Xiaomi Redmi Note 9 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 16 Mar 2020 14:31:30 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 23 मार्चला लॉन्च होईल Xiaomi चा नवीन फोन Redmi Note 9S https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-9s-to-launch-on-23-march-in-malaysia-punch-hole-display-specs-price/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-9s-to-launch-on-23-march-in-malaysia-punch-hole-display-specs-price/#respond Mon, 16 Mar 2020 14:31:30 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6804 हैराणीची बाब म्हणजे मलेशिया मध्ये कंपनी Redmi Note 9 Pro किंवा Redmi Note 9 Pro Max नाही तर Redmi Note 9S स्मार्टफोन लॉन्च करेल.

The post 23 मार्चला लॉन्च होईल Xiaomi चा नवीन फोन Redmi Note 9S first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने गेल्या आठवड्यात भारतीय बाजारात आपल्या ‘रेडमी नोट’ सीरीजचा विस्तार करत दोन नवीन स्मार्टफोन Redmi Note 9 Pro आणि Redmi Note 9 Pro Max लॉन्च केले आहेत. हे फोन जगात सर्वात आधी भारतात लॉन्च झाले आहेत जे आता वेगवेगळ्या तारखांना जगातील इतर बाजारांत एंट्री घेतील. रेडमी नोट सीरीज शाओमी आता मलेशिया मध्ये सादर करण्याची तयारी करत आहे जिथे 23 मार्चला नवीन Redmi Note 9 डिवाईस येईल. पण सर्वात जास्त हैराणीची बाब म्हणजे मलेशिया मध्ये कंपनी Redmi Note 9 Pro किंवा Redmi Note 9 Pro Max नाही तर Redmi Note 9S स्मार्टफोन लॉन्च करेल.

शाओमी ने मलेशिया मध्ये रेडमी नोट 9 सीरीजच्या लॉन्चची घोषणा केली आहे. कंपनीने सांगितले आहे कि येत्या 23 मार्चला हि सीरीज मलेशियन मार्केट मध्ये सादर केली जाईल. शाओमीने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर टीज करायला सुरवात केली आहे कि 23 तारखेला कंपनी सीरीज अंतर्गत Redmi Note 9S स्मार्टफोन लॉन्च करेल. हा फोन भारतात लॉन्च झालेल्या नोट 9 सीरीजच्या दोन्ही फोन्स पेक्षा वेगळा असू शकतो. सोशल मीडिया वर शेयर झालेल्या फोटोज मध्ये रेडमी नोट 9एस चा फ्रंट पॅनल दाखवण्यात आला आहे जो डिस्प्लेच्या बाबतीत रेडमी नोट 9 स्मार्टफोन्स सारखा असेल आहे आणि यात पण पंच-होल डिस्प्ले व साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

Redmi Note 9 Pro Max

या फोन मध्ये 6.67-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 720G प्रोसेसर देण्यात आला आहे. डिवाइस मध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. तर फोटोग्राफीसाठी फोन मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप आहे. यात रियर वर 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 5 मेगापिक्सलचा मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोन मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 5020एमएएच ची बॅटरी आहे जी 33 वॉट की फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येते.

Redmi Note 9 Pro Max च्या 6GB रॅम व 64GB स्टोरेजची किंमत 14,999 रुपये, 6GB रॅम व 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 16,999 रुपये, 8GB रॅम व 128GB स्टोरेज वेरिएंटची 18,999 किंमत रुपये आहे. तसेच या डिवाइसची विक्री 25 मार्चला मी.कॉम आणि अमेझॉन वर होईल. तसेच डिवाइस मी होम वर पण विक्रीसाठी 25 मार्चला उपलब्ध होईल.

