Xiaomi Redmi 8A Dual - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 11 Feb 2020 12:17:01 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 5000एमएएच बॅटरी आणि डुअल रियर कॅमेऱ्यासह फक्त 6,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला Xiaomi Redmi 8A Dual https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-8a-dual-launched-in-india-two-rear-camera-5000mah-battery-specs-price-sale-availability/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-8a-dual-launched-in-india-two-rear-camera-5000mah-battery-specs-price-sale-availability/#respond Tue, 11 Feb 2020 12:17:01 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6554 Xiaomi Redmi 8A Dual कंपनीने 6,499 रुपयांच्या बेस किंमतीती लॉन्च केला गेला आहे जो येत्या 18 फेब्रुवारी पासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.

The post 5000एमएएच बॅटरी आणि डुअल रियर कॅमेऱ्यासह फक्त 6,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला Xiaomi Redmi 8A Dual first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने गेल्या आठवड्यात भारतीय बाजारात आपला लो बजेट स्मार्टफोन Realme C3 लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन डुअल रियर कॅमेरा आणि 5000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो जो 6,999 रुपयांच्या बेस किंमतीती विकत घेता येईल. Realme C3 ला टक्कर देत भारतातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँड असलेल्या Xiaomi ने पण आपला नवीन एंट्री लेवल स्मार्टफोन Redmi 8A Dual आज भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. Xiaomi Redmi 8A Dual कंपनीने 6,499 रुपयांच्या बेस किंमतीती लॉन्च केला गेला आहे जो येत्या 18 फेब्रुवारी पासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Xiaomi Redmi 8A Dual

स्पेसिफिकेशन्स पाहता Xiaomi Redmi 8A Dual मध्ये 1520 X 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.22 इंचाचा एचडी+ आईपीएस डॉटनॉच डिस्प्ले देण्यात आला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. कंपनीने रेडमी 8ए डुअल पी21आई नॅनो कोटिंगने कवर केला आहे जी फोनला हलक्या फुलक्या पाण्याच्या शिंतोड्यांपासून वाचवते. रेडमी 8ए डुअल कंपनीने ब्लू, वाईट आणि ग्रे कलर वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे तसेच फोनच्या डिजाईनला Xiaomi ने ऑरा ग्रिल एक्स डिजाईनचे नाव दिले आहे.

Xiaomi Redmi 8A Dual एंडरॉयड आधारित मीयूआई वर सादर केला गेला आहे जो 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 439 चिपसेट वर चालतो. शाओमी रेडमी 8ए डुअल दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा पहिला वेरिएंट 2 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. दोन्ही वेरिएंट्सची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Xiaomi Redmi 8A Dual डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर आहे. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. विशेष म्हणजे रेडमी 8ए डुअल च्या फ्रंट आणि रियर दोन्ही कॅमेरा सेंसर्स मध्ये एआई टेक्नॉलॉजी आहे.

Xiaomi Redmi 8A Dual हा एक डुअल सिम फोन आहे ज्यात दोन सिम कार्ड सह एक मेमरी कार्ड पण वापरता येते. हा स्मार्टफोन 4जी वोएलटीई सोबत वोवाई-फाई फीचरला पण सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी हा फोन फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. Xiaomi Redmi 8A Dual मध्ये पावर बॅकअपसाठी 18वॉट सपोर्ट असेलेली 5,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. पण बॉक्स मध्ये 10वॉटचा चार्जर मिळेल. शाओमी रेडमी 8ए डुअल टाईप-सी पोर्टच्या माध्यमातून चार्ज केला जाऊ शकतो तसेच हा फोन रिवर्स चार्जिंग टेक्नॉलॉजी सह पण येतो.

किंमत व सेल

Xiaomi Redmi 8A Dual चा 2 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट कंपनीने 6,499 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे तर फोनचा 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 6,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे. Redmi 8A Dual येत्या 18 फेब्रुवारी पासून शाओमीच्या अधिकृत वेबसाइट सोबतच अमेझॉन इंडिया वर विक्रीसाठी उपलब्ध होईल. तसेच कंपनीने सांगितले आहे कि येत्या काही दिवसांत हा स्मार्टफोन ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण उपलब्ध होईल.

The post 5000एमएएच बॅटरी आणि डुअल रियर कॅमेऱ्यासह फक्त 6,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला Xiaomi Redmi 8A Dual first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-8a-dual-launched-in-india-two-rear-camera-5000mah-battery-specs-price-sale-availability/feed/ 0