Categories: बातम्या

Jio चे नवीन फॅमिली पोस्टपेड प्लॅन्स लाँच; एक महिन्याचं ट्रायल फ्री

Highlights
  • रिलायन्स जियोच्या पोस्टपेड फॅमली प्लॅन्सची प्रारंभिक किंमत 399 रुपये आहे.
  • प्लॅन्ससोबत फ्री डेटा, कॉलिंग आणि ओटीटीचा फायदा.
  • नवीन पोस्टपेड फॅमली प्लॅन्ससह एक महिन्याचं ट्रायल फ्री मिळेल.

रिलायन्स जियोच्या पोस्टपेड ग्राहकांसाठी खुशखबर आहे कारण कंपनीनं एक महिन्याच्या फ्री ट्रायलसह जियो प्लसचे नवीन पोस्टपेड फॅमली प्लॅन्स सादर केले आहेत. या प्लॅन्ससह फ्री डेटा, कॉलिंग आणि ओटीटीचा फायदा देखील दिला जात आहे. फॅमली प्लॅनची प्रारंभिक किंमत 399 रुपये आहे. पुढे तुम्हाला आम्ही या प्लॅन्सची संपूर्ण माहिती दिली आहे.

399 रुपयांपासून प्लॅन्स सुरु

रिलायन्स जियोनं एक महिन्याच्या फ्री ट्रायलसह आपला नवीन फॅमिली प्लॅन – जियो प्लस लाँच केला आहे. जियो प्लस प्लॅनमध्ये आधी कनेक्शनसाठी ग्राहक 399 रुपये द्यावे लागतील. इतकेच नव्हे तर प्लॅनमध्ये 3 अतिरिक्त कनेक्शन जोडता येतील. प्रत्येक नवीन कनेक्शनसाठी 99 रुपये शुल्क आकारले जाईल. जियो प्लस मध्ये 4 कनेक्शनसाठी 696 रुपये (399+99+99+99) दरमहा द्यावे लागतील. प्लॅनसह 75जीबी डेटा मिळेल. 4 कनेक्शन असलेल्या फॅमिली प्लॅनमध्ये एक सिमला दरमहा जवळपास 174 रुपये खर्च येईल.

तसेच जे ग्राहक जास्त डेटा वापरतात ते 100 जीबी डेटा असलेला प्लॅन निवडू शकतात. यासाठी पहिल्या कनेक्शनवर 699 रुपये शुल्क आकारले जाईल आणि प्रत्येक अतिरिक्त कनेक्शनवर 99 रुपये प्रति कनेक्शन द्यावे लागतील. एकूण 3 अ‍ॅडिशनल कनेक्शन जोडता येतील.

कंपनीनं काही व्यक्तीगत प्लॅन देखील लाँच केले आहेत. यात 299 रुपयांचा प्लॅनमध्ये 30 जीबी डेटा मिळेल आणि 599 रुपयांचा प्लॅनमध्ये अनलिमिटेड डेटा मिळेल. इतकेच नव्हे तर कंपनीनं नवीन फॅमिली प्लॅन- जियो प्लसमध्ये अनेक बेनिफिट्स दिले आहेत.

फ्री ट्रायल नंतर प्लॅन करता येईल कॅन्सल

जियोनं सांगितलं आहे की एक महिन्याच्या फ्री ट्रायल नंतर युजर्सना सर्व्हिस न आवडल्यास ते आपलं कनेक्शन रद्द करू शकतात आणि याबाबत त्यांना कोणताही प्रश्न विचारला जाणार नाही.

अनलिमिटेड फ्री मिळेल 5G डेटा

जियो ट्रू 5जी वेलकम ऑफरसह अनलिमिटेड 5जी डेटा मिळेल, ज्याचा वापर संपूर्ण कुटुंब करू शकतं. यात डेटाची कोणतीही डेली लिमिट ठेवण्यात आलेली नाही. उपलब्ध नंबर्समधून तुम्ही तुमच्या आवडीचा नंबर निवडू शकता. सिंगल बिलिंग, डेटा शेयरिंग आणि नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन, जियो टीव्ही आणि जियो सिनेमा सारख्या मनोरंजक प्रीमियम कंटेंट अ‍ॅप्सचा फायदा देखील मिळेल.

या युजरन्स सिक्योरिटी डिपॉजिट द्यावं लागणार नाही

जियो फायबर युजर्स, कॉर्पोरेट कर्मचारी, इतर ऑपरेटर्सचे जुने पोस्टपेड युजर्स, अ‍ॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक आणि एसबीआयच्या क्रेडिट कार्ड धारकांना सिक्योरिटी डिपॉजिट द्यावं लागणार नाही.

Published by
Siddhesh Jadhav