Categories: बातम्या

Airtel-Jio च्या अनलिमिटेड 5G डेटावर येऊ शकते बंदी; ट्रायच्या नियमांचे होत आहे उल्लंघन

Highlights
  • जियो आणि एयरटेलचे अनलिमिटेड 5जी टॅरिफ प्लॅन बंद होऊ शकतात.
  • अनलिमिटेड डेटाची योजना टॅरिफ नियमाच्या फेयर यूसेज पॉलिसीच्या विरोधात जाते.
  • परंतु अधिकृतपणे ट्रायनं कोणतेही पाऊल उचलेल नाही.

टेलीकॉम रेगुलेटर ऑफ इंडिया (TRAI) कथितरित्या Reliance Jio आणि Bharti Airtel वर मोठी कारवाई करू शकते. या कारवाईचा परिणाम थेट टेलीकॉम युजर्सवर पडू शकतो. ट्राय दोन्ही कंपन्यांच्या टॅरिफ प्लॅनमध्ये मिळणारा अनलिमिटेड 5G डेटा बंद करू शकते. फायनॅन्शिल एक्सप्रेसच्या एका रिपोर्टनुसार,वोडाफोन आयडियानं दोन्ही ऑपरेटर्स विरोधात प्रीडेटरी प्रायसिंगची तक्रार केली आहे, त्यामुळे तपास केल्यावर ट्राय या कंपन्यांवर कारवाई करू शकते.

वोडाफोन आयडियाची तक्रार

वोडाफोन आयडियानं दोन्ही टेलीकॉम कंपन्यांनी गंभीर आरोप केला आहे. कंपनीनं दावा केला आहे की त्यांच्याकडे काही सर्कल्समध्ये 30% मार्केट शेयर आहे आणि तिथे 5G टॅरिफ कमी किंमतीत उपलब्ध केलं जात आहे. सध्या भारतात वोडाफोन आयडिया एकमात्र प्रायव्हेट टेलीकॉम कंपनी आहे जिने 5G सेवा सुरु केली नाही, परंतु कंपनी 5G रेडी सिम कार्ड देत आहे, तर Airtel आणि Jio सध्या 4G पॅकवर 5G सर्व्हिस देत आहे.

जियो आणि एटरटेलचे स्पष्टीकरण

दोन्ही कंपन्यांनी वोडाफोन-आयडियाचे आरोप फेटाळून टाकले आहेत. दोन्ही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळी विधाने दिली आहेत. जियो आणि एयरटेलनं म्हटलं आहे की की त्यांच्या टॅरिफवर सवाल केला जाऊ शकत नाही कारण सध्या 5G कनेक्टिव्हिटीचे ग्राहक खूप कमी आहेत. दोन्ही कंपन्यांनी असं देखील म्हटलं आहे की ते काहीही मोफत देत नाहीत. त्यांच्या मते 5G सर्व्हिस 4G पॅकचा भाग म्हणून दिली जात आहे आणि त्यानुसार शुल्क आकारले जात आहे.

वोडाफोन आयडियानं अद्याप सुरु केली नाही 5G सर्व्हिस

वोडाफोन-आयडियानं आतापर्यंत आपली 5G सर्व्हिस लाँच करण्याची तारीख सांगितली नाही. आतापर्यंत आलेल्या रिपोर्ट्सनुसार कंपनीनं जर लवकरच 5G सुरु केली नाही तर ग्राहकांची संख्या आणखी कमी होऊ शकते.

Published by
Siddhesh Jadhav