नोकियाने गेल्यावर्षी सप्टेंबर 2023 मध्ये आपला स्वस्त फोन Nokia G42 5G लाँच केला होता. लाँचच्या वेळी फोन 8GB रॅम आणि 128GB/256GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये आला होता. तसेच, आता कंपनीने या 5 जी फोनच्या 4 जीबी रॅम व्हेरिएंटची घोषणा केली आहे. रॅम व्यतिरिक्त फोनचे स्पेसिफिकेशन्स व लुकमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. चला पुढे तुम्हाला Nokia G42 5जी ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती देत आहोत.
Nokia G42 5G ची किंमत आणि सेलची माहिती
- Nokia G42 5G चा नवीन 4 जीबी रॅम व्हेरिएंट (2जीबी व्हर्च्युअल रॅम) आणि 128जीबी बिल्ट-इन स्टोरेजसह येतो.
- हा फोन कंपनीने 9,999 रुपयांमध्ये आणला आहे.
- हा भारतीय बाजारात सर्वात स्वस्त 5G फोनपैकी एक आहे.
नवीन व्हेरिएंट जांभळ्या आणि राखाडी रंगामध्ये येतो. - याची विक्री 8 मार्चला अॅमेझॉनच्या माध्यमातून भारतात सुरु होणार आहे.
Nokia G42 5G स्पेसिफिकेशन्स
- डिस्प्ले: नोकिया जी42 5जी फोनमध्ये 6.56 इंचाचा एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनला आहे जो 90हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
- प्रोसेसर: हा मोबाईल फोन अँड्रॉइड 13 ओएसवर लाँच झाला आहे ज्यात प्रोसेसिंगसाठी 2.2 गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीड असलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 480 प्लस ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे.
- कॅमेरा: फोटोग्राफीसाठी Nokia G42 5G ट्रिपल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. तसेच फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सल सेल्फी सेन्सर आहे.
- बॅटरी: पावर बॅकअपसाठी नोकिया जी42 5जी फोन को 5,000एमएएच बॅटरीसह बाजारात आला आहे. तसेच स्मार्टफोनमध्ये 20 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी पण देण्यात आली आहे.
- आणखी फिचर्स: Nokia G42 5G मध्ये ड्युअल सिम 5जी आणि 4जी सोबतच साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, OZO प्लेबॅक ऑडियो, वायफाय आणि ब्लूटूथ सारखे ऑप्शन मिळतात.