Xiaomi Poco F1 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:24:50 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 8जीबी रॅम सह येणारे 7 दामदार एंडरॉयड स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/top-8gb-ram-phone-in-india-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/top-8gb-ram-phone-in-india-in-marathi/#respond Mon, 01 Oct 2018 12:14:47 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2337 सुरवातीला 1जीबी रॅम भरपूर जास्त असायचा पण आजकाल 8जीबी रॅम वाले फोन भारतीय बाजारात उपलब्ध झाले आहेत. खाली आम्ही 8जीबी रॅम असलेल्या अशाच 7 दमदार फोनची माहिती दिली आहे.

The post 8जीबी रॅम सह येणारे 7 दामदार एंडरॉयड स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
तुम्ही कधी विचार केला आहे का अचानक पणे स्मार्टफोन मधील रॅम बद्दल इतकी चर्चा का सुरू झाली आहे? लोक जास्त रॅम असलेला फोन का शोधत आहेत? त्यामागील एक कारण म्हणजे आता अॅप्स आणि गेम्स हेवी होत आहेत. हाय रेजल्यूशन असलेले हे अॅप्स चालवण्यासाठी जास्त रॅम ची गरज असते नाही तर फोन लॅग होईल किंवा स्लो होईल. फोन मध्ये अॅप्स आणि गेम्स इंटरनल मेमरी मध्ये स्टोर झाले तरी जेव्हा तुम्ही ते चालवता तेव्हा ते रॅम चा वापर करतात. याच कारणामुळे लोक जास्त रॅम असलेला फोन शोधतात. फोन मध्ये रॅम जास्त असल्यास तो लवकर हँग होणार नाही. फोन फास्ट चालेल आणि लॅग पण कमी होईल. सुरवातीला 1जीबी रॅम भरपूर जास्त असायचा पण आजकाल 8जीबी रॅम वाले फोन भारतीय बाजारात उपलब्ध झाले आहेत. खाली आम्ही 8जीबी रॅम असलेल्या अशाच 7 दमदार फोनची माहिती दिली आहे.

1. रियलमी 2 प्रो

सध्या भारतीय बाजारात हा सर्वात स्वस्त 8जीबी रॅम वाला फोन आहे. रियलमी 2 प्रो नुकताच कंपनी ने लॉन्च केला आहे. यात 6.3 इंचाची फुल एचडी+ स्क्रीन वॉटर ड्रॉप नॉच सह आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो जो या बजेट मध्ये खुप चांगला आहे. फोन मध्ये 2.2गीगाहट्र्ज चा आॅक्टाकोर प्रोसेसर आणि 8जीबी रॅम आहे. त्याचबरोबर 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. याचा 4जीबी आणि 6जीबी रॅम वाला मॉडेल पण आहे. फोटोग्राफी साठी रियलमी 2 प्रो मध्ये 16—मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा आणि 16—मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअप साठी 3,500 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

2. शाओमी पोको एफ1

शाओमी ने भारतीय बाजारात पोको नावाने दुसरा ब्रँड सादर केला आहे. या अंतर्गत कंपनी ने पोको एफ1 नावाने पहिला मॉडेल लॉन्च केला आहे. पोको फोन पण कमी किंमतीत चांगले स्पेसिफिकेशन देतो. कंपनी ने पोको एफ1 चे तीन वेरियंट सादर केले आहेत जे 4जीबी, 6जीबी आणि 8जीबी रॅम वेरियंट सह येतात. फोन मध्ये 6.18-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित मीयूआई 9.6 वर चालतो. 8जीबी वाला वेरियंट 256जीबी मेमरी सह येतो. तसेच फोटोग्राफी साठी फोन मध्ये 12एमपी+5एमपी चा रियर कॅमेरा आहे. तसेच फ्रंट कॅमेरा 20एमपी चा देण्यात आला आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट सह लॉन्च होणारा हा सर्वात स्वस्त फोन आहे.

3. असूस झेनफोन 5झेड

या वर्षी असूस ने पण 8जीबी रॅम सह आपला फोन सादर केला आहे. कंपनी झेनफोन 5झेड आणला आहे जो चांगल्या प्रोसेसर सोबत 8जीबी रॅम मध्ये उपलब्ध आहे. याचा एक वेरियंट 6जीबी रॅम सह पण येतो. असूस झेनफोन 5झेड मध्ये 6.2-इंचाची नॉच स्टाइल वाली फुल एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. हा फोन पण क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालतो आणि यात 6जीबी व 8जीबी रॅम वाले दोन मेमरी वेरियंट उपलब्ध आहेत. 8जीबी रॅम मॉडेल सोबत 256जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर 6जीबी वाला वेरियंट 128जीबी मेमरी सह येतो. फोटोग्राफी साठी यात 12-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी कॅमेरा 8-मेगापिक्सलचा सेंसर आहे. या फोन मध्ये एआई कॅपेबिलिटी आहे. कॅमेरा सोबत वाइड एंगल सपोर्ट आहे आणि यात एआई इंटीग्रेशन पण देण्यात आला आहे.

