Categories: बातम्या

आयफोन 10 मध्ये लागली आग, ऍप्पलच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

स्मार्टफोन मध्ये आग लागणे व ब्लास्ट होण्याच्या घटना थोड्या थोड्या दिवसांनी समोर येत असतात. भारत व जगातील इतर देशांतून फोन मध्ये आग लागण्याची आणि धमाका होण्याच्या बातम्या येत असतात, तशी तशी स्मार्टफोन यूजर मध्ये भीती वाढते. सॅमसंग पासून शाओमी आणि ऍप्पल सारखे ब्रँड पण असा दुर्घटनांपासून लांब राहत नाहीत. जगातील सारत मोठी आणि स्टेटस सिंबल म्ह्णून ओळखली जाणारी कंपनी ऍप्पल एकदा पुन्हा फोन ब्लास्टच्या दुर्घटनेत अडकली आहे. यावेळी हि घटना जरा जास्त कडू आणि मोठी आहे कारण ज्या फोन मध्ये ब्लास्ट झाला आहे तो ऍप्पलचा सर्वात हिट स्मार्टफोन आयफोन 10 आहे.

ऍप्पल आयफोन 10 मध्ये आग लागण्याची हि घटना अमेरिकेतील वाशिंग्टन मधील आहे. आयफोन यूजरने आपल्या ट्वीटर हँडल वरून याची माहिती सार्वजनिक केली आहे. आयफोन यूजरचे नाव राहेल मोहम्मद आहे ज्याच्या आयफोन 10 मध्ये आग लागल्यामुळे ऍप्पलला कोर्टात खेचले आहे. मोहम्मद ने अपने ट्वीट मध्ये जळालेल्या आयफोन 10 चे फोटोज शेयर करत सांगितले आहे कि त्याच्या आयफोन 10 मध्ये फोन आईओएस 12.1 वर अपडेट होत असताना आग लागली.

मोहम्मद ने काळ रात्री जळालेल्या आयफोन 10 चे फोटो इंटरनेट वर शेयर केले आहेत. मोहम्मद ने गॅजेट 360 ला सांगितले कि त्याचा आयफोन एक्स फक्त 10 महीने जुना आहे. त्याच्या आयफोन मध्ये नवीन आईओएस 12.1 चा अपडेट आला होता. त्याने फोन मध्ये अपडेट प्रोसेस सुरु करून तो चार्जिंग वर लावला. अपडेट मध्ये मोहम्मद ने फोन हातात पकडलेला होता. काही सेकंदात फोन गरम झाला, यूजर ने फोन हातातून सोडताच आयफोन 10 मधून धूर येऊ लागला आणि मग फोन मध्ये आग लागली.

आयफोन 10 मध्ये आग लागल्याच्या या घटनेमुळे यूजरला कोणतीही हानी पोचली नाही पण या घटनेने ऍप्पल वर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. कंपनी ने घटनेची माहिती मिळताच यूजरशी कॉन्टेक्ट केला आहे आणि त्याला नवीन आयफोन 10 देणार असल्याचे सांगितले आहे. आयफोन 10 ऍप्पल ने आयफोन च्या दहाव्या वर्धापनदिनी लॉन्च केला होता आणि या फोन नंतर स्मार्टफोन मध्ये नॉच तसेच वर्टिकल ​शेप असलेल्या रियर कॅमेऱ्याचा ट्रेंड झाला होता.

Published by
Siddhesh Jadhav