Xiaomi Redmi K30s - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 16 Oct 2020 14:50:42 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Xiaomi घेऊन येत आहे अजून एक पावरफुल फोन Redmi K30s, स्पेसिफिकेशन्स सह वेबसाइट वर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-k30s-m2007j3sc-listed-on-tenna-specs-leak/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-k30s-m2007j3sc-listed-on-tenna-specs-leak/#respond Fri, 16 Oct 2020 14:50:42 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8559 फोटोग्राफीसाठी Xiaomi Redmi K30s मध्ये क्वॉड रियर कॅमेरा असल्याचे समोर आले आहे.

The post Xiaomi घेऊन येत आहे अजून एक पावरफुल फोन Redmi K30s, स्पेसिफिकेशन्स सह वेबसाइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने टेक मार्केट मध्ये आपल्या ‘रेडमी 30 सीरीज’ चे अनेक स्मार्टफोन्स बाजारात आणले आहेत. Redmi K30 Ultra, Redmi K30i आणि Redmi K30 Pro सारख्या हिट डिवाईसेज नंतर आता कंपनी या सीरीज मध्ये अजून एक नवीन फोन जोडण्याचे प्लानिंग करत आहे. रेडमी के30 सीरीजच्या या नवीन स्मार्टफोनचे नाव Redmi K30s असल्याचे बोलले जात आहे जो येत्या काही दिवसांत बाजारात येईल. पण फोन लॉन्चच्या आधीच सर्टिफिकेशन्स साइट टेना वर Redmi K30s च्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे.

Redmi K30s चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेना वर M2007J3SC मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. या लिस्टिंग मध्ये फोनच्या जवळपास सर्व महत्वाच्या स्पेसिफिकेशन्स सोबतच फोनचा फोटो पण सार्वजनिक करण्यात आला आहे. टेना वरील रेडमी के30एस फोटो मध्ये कालच भारतात लॉन्च झालेल्या Xiaomi Mi 10T सारखा दिसत आहे. फोनच्या बॅक पॅनल वरील रियर कॅमेरा सेटअप मी10टी सारख्या डिजाईन मध्ये देण्यात आला आहे.

Xiaomi Redmi K30s

टेना वर स्पॉट झालेल्या कथित रेडमी के30एस चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता लिस्टिंग मध्ये हा फोन 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.67 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले सह दाखवण्यात आला आहे. टेनानुसार फोनची स्क्रीन एलटीपीएस पॅनल वर बनलेली असेल. लिस्टिंग मध्ये फोनचे डायमेंशन 165.1×76.4×9.33एमएम आणि वजन 216 ग्राम असेल.

Redmi K30s टेना वर अँड्रॉइड 10 ओएस सह लिस्ट झाला आहे ज्या सोबत प्रोसेसिंगसाठी फोन मध्ये 2.84गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट असल्याचे सांगण्यात आले आहे. सर्टिफिकेशन्स साइट वर हा फोन तीन वेरिएंट्स मध्ये येईल, ज्यात 128जीबी स्टोेरेज, 256जीबी स्टोरेज आणि 512जीबी स्टोरेजचा समावेश आहे. टेना वर स्पष्ट झाले नाही कि शाओमी रेडमी के30एस किती जीबी रॅमला सपोर्ट करेल.

फोटोग्राफीसाठी Xiaomi Redmi K30s मध्ये क्वॉड रियर कॅमेरा असल्याचे समोर आले आहे. लिस्टिंगनुसार हा मोबाईल फोन 64 मेगापिक्सलच्या प्राइमरी रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर 20 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. पावर बॅकअपसाठी शाओमी रेडमी के30एस मध्ये 5,000एमएएच ची बॅटरी असल्याचे लीक मध्ये समोर आले आहे. शाओमी रेडमी के30एस च्या ठोस स्पेसिफिकेशन्ससाठी कंपनीच्या घोषणेची वाट बघावी लागले.

The post Xiaomi घेऊन येत आहे अजून एक पावरफुल फोन Redmi K30s, स्पेसिफिकेशन्स सह वेबसाइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-k30s-m2007j3sc-listed-on-tenna-specs-leak/feed/ 0