4. वनप्लस 6

भारतात 8जीबी रॅम वाल्या फोनची सुरवात वनप्लस ने गेल्या वर्षीच केली होती. या वर्षी पण कंपनी ने 8जीबी रॅम सह वनप्लस 6 आणला आहे. फोन मध्ये 19:9 आस्पेक्ट रेशियो वाला 6.28-इंच एमोलेड डिस्प्ले आहे जो नॉच स्टाइल सह सादर करण्यात आला आहे. फोनची स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. रॅम सोबत सर्वात ताकदवान प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालतो यात 2.8गीगाहट्र्ज चा आॅक्टा-कोर प्रोसेसर आहे. फोटोग्राफी सेग्मेंट मध्ये पण हा मागे नाही आणि फोन मध्ये 20-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स 376के सेंसर आणि 16-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स 519 कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर 16-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स 371 सेल्फी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.

5. वीवो नेक्स

ओपो व्यतिरिक्त वीवो ने पण इनविजिबल कॅमेरा वाला फोन सादर केला आहे आणि हा फोन पण खुप दमदार आहे. वीवो ने नेक्स भारतात आणला आहे ज्यात पॉप-अप सेल्फी कमेरा देण्यात आला आहे. वीवो नेक्स मध्ये 2316 x 1080 पिक्सल रेजल्यूशन वाला 6.59-इंचाचा ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट आधारित या फोन मध्ये 8जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे. हा फोन लेटेस्ट एंडरॉयड वर चालतो. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वीवो नेक्स च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात वर्टिकल शेप मध्ये 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेंसर आहेत. तसेच फोन मधील फ्रंट कॅमेरा 8-मेगापिक्सलचा आहे.

6. ओपो फाइंड एक्स

ओपो फाइंड एक्स ची सर्वात मोठी खासियत याचा कॅमेरा सेटअप आहे. या फोन मध्ये रियर कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा दोन्ही फोनच्या बॉडी च्या आत आहेत जे बाहेरून दिसत नाहीत. फोटो घेण्यासाठी कॅमेरा अॅप उघडताच फोनच्या बॉडी च्या आतून कॅमेरा सेंसर बाहेर येतात आणि फोटो घेतात. कंपनी ने बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल आणि 20-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे तर फ्रंटला 25-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर आहे. पण इतर स्पेसिफिकेशन पण काही कमी दमदार नाहीत. फोन मध्ये 6.4-इंचाचा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन कलर ओएस 5.1 वर चालतो जो एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट आधारित या फोन मध्ये 8जीबी रॅम आणि 256जीबी इंटरनल स्टोरेज आहे.

7. सॅमसंग गॅलेक्सी नोट 9

सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 सह कंपनी ने 8जीबी रॅम वाल्या फोनची सुरवात केली ज्यात 512जीबी इंटरनल स्टारेेज देण्यात आली. याचा एक मॉडल 6जीबी रॅम आणि 128जीबी मेमरी वाला पण आहे. फोन मध्ये एसपेन फीचर आहे जो इतर कोणत्याही फोन मध्ये नाही. तुम्ही यात सहज नोट बनवू शकता आणि याने कॅमेरा कंट्रोल करू शकता आणि यूट्यूब वीडियो प्ले करू शकता. प्रत्येक बाबतीत तुम्हाला हा फोन आवडेल. गॅलेक्सी नोट 9 मध्ये 18.5:9 आस्पेक्ट रेशियो वाली कपंनी ने 6.4-इंचाची सुपरएमोलेड कर्व्ड स्क्रीन दिली आहे. फोनचा कॅमेरा पण खुप दमदार आहे. यात एफ1.5/एफ2.4 वेरियेबल अपर्चर सह 12-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी कॅमेरा 8-मेगापिक्सल चा आहे जो एफ1.7 अपर्चर सह येतो.

The post 8जीबी रॅम सह येणारे 7 दामदार एंडरॉयड स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/top-8gb-ram-phone-in-india-in-marathi/feed/ 0