Categories: बातम्या

वोडाफोन-आ​इडिया च्या रिचार्ज वर मिळेल 375 रुपयांचा फायदा, जाणून घ्या कसा घ्यावा लाभ

देशातील टेलीकॉम बाजारातील सध्याची सर्वात मोठी खबर म्हणजे वोडाफोन आणि आइडिया यांचे एकत्र येणे. या दोन्ही कंपन्या एकत्र आल्यामुळे इतर कंपन्यांच्या स्पर्धेत वाढ झाली आहे तसेच आता वोडाफोन-आइडिया देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी पण बनली आहे. या मर्जर नंतर आपल्या यूजर्सना भेट देत वोडाफोन-आ​इडिया ने एक शानदार आॅफर सादर केली आहे ज्यात ग्राहकांना प्रत्येक रिचार्ज वर 375 रुपयांचे वाउचर आणि 25 रुपयांचा कॅशबॅक मिळत आहे.

वोडाफोन-आ​इडिया ने आपल्या या आॅफर साठी डिजीटल वॉलेट पेटीएम सोबत हात मिळवणी केली आहे. या आॅफर अंतर्गत वोडाफोन व आइडिया च्या यूजर्सना पेटीएम वरून रिचार्ज केल्यावर 25 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. फक्त इतकेच नव्हे तर या कॅशबॅक सोबत वोडाफोन-आ​इडिया ग्राहकांना कंपनी 375 रुपयांचे वाउचर पण मिळेल ज्याचा वापर इतर शॉपिंग सह मुवि तिकीट बुक करण्यासाठी पण करता येईल.

पेटीएम वर 25 रुपयांचा कॅशबॅक नवीन यूजर्सना पहिल्या रिचार्ज वर मिळेल तर जुन्या पेटीएम यूजर्सना कंपनी 20 रुपयांचा कॅशबॅक देईल. वोडाफोन-आ​इडिया यूजर्सना या आॅफरचा लाभ कमीत कमी 149 रुपयांच्या प्लानने रिचार्ज केल्यास मिळेल. विशेष म्हणजे वोडाफोन आणि आ​इडिया दोन्ही कंपन्यांनी 199 रुपयांचा एक प्लान सादर केला आहे जो 28 दिवसांच्या वॅलेडीटी सह येतो.

या प्लान मध्ये कंपनी संपूर्ण महिन्यासाठी अनलिमिटेड वॉयस कॉलिंगची सुविधा देत आहे. या फ्री वॉयस कॉल्सचा वापर देशातील कोणत्याही नंबर वर मोफत करता येईल तसेच रोमिंग मध्ये पण हे कॉल फ्री असतील. या सोबतच वोडाफोन आणि आ​इडिया आपल्या यूजर्सना रोज 1.4 जीबी 4जी डेटा पण देत आहे. यूजर 1 महिन्यात 39.2 जीबी डेटा वापरू शकतात. त्याचबरोबर ग्राहकांना रोजचे 100 एसएमएस पण मिळतील.

Published by
Siddhesh Jadhav