Redmi Note 9 Pro

रेडमी नोट 9 प्रो मध्ये 6.67-इंचाचा पंच-होल फुल स्क्रीन डिस्प्ले HD+ देण्यात आला आहे. फोन एंडरॉयड 10 वर आधारित आहे आणि सोबतच कंपनीने 2.3GHz क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 720G ऑक्टा-चिपसेट दिला आहे. रेडमी नोट 9 प्रो मध्ये मागे 48 मेगापिक्सल असलेला सॅमसंग ISOCELL GM2 प्राइमरी सेंसर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेंसर, 5 मेगापिक्सल मॅक्रो लेंस आणि 2मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा एआई सेंसर देण्यात आला आहे. Redmi Note 9 Pro मध्ये 18 वॉटची फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,020 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

Redmi Note 9 Pro दोन रॅम व स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे. हँडसेटच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 12,999 रुपये आहे. तसेच 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे. फोन कंपनीने Interstellar Black, Aurora Blue आणि Glacier White कलर ऑप्शन मध्ये सादर केला आहे. डिवाइसची विक्री उद्या म्हणजे 17 मार्चला अमेझॉन इंडिया आणि मी.कॉम सह मी होम वर केली जाईल.

The post 23 मार्चला लॉन्च होईल Xiaomi चा नवीन फोन Redmi Note 9S first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-9s-to-launch-on-23-march-in-malaysia-punch-hole-display-specs-price/feed/ 0
5020 mAh बॅटरी, 6GB रॅम आणि 48MP कॅमेऱ्यासह आला Redmi Note 9 Pro https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-9-pro-launch-india-48mp-rear-camera-16mp-selfie-camera-5020-mah-battery-four-rear-camera-price-sale-specification-amazon-india/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-9-pro-launch-india-48mp-rear-camera-16mp-selfie-camera-5020-mah-battery-four-rear-camera-price-sale-specification-amazon-india/#respond Thu, 12 Mar 2020 12:14:24 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6767 Redmi Note 9 Pro कंपनीने Aura बॅलेंस डिजाइन सह सादर केला आहे.

The post 5020 mAh बॅटरी, 6GB रॅम आणि 48MP कॅमेऱ्यासह आला Redmi Note 9 Pro first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमीने आपली रेडमी नोट सीरीज वाढवत नवीन स्मार्टफोन Redmi Note 9 Pro आणि Note 9 Pro Max भारतात लॉन्च केला आहे. या डिवाइस बद्दल कंपनी अनेक दिवसांपासून टीज करत होती, जो आज अधिकृतपणे सादर करण्यात आला आहे. दोन्ही फोन्सची डिजाइन एकसारखी आहे. पण या रॅम स्टोरेज आणि कॅमेऱ्याचा फरक आहे. चला पुढे जाणून घेऊया फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स सोबतच डिजाइन बद्दल सर्वकाही.

शानदार डिजाइन

Redmi Note 9 Pro कंपनीने Aura बॅलेंस डिजाइन सह सादर केला आहे. फोनच्या फ्रंट आणि बॅकला गोरिल्ला ग्लास 5 चे प्रोटेक्शन देण्यात आले आहे. तसेच डिवाइस स्प्लॅश फ्रूफ P2i सह येतो, ज्याचा अर्थ असा कि पाण्याच्या शिंतोड्यांनी फोन खराब होणार नाही. फोनच्या फ्रंट पॅनल विषयी बोलायचे तर हा पंच होल सह सादर केला गेला आहे जो फोनच्या मधोमध आहे. तसेच बॉटम सोडून फोनचा डिस्प्ले खूप कमी बेजल्स सह येतो. डिवाइसच्या बॉटमला थोडा जाड बेजल, टाइप-सी चार्जिंग पोर्ट आणि स्पीकर ग्रिल्स आहे.

तसेच उजवीकडे साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे जो पावर बटणचे काम करेल. त्याच्यावर वॉल्यूम रॉकर बटण आहे. डावीकडे सिम-कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. आता बोलूया फोनच्या बॅक पॅनल बाबत. डिवाइस मध्ये तुम्हाला चौकोनी क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळेल, ज्याच्या खाली एलईडी फ्लॅश लाइट आहे. तसेच मागे रेडमीची ब्रॅण्डिंग दिसत आहे.

