून सुरू करण्यात आली असून 31 मार्चपर्यंत सुरू राहील. दरम्यान एकूण 9 फोन्सच्या किंमती कमी झाल्या आहेत ज्यात Redmi 9i, Redmi 9 Prime, Redmi Note 9 आणि Redmi Note 9 Pro सह अनेक डिवाइसेसचा समावेश आहे. 91मोबाईल्सला ही माहिती एक्सक्लूसिव ऑफलाइन स्टोरकडून मिळाली आहे.

Xiaomi Redmi 9 आणि Redmi 9 च्या ऑफर्स

शाओमीद्वारे देण्यात येणार्‍या या ऑफर मध्ये कंपनीने Redmi 9i च्या किंमतीत 300 रूपयांची कपात केली आहे. आधी हा फोन 8,299 रुपयांमध्ये उपलब्ध होता. तसेच आता 7,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर Redmi 9 Prime च्या 4 GB/64 GB मॉडेलवर 500 रुपये आणि 4 GB/128 GB मॉडेलवर 1,000 रूपयांची कपात करण्यात आली आहे. यामुळे हे मॉडेल क्रमशः 9,499 रुपये आणि 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येतील.

तसेच Redmi Note 9 चे तिन्ही मॉडेलवर कंपनी सुट देत आहे. 4 GB/64 GB वर 1,000 रूपयांची, 4 GB/128 GB वर 500 रूपयांची आणि 6 GB/128 GB वर 1,000 रूपयांची सुट दिली जात आहे. नवीन ऑफरनंतर तुम्ही हे मॉडेल 10,999 रुपये, 12,999 रुपये आणि 13,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता.

शाओमी च्या 9 सीरीजमध्ये Redmi Note 9 Pro वर पण यावेळी ऑफर दिली जात आहे. कंपनी 4 GB रॅम आणि 64 GB मेमरी वेरियंटवर 1,000 रूपयांची सुट देत आहे. तसेच 4 GB RAM आणि 128 GB मेमरी मॉडेलवर 2,000 रूपयांची सुट आहे. किंमतीत कपात केल्यानंतर हे फोन्स 12,999 रुपये आणि 13,999 रुपयांमध्ये विकत घेता येतील.

राहिला प्रश्न Redmi Note 9 Pro Max चा तर, कंपनी या फोनवर 2,000 रूपयांची सुट देत आहे. ही सुट फक्त 6 GB रॅम आणि 64 GB मेमरी वेरियंट वर दिली जात आहे.

कुठे मिळेल Xiaomi Phone वर ही ऑफर
तसे पाहता Xiaomi फोन ऑनलाइन उपलब्ध होतात. परंतु यावेळी कंपनी हा डिस्काउंट Offline स्टोरवर देत आहे हे विशेष. म्हणजे या सर्व ऑफर्स तुम्हाला तुमच्या नजीकच्या शाओमी स्टोरवर मिळतील.

The post Xiaomi Redmi 9 सीरज मधील 9 फोन्सच्या किंमती झाल्या कमी, Note 9 Pro Max च्या किंमतीत मोठी कपात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/price-drop-on-xiaomi-redmi-note-9-redmi-note-9-pro-max-redmi-note-9-pro-redmi-9-redmi-9i-redmi-9-prime-in-india/feed/ 0