बीएसएनएल ने सादर केले 99 रुपये आणि 319 रुपयांचे दोन नवीन प्लान्स, जाणून घ्या सर्व बेनिफिट

देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी एयरटेल ने काही दिवसांपूर्वी 129 रुपयांचा नवीन प्लान सादर केला आहे जो 28 दिवसांसाठी इंटरनेट डाटा व वॉयस कॉल सह हॅलो ट्यून फ्री देतो. बाजारातील या प्राइस वॉर मध्ये आता सरकारी टेलीकॉम कंपनी भारतीय संचार निगम लिमिटेड ने पण दोन नवीन प्लान सादर केले आहेत. कंपनी ने 99 रुपये आणि 319 रुपयांचे दोन प्लान सादर केले आहेत जे प्री-पेड ग्राहकांना अनलिमिडेट बेनिफिट देतात.

बीएसएनएल ने सादर केलेले हे दोन्ही प्लान प्रीपेड कस्टमर्स साठी आहेत. कपंनी ने आपले दोन्ही नवीन प्लान वॉयस पॅक च्या रुपात सादर केले आहेत जे अनलिमिटेड वॉयस कॉल ची सुविधा देतात. बीएसएनएल 99 रुपयांचा प्लान 26 दिवसांच्या वैधता सह येतो तर कंपनी चा 319 रुपयांचा प्लान 90 दिवसांच्या वॅलिडिटी सह सादर करण्यात आला आहे.

बीएसएनएल च्या दोन्ही प्लान्स मध्ये लोकल व एसटीडी आॅननेटवर्क व आॅफनेटवर्क वॉयस कॉल पूर्णपणे मोफत देण्यात येत आहेत जे रोमिंग मध्ये पण फ्री असतील. त्याचबरोबर वॉयस कॉल व्यतिरिक्त कंपनी या दोन्ही प्लान्स मध्ये फ्री कॉलर ट्यून सर्विस (पीआरबीटी) पण दिली आहे. ग्राहक आपल्या आवडी नुसार कोणतीही कॉलर ट्यून मोफत लाऊ शकतात.

कंपनी ने हे दोन्ही प्लान्स दिल्ली आणि मुंबई सोडून संपूर्ण भारतात लागू केले आहेत. लक्षात असू दे की हे दोन्ही प्लान वॉयस पॅक च्या रुपात लॉन्च करण्यात आले आहेत, यात ग्राहकांना कोणतेही इंटरनेट बेनिफिट किंवा एसएमएस सर्विस मिळणार नाही. हे प्लान त्या लोकांसाठी आहेत जे इंटरनेट कमी पण कॉलिंग जास्त वापरतात. इंटरनेट डाटा साठी कंपनी च्या इतर पॅक ने रिचार्ज करावा लागेल.

Published by
Siddhesh Jadhav