New 5G Smartphone Guide: 5G नेटवर्क दारात आलं म्हणून घाई नको; नवीन 5G स्मार्टफोन घेताना या 7 गोष्टींची काळजी घ्या

New 5G Smartphone Guide: भारतात 5G ची प्रतीक्षा संपली असून दोन मोठ्या टेलिकॉम कंपन्यांनी नेक्स्ट जेनरेशन नेटवर्क सादर केलं आहे. Airtel नं सर्वप्रथम 1 ऑक्टोबरपासून दिल्ली, वाराणसी, नागपुर, बेंगळुरू, हैद्राबाद, मुंबई, चेन्नई आणि सिलिगुरी या आठ शहरांमध्ये आपली 5G सेवा सुरु केली आहे. तर रिलायन्स जियोनं मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि वाराणसीमध्ये 5G ची सुरुवात केली आहे. पुढील काही वर्षांमध्ये संपूर्ण भारतात 5G सेवेचा विस्तार होईल. परंतु 5G नेटवर्कचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे 5G स्मार्टफोन असणं आवश्यक आहे. म्हणून घाईत 5G स्मार्टफोन खरेदी करून पुढील 7 चुका करू नका.

New 5G Smartphone Guide: Dont Miss These 7 Impotent Things

सर्व 5G स्मार्टफोन सारखेच नसतात

5G चिपसेट असलेले स्मार्टफोन युजर्सना एक सारखा 5G इंटरनेट स्पीड देत नाहीत. त्यामुळे 5G स्मार्टफोन विकत घेताना थोडा रिसर्च करा. चांगला 5G स्मार्टफोन विकत घेण्याआधी प्रोसेसर, mmWave आणि sub-6GHz नक्की चेक करा. mmWave 5G बँडवर चांगला 5G स्पीड मिळणं अवलंबून आहे. तर sub-6GHz बँड देखील 4G पेक्षा चांगला स्पीड ऑफर देऊ शकतो, परंतु ह्याचा मुख्य वापर कव्हरेजसाठी होतो. हे देखील वाचा: मिस करू नका ही संधी! 8,000 रुपयांच्या डिस्काउंटसह 6GB रॅम असलेला Realme चा दमदार 5G स्मार्टफोन

5G बँडला सपोर्टची माहिती घ्या

सर्वात महत्वाची बाब म्हणजे नवीन 5G फोन किती बँड्सना सपोर्ट करतो, ते पाहा. टेक्नीकल बाब सोडली तर फोनमध्ये जितके जास्त 5G बँड सपोर्टेड असतील तितके चांगले. भारतात 5G स्मार्टफोनमध्ये 11 5G बँड किंवा त्यापेक्षा जास्त बँड देखील मिळतात.

लेटेस्ट तेच बेस्ट

भारतात गेल्या दोन वर्षांपासून 5G स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर लेटेस्ट लाँच झालेला 5G स्मार्टफोन घेणं केव्हाही चांगलं. लेटेस्ट लाँच फोनमध्ये जुन्या फोनच्या तुलनेत चांगला प्रोसेसर, सुधारित 5G स्पीड आणि कव्हरेज मिळेल. जुना 5G स्मार्टफोन कमी किंमतीत मिळेल परंतु 5G सर्व्हिस तेवढी चांगली देणार नाही.

बॅटरी देखील महत्वाची

5G स्मार्टफोनमध्ये इंटरनेट स्पीड खूप जास्त मिळतो, परंतु फोनमध्ये पावर कंज्मशन वाढतं. त्यामुळे स्मार्टफोन विकत घेताना जास्त बॅटरी कपॅसिटी असलेला ऑप्शन बघा. जर तुम्ही 6.5 इंच किंवा त्यापेक्षा मोठा डिस्प्ले असलेला हँडसेट घेत असाल तर 5000mAh पेक्षा जास्त मोठी बॅटरी असणं आवश्यक आहे.

बजेट 5G स्मार्टफोनला कमी समजू नका

सुरुवातीला 5G सपोर्टसह महागडे आणि फ्लॅगशिप स्मार्टफोन उपलब्ध झाले होते. परंतु आता 5G सपोर्टसह बजेट स्मार्टफोन देखील मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. सध्या बाजारात 15000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 5G फोन उपलब्ध आहेत. या स्मार्टफोनमध्ये शानदार डिस्प्ले रिजोल्यूशन, कॅमेरा सेन्सर आणि 5G स्पीड मिळतो. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका.

रेग्युलर अपडेट देखील आवश्यक

5G सध्या खूप नवीन टेक्नॉलॉजी आहे, त्यामुळे यात स्टेबिलिटी आणि कनेक्टिव्हिटीसाठी सॉफ्टवेयर अपडेट मिळू शकतात. त्यामुळे नवीन 5G स्मार्टफोन विकत घेताना अशा ब्रँडची निवड करा जिथे रेग्युलर आणि वेळेवर सॉफ्टवेयर अपडेट मिळतात. हे देखील वाचा: Airtel 5G Plus: फक्त ‘या’ स्मार्टफोन्सवर चालेल एयरटेल 5जी, पाहा तुमचा फोन आहे का या यादीत

5G मुळे तुमच्या गरजा विसरू नका

5G स्मार्टफोन विकत घेताना तुमच्या गरजा देखील लक्षात ठेवा. फक्त 5G आहे म्हणून महागडा स्मार्टफोन घेऊ नका, त्यातील बॅटरी, कॅमेरा आणि डिस्प्ले क्वॉलिटीकडे देखील लक्ष असू देत. काही बजेट फोन देखील 5G सह चांगले स्पेसिफिकेशन्स देतात, त्यांची माहिती घ्या.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठीला Facebook वर फॉलो करा.

Published by
Siddhesh Jadhav