Categories: बातम्या

आयडिया 499 रुपयांमध्ये देत आहे 164जीबी डाटा आणि 82 दिवसांसाठी अनलिमिटेड वॉयस कॉल अगदी मोफत

एयरटेल ने काही दिवसांपूर्वी 558 रुपयांचा नवीन प्लान सादर केला आहे. या प्लान मध्ये 84 दिवसांसाठी एकूण 246जीबी 4जी डाटा देत कंपनी ने भारतीय टेलीकॉम बाजारातील स्पर्धेत आपली स्थिती मजबूत केली आहे. एयरटेल नंतर आता आयडिया ने पण आपला 499 रुपयांचा नवीन प्लान सादर केला आहे. या प्लान मध्ये आयडिया कंपनी च्या ग्राहकांना भरपूर इंटरनेट डाटा सह अनलिमिटेड वॉयस कॉल ची सुविधा मिळत आहे.

आयडिया ने सादर केलेला 499 रुपयांचा प्लान प्रीपेड ग्राहकांसाठी आहे. हा प्लान 82 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. कंपनी कडून या प्लान अंतर्गत रोज 2जीबी इंटरनेट डाटा दिला जात आहे. 82 दिवसांसाठी 2जीबी प्रतिदिन या हिशोबाने या प्लान अंतर्गत एकूण 164जीबी इंटरनेट डाटा मिळत आहे. आयडिया कडून मिळणार्‍या डाटा ची खास बाब ही पण आहे की हा 4जी सह 3जीबी आणि 2जी स्पीड वर पण वापरता येतो.

इंटरनेट डाटा व्यतिरिक्त आयडिया आपल्या प्लान मध्ये अनलिमिटेड लोकल व एसटीडी वॉयस कॉल देत आहे. ही वॉयस कॉल रोमिंग मध्ये पण फ्री राहतील आणि हे आॅननेटवर्क व आॅफनेटवर्क वापरता येतील. सोबतच आयडिया आपल्या ग्राहकांना 82 दिवसांपर्यंत रोज 100 एसएमएस पण मोफत देईल.

पण आयडिया च्या या प्लान मध्ये मिळणारी फ्री वॉयस कॉल चा वापर एका दिवसात जास्तीत जास्त 250 मिनिटे केला जाऊ शकतो. तर इंटरनेट पाहता एका दिवसाची 2जीबी डाटा लिमिट संपल्यावर कंपनी अतिरिक्त डाटा वर शुल्क वसूल करेल.

Published by
Siddhesh Jadhav