Categories: बातम्या

KBC च्या नावावर होत आहे फसवणूक, या नंबर पासून सावधान रहा, एक WhatsApp कॉल करेल अकाउंट रिकामे

कौन बनेगा करोड़पतिचे नाव तर प्रत्येक भारतीयाला माहित आहे. फक्त हा गेम शो नाही तर हा होस्ट करणारे बॉलीवुडचे शंहशाह अमिताभ बच्चन हे पण लोकांना तेवढेच आवडतात. हा कार्यक्रम बघत असताना तुमच्या मनात पण आले असेल कि, ‘मी पण केबीसी च्या या स्टेज वर गेलो तर’. पण तुम्हाला माहित आहे का तुमच्या याच स्वप्नाचा आणि पैसे जिकंण्याच्या इच्छेचा काही लोक फायदा घेत आहेत. देशात ‘कौन बनेगा करोड़पति’ च्या नावावर लोकांना फ्रॉड WhatsApp कॉल केला जात आहे ज्यात सामान्य लोक अडकत आहेत. पुढे आम्ही KBC फ्रॉडच्या अश्याच एका घटनेची माहिती दिली आहे आणि सोबतच तो नंबर पण सांगितलं आहे ज्या पासून तुम्हाला स्वतःला आणि आपल्या कुटुंबियांना वाचवायचे आहे.

KBC च्या नावावर चालू असलेल्या फ्रॉड लोकांच्या टीमने यावेळी खुशबू नावाच्या एका युवतीला आपल्यात जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला आहे आणि या तरुणीने हि घटना 91मोबाईल्सला सांगितली आहे. खुशबू दिल्लीच्या एका खाजगी दवाखान्यात काम करते. गुरुवारी ती आपल्या घरच्या कामात व्यस्त होती आणि दुपारी 1 वाजताच्या आसपास तिला एका Unknown नंबर वरून WhatsApp कॉल आला. हा नंबर 6196397823 असा होता. आपल्या व्यवसायामुळे खुशबूने नंबर सेव नसतानाही तो कॉल रिसीव केला.

फोन उचलल्यानंतर कॉलर बोलला कि तो KBC म्हणजे कौन बनेगा करोड़पति मधून बोलत आहे आणि एक लकी ड्रा मध्ये खुशबूच्या नंबर वर बक्षिस लागले आहे. खुशबूने जेव्हा विचारले कि तिचा नंबर केबीसी कडे कसा गेला तेव्हा त्याने उत्तर दिले कि, केबीसी टीमने हजारो नंबर्स मधून एक ड्रा काढला होता ज्यात फक्त खुशबूचा नंबर निवडण्यात आला आणि या लकी ड्रा मध्ये खुशबूच्या नंबर वर 25,00,000 रुपयांचे बक्षीस लागले आहे.

25 लाख मिळवण्यासाठी द्यावे लागतील 15,000 रुपये

एकतर अनोळखी नंबर आणि KBC लकी ड्रा मध्ये 25 लाखांचे बक्षीस ऐकून खुशबूला विश्वास बसला कि हा एक फ्रॉड कॉल आहे पण तरीही तिने याच्या तळाशी जाण्याचा निर्णय घेतला. बक्षीस जिंकल्याचा आनंद व्यक्त करत खुशबूने विचारले कि हे पैसे कधी आणि कसे त्यांना मिळतील तर तेव्हा कॉलर म्हणाला कि बक्षिसाची रक्कम मिळवण्यासाठी खुशबूला बॅंक टू बॅंक ट्रांसफर रिसीट मिळवावी लागेल आणि त्यासाठी सांगिलेल्या बॅंक अकाउंट मध्ये 15,000 रुपये भरावे लागतील. खुशबूला शब्द देण्यात आला आहे कि हा ट्रांसफर चार्ज तिला 25 लाखांसोबत परत दिला जाईल.

कॉल रेकॉर्डिंगचे नाव काढताच समोर आले सत्य

तरुणीने 15,000 रुपये भरण्यासाठी होकार दिला आणि कोणत्या अकाउंट मध्ये पैसे टाकायचे आहेत हे विचारले. KBC टीमने अकाउंट नंबर सांगायला सुरवात करताच खुशबू म्हणाली कि, ती नंबर लिहू शकणार नाही म्हणून ती कॉल रेकॉर्डिंग ऑन करत आहे. रेकॉर्डिंग होत असल्याचे ऐकताच कॉलरला समजले कि त्याचे भांडे फुटले आहे आणि रागात काही अपशब्द वापरून फोन स्वतः कट केला.

इथे आम्हाला आमच्या वाचकांना सांगायचे आहे कि अनेक साधे भोळे लोक आणि वयोवृद्ध लोक अशाप्रकारच्या फसवणुकीला बळी पडतात. अशी फसवणूक करणारे लोक तुम्हाला बॅंक अकाउंट मध्ये पैसे जमा करण्यासाठी सांगतीलच असे नाही. बऱ्याचदा असे मेसेजेस पाठवले जातात ज्यात काही लिंक्स दिलेल्या असतात आहेत आणि या लिंक्स वर क्लिक केल्यावर तुमचा फोन हॅक होऊ शकतो आणि बॅंक अकाउंट मधून पैसे पण जाऊ शकतात. 91मोबाईल्स मराठी आपल्या वाचकांना सल्ला देत आहे कि अशाप्रकारच्या कॉल करणाऱ्या लोकांच्या फसवणुकीला बळी पडू नका आणि आपल्या कुटुंबियांना पण अश्या फ्रॉड्सची माहिती द्या.

Published by
Siddhesh Jadhav