Zte Axon 9 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 31 Aug 2018 12:32:39 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 4,000एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम सह लॉन्च झाला झेडटीई एक्सॉन 9 प्रो https://www.91mobiles.com/marathi/zte-axon-9-pro-launched-snapdragon-845-feature-specification-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/zte-axon-9-pro-launched-snapdragon-845-feature-specification-price-in-marathi/#respond Fri, 31 Aug 2018 12:15:41 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1897 झेडटीई चा हा फोन जर्मनी मध्ये सर्वात आधी विक्री साठी उपलब्ध होईल तसेच फोन च्या भारत लॉन्च बद्दल अजूनतरी माहिती मिळाली नाही.

The post 4,000एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम सह लॉन्च झाला झेडटीई एक्सॉन 9 प्रो first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आईएफए 2018 चा मंच टेक कंपन्यांना नवनवीन टेक्नोलॉजी प्रदर्शित करण्याची संधी देत आहे तसेच अनेक ब्रँडस या मंचावरून स्मार्टफोन बाजारात वापसी पण करत आहेत. बर्लिन मध्ये आयोजित या इवेंट मधून चीनी टेक कंपनी झेडटीई ने पण आपली एक्सॉन सीरीज परत आणली आहे. झेडटीई ने एक्सॉन 9 प्रो स्मार्टफोन लॉन्च केला आहे. ज्याची अंर्तराष्ट्रीय किंमत 650 यूरो म्हणजे जवळपास ​53,900 रुपये ठेवण्यात आली आहे.

झेडटीई एक्सॉन 9 प्रो कंपनी ने दोन वर्षापूर्वी लॉन्च केलेल्या स्मार्टफोन एक्सॉन 7 चा पुढील वर्जन आहे. फोन चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन बेजल लेस नॉच डिस्प्ले सह रियर ग्लास बॉडी वर सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 18.7:9 आस्पेक्ट रेशियो वाला 6.21-इंचाचा एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालतो.

कंपनी ने या फोन मध्ये 6जीबी रॅम तसेच 128जीबी इंटरनल स्टोरेज दिली आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता एक्सॉन 9 प्रो डुअल रियर कॅमेराला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर 12-मेगापिक्सल आणि 20-मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. तसेच सेल्फी साठी फोनच्या फ्रंट पॅनल वर 20-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

झेडटीई एक्सॉन 9 प्रो 4जी फोन आहे जो बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर पावर बॅकअप साठी हा फोन 4,000एमएएचच्या बॅटरी ला सपोर्ट करतो ज्यात क्विक चार्ज 4.0 आहे. झेडटीई चा हा फोन जर्मनी मध्ये सर्वात आधी विक्री साठी उपलब्ध होईल तसेच फोन च्या भारत लॉन्च बद्दल अजूनतरी माहिती मिळाली नाही.

The post 4,000एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम सह लॉन्च झाला झेडटीई एक्सॉन 9 प्रो first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/zte-axon-9-pro-launched-snapdragon-845-feature-specification-price-in-marathi/feed/ 0