एक सेटिंग बदलल्यास 4G SIM वर देखील मिळेल 5G सर्व्हिस; जाणून घ्या पद्धत

How to get 5g service on 4g sim

5G Service On 4G SIM: भारतात अधिकृतपणे 5G Service चा शुभारंभ झाला आहे आणि अलीकडेच एयरटेलची Airtel 5G Plus व रिलायन्स जियोची Jio True 5G Beta सर्व्हिस लाइव्ह करण्यात आली आहे. अनेक युजर्स त्यांच्या 5G स्मार्टफोन्सवर या सेवांचा आनंद घेत आहेत तर अजून अनेकजण विचार करत आहेत की 4G SIM card चं काय करायचं? आणि 4G SIM वर 5G सर्व्हिस कशी वापरता येईल? त्यांना 5G वापरण्यासाठी 5G SIM ची गरज आहे का? जर तुम्हाला देखील हा प्रश्न पडला असेल तर आज आम्ही आमच्या या लेखातून तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देणार आहोत. चला जाणून घेऊया…

नवीन 5G सिम आवश्यक आहे का?

5G सर्व्हिस वापरण्यासाठी तुम्हाला 5G SIM ची गरज आहे का? सर्वप्रथम तुम्हाला पडलेल्या या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. एयरटेल आणि जियोनं घोषणा केली आहे की 5G चा वापर करण्यासाठी युजर्सना 5G सिमची गरज नाही, ज्या ग्राहकांकडे लेटेस्ट 4जी सिम आहे, त्यांचे सिम 5जीला देखील सपोर्ट करतात. ह्याचा अर्थ असा की 4G SIM वरच 5G सर्व्हिसचा वापर करता येईल. परंतु युजर्सना 5G सर्व्हिसचा आनंद घेण्यासाठी 5G स्मार्टफोन (5G Mobile) मात्र आवश्यक असेल, तिथे कोणतीही तडजोड करता येणार नाही. हे देखील वाचा: Jio 5G Plan Price: जियो 5जी टॅरिफ प्लॅनसाठी किती पैसे द्यावे लागणार आणि किती मिळणार 5G Data, जाणून घ्या

How to get 5g service on 4g sim

थोडक्यात सांगायचं तर Airtel आणि Reliance Jio ची 5G सेवा वापरण्यासाठी तुम्हाला सिम कार्ड खरेदी करावं लागणार नाही, किंवा पोर्ट करावं लागणार नाही. जुन्या 4जी सिमवर 5जी देखील चालेल. परंतु एक महत्वाची बाब म्हणजे तुमच्याकडे एक अपडेटेड नवीन सिम असावं. हे देखील वाचा: Airtel 5G Plus: फक्त ‘या’ स्मार्टफोन्सवर चालेल एयरटेल 5जी, पाहा तुमचा फोन आहे का या यादीत

4G SIM वर कशी मिळेल 5G सर्व्हिस?

How to get 5g service on 4g sim

  • एकदा तुमच्या एरिया मध्ये 5G रोल आउट झालं की तुम्हाला तुमच्या 4G SIM असलेल्या 5G स्मार्टफोनच्या काही सेटिंग्समध्ये बदल करावा लागेल.
  • सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनवर ‘सेटिंग’ अ‍ॅप ओपन करा.
  • त्यानंतर, ‘मोबाइल नेटवर्क’ ची सेटिंग निवडा.
  • सिम सिलेक्ट करा ज्यात तुम्हाला 4G च्या ऐवजी 5G ऑन करायचं आहे.
  • तिथे ‘Preferred network type’ ऑप्शन निवडा.
  • त्यानंतर फक्त टॅप करा आणि 5G नेटवर्क टाइपची निवड करा.
  • जर तुमच्या परिसरात 5G सुरु झालं असेल तर, या प्रोसेस नंतर काही मिनिटांतच स्टेटस बार वर 5G साइन दिसू लागेल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठीला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here