Yu - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 30 Aug 2018 12:20:34 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 5,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला माइक्रोमॅक्स चा यू ऐस https://www.91mobiles.com/marathi/micromax-yu-ace-launched-5999-price-features-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/micromax-yu-ace-launched-5999-price-features-specifications-in-marathi/#respond Thu, 30 Aug 2018 12:20:34 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1883 यू ऐस फ्लॅश सेल च्या माध्यामातून विकण्यात येईल तसेच याचा पहिला सेल 6 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता आयोजित होईल.

The post 5,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला माइक्रोमॅक्स चा यू ऐस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
माइक्रोमॅक्स च्या सब-ब्रांड यू आज जवळपास एका वर्षानंतर भारतीय बाजारात परत आला आहे. यू माइक्रोमॅक्स चा आॅनलाईन ब्रँड आहे आणि या ब्रँड ने देशात नवीन स्मार्टफोन यू ऐस नावाने लॉन्च केला आहे. यू ऐस 2 वेरिएंट्स मध्ये लॉच करण्यात आला आहे. फोन ची बेस किंमत 5,999 रुपये आहे जो शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल. यू ऐस फ्लॅश सेल च्या माध्यामातून विकण्यात येईल तसेच याचा पहिला सेल 6 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता आयोजित होईल.

यू ऐस च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाले तर हा फोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे तसेच यात 5.45-इंचाचा एचडी+ फुलव्यू डिस्प्ले देण्यात आला आहे. यू ऐस एंडरॉयड ओरियो वर सादर करण्यात आला आहे ​जो 28एनएम क्वॉड-कोर प्रोसेसेर सह मीडियाटेक एमटी6738 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये माली-टी860 जीपीयू आहे.

कंपनी ने यू ऐस दोन वेरिएंट्स मध्ये सादर केला आहे. एक वेरिएंट 2जीबी रॅम सह 16जीबी इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो तर दुसर्‍या वेरिएंट मध्ये 3जीबी रॅम सोबत 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी साठी फोन मध्ये 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे ज्या सोबत एलईडी फ्लॅश आहे.

यू ऐस च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचर ला पण सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह फोन मध्ये पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 22 क्षेत्रिय भाषांमध्ये काम करू शकतो. कंपनी ने फोन चे रोज गोल्ड, इलेक्ट्रीक ब्लू आणि चारकोल ग्रे असे कलर वेरिएंट बाजारात आणले आहेत.

यू ऐस चा 2जीबी/16जीबी वेरिएंट 5,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे तसेच 3जीबी/32जीबी वेरिएंट च्या किंमतीची माहिती मिळाली नाही. यू ऐस चा पहिला फ्लॅश सेल फ्लिपकार्ट वर 6 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता सुरू होईल तर दुसरा फ्लॅश 13 सप्टेंबरला आयोजित करण्यात येईल.

The post 5,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला माइक्रोमॅक्स चा यू ऐस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/micromax-yu-ace-launched-5999-price-features-specifications-in-marathi/feed/ 0