Categories: बातम्या

अमेझॉन वरून मागवली होती 34,000 हजारांची म्युजिक सिस्टम, बॉक्स मधून निघाला नारळ!

या महिन्याच्या सुरवातीला देशातील नामी शॉपिंग साइट अमेझॉनचे नाव हेडलाईन्स मध्ये होते. या हेडलाईन्स चे कारण कोणताही शॉपिंग सेल किंवा रेकॉर्ड तोड विक्री हे नव्हते, तर कारण होते अमेझॉन वरून मागवलेल्या फोनच्या बॉक्स मधून निघणारे साबण. अमेझॉन वर आरोप लागले होते कि वेबसाइट वरून पैसे देऊन स्मार्टफोन मागवल्यावर फोनच्या बॉक्स मधून साबण डिलीवर करण्यात आला होता. या घटनेमुळे अमेझॉन वर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. पण आता असे वाटते कि अमेझॉन वर लागलेले डाग कमी होणार नाहीत. हे प्रकरण अजून संपले नव्हते कि पुन्हा एकदा अमेझॉन च्या नावे अजून एकफसवणुकीची केस झाली आहे. नवीन प्रकरणात अमेझॉन वरून मागवलेल्या सामानात 34,000 रुपयांच्या म्युजिक सिस्टम ऐवजी ‘नारळ’ निघाला आहे.

दिल्ली मधील ऋषभ गुलाटी ने 14 नोव्हेंबरला अमेझॉन इंडिया वरून एक म्युजिक सिस्टम आॅर्डर केली होती. हि म्युजिक सिस्टम बॉस कंपनीची होती जिची किंमत 33,638 रुपये होती. ऋषभ ने वेबसाइट वर म्युजिक सिस्टम आॅर्डर देताना सर्व पैसे दिले होते. एका दिवसानंतर म्हणजे 15 नोव्हेंबरला अमेझॉन ने हि म्युजिक सिस्टम दिल्लीतील महाराणी बाग भागातील ऋषभ च्या घरात डिलीवर केली.

अमेझॉन कडून डिलीवर केल्यानंतर ऋषभ ने म्युजिक सिस्टमचा बॉक्स खोलातच तो हैराण झाला. अमेझॉनची पॅकिंग असलेल्या बॉक्स मध्ये म्युजिक सिस्टम नसून म्युजिक सिस्टम च्या जागी काही जुनी रद्दी कपड़े आणि दोन नारळ होते. म्युजिक सिस्टमचा बॉक्स हलका वाटू नये आणि संशय येऊ नये यासाठी त्या बॉक्स मध्ये दोन नारळ ठेवण्यात आले होते जे त्या बॉक्सला वजनदार बनवत होते.

ऋषभ ने आपल्या सोबत घडलेली हि घटना सोशल नेटवर्किंग साइट फेसबुक वर पोस्ट केली आहे आणि सोबतच त्यात अमेझॉन इंडियाला पण टॅग केले आहे. बातमी लिहिस्तोवर अमेझॉन ने ऋषभ शी कोणताही संपर्क केला नव्हता. 33,638 रुपयांची मोठी रक्कम दिल्यानंतर अशा प्रकारचा धोका झाल्यामुळे ऋषभ ला फसवणूक झाल्यासारखे वाटत आहे. पण अमेझॉन अशा प्रकारच्या फ्रॉड वर काय पाऊले उचलेले हे सजुनती सांगता येणार नाही. परंतु अशाप्रकारच्या आॅनलाईन फसवणुकीची प्रकरणे सतत वाढत असल्यामुळे एकीकडे आॅनलाईन शॉपिंग वरून लोकांचा विश्वास उडत चालला आहे तर दुसरीकडे डिजीटल इंडिया सारख्या घोषणांचा स्वर पण कमी होताना दिसत आहे.

Published by
Siddhesh Jadhav