दमदार कॅमेरा

फोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने रेडमी नोट 9 प्रो मध्ये आतापर्यंत आपल्या कोणत्याही फोन मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप अशाप्रकारे नव्हता दिला. असा कॅमेरा सेटअप सर्वात आधी Huawei Mate 20 Pro मध्ये दिसला होता. फोनच्या कॅमेऱ्याबाबत बोलायचे तर यात मागे 48 मेगापिक्सलचा सॅमसंग ISOCELL GM2 प्राइमरी सेंसर f/1.79 अपर्चर सह देण्यात आला आहे जो सुपर स्टेबलाइजेशन, पीडीएएफ, स्लो-मोशन आणि 4K वीडियो रेकॉर्डिंग 30fps वर रेकॉर्ड करतो. तसेच सेटअप मध्ये 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेंसर 120-डिग्री फिल्ड-ऑफ-व्यू, 5 मेगापिक्सल मॅक्रो लेंस आणि 2MP डेप्थ सेंसर आहे. डिवाइस मध्ये सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा एआई सेंसर देण्यात आला आहे.

पावरफुल बॅटरी

शानदार डिजाइन आणि दमदार कॅमेऱ्यासह फोन मध्ये पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे. Redmi Note 9 Pro मध्ये पावर बॅकअपसाठी 5,020 एमएएच ची =बॅटरी देण्यात आली आहे. फोन मधील बॅटरी 18 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच फोन सह बॉक्स मध्ये 18 वॉटचा फास्ट चार्जर आहे.

नाविक सपोर्ट

अलीकडेच कंपनीने सांगितले होते कि रेडमी ब्रँड मधील नवीन फोन नाविक सपोर्ट सह सादर केला जाईल. हि भारताची नेविगेशन सिस्टम आहे. नाविक भारताची सॅटेलाइट नेविगेशन सिस्टम आहे. जशी अमेरिकेकडे जीपीएस आहे, रशियाकडे ग्लोनॉस आहे, यूरोप कडे गॅलीलियो आहे, चीन कडे बायडू (BeiDou) नेविगेशन सिस्टम आहे, तशीच भारताकडे नाविक (NavIC) आहे. नाविक नेविगेशनच्या माध्यमातून पाच मीटर पर्यंत अचूक माहिती मिळवता येईल.

स्पेसिफिकेशन्स

Redmi Note 9 Pro मध्ये 6.67-इंचाचा पंच-होल फुल स्क्रीन डिस्प्ले HD+ देण्यात आला आहे. या डिस्प्ले मध्ये (1080 x 2,400p) रिजोल्यूशन आणि 20:9 आस्पेक्ट रेश्यो मिळतो. त्याचबरोबर फोन मध्ये कंपनीने 2.3GHz क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 720G ऑक्टा-चिपसेट दिला आहे. फोन मध्ये 4GB रॅम सह 64GB इंटरनल स्टोरेज आणि 6GB रॅम सह 128GB ची स्टोरेज देण्यात आली आहे. माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने फोनची स्टोरेज 512GB पर्यंत वाढवता येते.

कनेक्टिविटी फीचर्स म्हणून Redmi Note 9 Pro मध्ये 4G एलटीई, डुअल सिम स्लॉट, वाई-फाई, ब्लूटूथ 5.0, जीपीएस/ GLONASS, वीवाईफाई, 3.5एमएम हेडफोन जॅक आणि यूएसबीटाइस-सी चार्जिंग पोर्ट सारखे ऑप्शन आहेत. त्याचबरोबर फोन एंडरॉयड 10 वर आधारित आधिरत आहे.

किंमत आणि सेल

शाओमीने रेडमी नोट 9 प्रो दोन रॅम व स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे. हँडसेटच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 12,999 रुपये आहे. तर 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे. फोन कंपनीने Interstellar Black, Aurora Blue आणि Glacier White कलर ऑप्शन मध्ये सादर केला आहे. डिवाइसची विक्री 17 मार्चला अमेझॉन इंडिया आणि मी.कॉम सोबतच मी होम वर केली जाईल. तसेच कंपनी लवकरच फोन ऑफलाइन प्लॅटफॉर्म वर या डिवाइसची विक्री करेल.

The post 5020 mAh बॅटरी, 6GB रॅम आणि 48MP कॅमेऱ्यासह आला Redmi Note 9 Pro first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-9-pro-launch-india-48mp-rear-camera-16mp-selfie-camera-5020-mah-battery-four-rear-camera-price-sale-specification-amazon-india/feed/ 0