Xolo Era 5X - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 10 Jan 2019 06:30:31 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 झोलो ईरा 4एक्स आणि ईरा 5एक्स या शानदार फीचर्स सह झाले लॉन्च, बघा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/xolo-era-4x-goes-on-sale-in-india-android-go-variant-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xolo-era-4x-goes-on-sale-in-india-android-go-variant-in-marathi/#respond Thu, 10 Jan 2019 06:30:31 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3339 झोलो ईरा 4एक्स च्या 1जीबी रॅम वेरिएंटची किंमत 4,444 रुपये आणि 2जीबी रॅम वेरिएंटची किंमत 5,555 रुपये आहे.

The post झोलो ईरा 4एक्स आणि ईरा 5एक्स या शानदार फीचर्स सह झाले लॉन्च, बघा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतीय स्मार्टफोन निर्माता कंपनी लावाच्या ब्रँड झोलो ने नुकताच ई-कॉमर्स वेबसाइट वर आपला किफायतीशीर स्मार्टफोन ईरा 4एक्स लिस्ट केला होता. या लिस्टिंग मध्ये तेव्हा रॅम आणि स्टोरेज बद्दल कोणतीही माहिती नव्हती. पण काल कंपनी ने एका इवेंट मधून डिवाइसचे दोन वेरिएंट ऑफिशियली सादर केले आहेत. भारतीय मोबाईल बाजारात एक किफायती स्मार्टफोन सादर करून वर्षाची सुरवात करून कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.

झोलो ईरा 4एक्स च्या 1जीबी रॅम वेरिएंटची किंमत 4,444 रुपये आणि 2जीबी रॅम वेरिएंटची किंमत 5,555 रुपये आहे. कंपनी ने इवेंट मध्ये डिवाइसचा 3जीबी वेरिएंट सादर करणार असल्याची माहिती दिली आहे जे येत्या काही दिवसांत सादर केला जाईल. झोलो ईरा 4एक्स ची विक्री ई-कॉमर्स वेबसाइट अमेझॉन इंडिया वर 9 जानेवारी म्हणजे काल पासून सुरु झाली आहे. तसेच फोन सह एक शानदार ऑफर सादर दिली जात आहे, ज्यांतर्गत 30 दिवसांत फोन परत केला जाऊ शकतो.

स्मार्टफोनची खासियत पाहता या किंमतीती कंपनी ने ईरा 4एक्स मध्ये फिंगरप्रिंट सेंसर ऐवजी फेस अनलॉक दिला जात आहे. कनेक्टिविटी साठी फोन मध्ये डुअल 4जी वीओएलटीई सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच झोलो ईरा 4एक्स एंड्रॉयड 8.1 ओरियो वर चालेल.

झोलो ने या डिवाइस साठी जियो सोबत भागेदारी केली आहे. या भागेदारी अंतर्गत 1,200 रुपयांचा इन्स्टंट कॅशबॅक आणि 50जीबी अतिरिक्त डेटा मिळेल. यासाठी यूजर्सना 198/299 चा रिचार्ज करावा लागेल, त्यानंतर यूजर्सना माएजियो अकाउंट मध्ये 24 वाउचर (50 रुपयांचे) मिळतील. हे वाउचर नंतर रिचार्जच्या वेळी वापरता येतील.

झोलो ईरा 4एक्स स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 5.45 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच डिस्प्ले 18:9 आस्पेक्ट रेशियो आणि 2.5डी कर्व्ड कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन सह येतो. एंडरॉयड गो एडिशन वर आधारित या फोन मध्ये कंपनी ने 1जीबी रॅम व 2जीबी रॅम सह 16जीबी इंटरनल स्टोरेज दिली आहे. फोटोग्राफी साठी झोलो ईरा 4एक्स मध्ये रियर वर 8-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे जो एलईडी फ्लॅश सह येतो. फ्रंट पॅनल वर सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी फ्लॅश सह 5-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. फ्रंट कॅमेऱ्याच्या मदतीने युजर आपला फोन फेस अनलॉक करू शकतात. तसेच पावर बॅकअप साठी झोलो ईरा 4एक्स मध्ये 3,000 एमएएच ची बॅटरी आहे आणि हि स्टॅन्डर्ड चार्जिंग सपोर्ट सह येते.

इवेंट मध्ये कंपनी ने आपल्या ईरा 5एक्स ची पण घोषणा केली आहे. पण डिवाइसची किंमत आणि उपलब्धता याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही. कंपनी ने झोलो ईरा 5एक्स चे स्पेसिफिकेशन्स सांगितले आहेत.

झोलो ईरा 5एक्स चे स्पेसिफिकेशन्स
ईरा 5एक्स बद्दल बोलायचे तर यात 5.7-इंच एचडी+ आईपीएस इनसेल डिस्प्ले देण्यात आला आहे. सोबत यात हेलियो ए22 2.0 गीगाहर्ट्ज क्वार्ड कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. स्मार्टफोन मध्ये 3जीबी रॅम व 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे.

फोटोग्राफी साठी फोन मध्ये फ्लॅश लाइट सह 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी पण फोन मध्ये 13-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. एंडरॉयड 8.1 ओरियो ऑपरेटिंग सिस्टम वर आधारित फोन मध्ये कनेक्टिविटी साठी डुअल सिम 4जी वीओएलटीई देण्यात आला आहे. तसेच सिक्योरिटी साठी फोन मध्ये फिंगरप्रिंट सेंसर सोबत फेस अनलॉकचा ऑप्शन आहे. डिवाइसची किंमत आणि उपलब्धता यासाठी आपल्याला वाट बघावी लागेल.

The post झोलो ईरा 4एक्स आणि ईरा 5एक्स या शानदार फीचर्स सह झाले लॉन्च, बघा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xolo-era-4x-goes-on-sale-in-india-android-go-variant-in-marathi/feed/ 0