Categories: बातम्या

फक्त 39 रुपयांमध्ये बोला कितीही, ही टेलीकॉम कंपनी घेऊन आली आहे शानदार प्लान

देशाची सरकारी टेलीकॉम कंपनी भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड ने कही दिवसांपूर्वी 99 रुपये आणि 319 रुपयांचे दोन वॉयस प्लान सादर केले होते. 99 रुपयांचा प्लान 26 दिवसांच्या वैधते सह येतो तर कंपनीचा 319 रुपयांचा प्लान 90 दिवसांच्या वॅलिडिटी सह सादर करण्यात आला आहे. पण आता बीएसएनएल ने 39 रुपयांचा नवीन वॉयस पॅक सादर केला आहे जो छोट्या वॅलिडिटी सह अनलिमिटेड बेनिफिट देतो.

बीएसएनएल ने 39 रुपयांचा नवीन प्लान सादर केला आहे जो प्रीपेड कस्टमर्स साठी आहे. कंपनी ने हा पॅक 10 दिवसांच्या वॅलिडिटी सह सादर केला आहे. वर सांगितल्याप्रमाणे हा एक वॉयस पॅक आहे जो यूजर्सना फक्त वॉयस कॉल ची सुविधा देतो. 39 रुपयांचा रिचार्ज केल्यावर बीएसएनएल आपल्या ग्राहकांना 10 दिवसांसाठी आॅननेटवर्क व आॅफनेटवर्क अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉल देत आहे.

प्लान मधील वॉयस कॉल चा वापर रोमिंग मध्ये पण फ्री असेल. या प्लान मध्ये इंटरनेट डाटा मिळत नाही पण कंपनी यूजर्सना फ्री कॉलर ट्यून सर्विस (पीआरबीटी) ची फ्री सर्विस पण देत आहे. ग्राहक 10 दिवसांसाठी आपल्या आवडीची कोणतीही कॉलर ट्यून मोफत लाऊ शकतात. कंपनी कडून हे दोन्ही प्लान्स दिल्ली आणि मुंबई सोडून संपूर्ण भारतात लागू करण्यात आले आहेत. हा प्लान त्या लोकांसाठी सादर करण्यात आला आहे जे इंटरनेट कमी पण कॉलिंग जास्त वापरतात. इंटरनेट डाटा साठी कंपनी च्या इतर पॅक ने रिचार्ज करावा लागेल.

काही दिवसांपूर्वी बीएसएनएल ने 349 रुपयांचा प्रीपेड प्लान पण सादर केला आहे जो 54 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. प्लान अंतर्गत बीएसएनएल ग्राहकांना 1जीबी डाटा प्रतिदिन देत आहे. रोज 1जीबी च्या हिशोबाने प्लान मध्ये संपूर्ण वेलिडिटी साठी एकूण 54जीबी इंटरनेट डाटा मिळतो. यासोबत 54 दिवसांसाठी कंपनी लोकल व एसटीडी वॉयस कॉल पूर्णपणे फ्री देत आहे, जे रोमिंग मध्ये पण वापरतात येतात. तसेच प्लान मध्ये ग्राहकांना रोज 100एसएमएस पण मिळतील.

Published by
Siddhesh Jadhav