Categories: बातम्या

OnePlus Ace 3V च्या लाँच पूर्वीच समोर आले स्पेसिफिकेशन्स, जाणून घ्या काय मिळू शकते खास

Highlights
  • OnePlus Ace 3V मार्च मध्ये लाँच होऊ शकतो.
  • यात स्नॅपड्रॅगन 7+ जेन 3 चिपसेट मिळू शकते.
  • मोबाईलमध्ये 16GB पर्यंत रॅमची पावर मिळण्याची शक्यता आहे.


वनप्लस आपल्या ऐस सीरीजचा नवीन फोन OnePlus Ace 3V काही दिवसांमध्ये लाँच करू शकतो. सांगण्यात आले आहे की हा सर्वप्रथम होम मार्केट चीनमध्ये एंट्री घेणार आहे. अपेक्षा ही पण आहे की स्मार्टफोन भारत आणि जागतिक बाजाराता OnePlus Nord 5 च्या रूपामध्ये सादर केले जाऊ शकते. परंतु अजून हा येण्यासाठी काही दिवस लागू शकतात. परंतु पहिले प्रमुख स्पेसिफिकेशन टिपस्टर द्वारे समोर आले आहेत. ज्याची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

OnePlus Ace 3V स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • OnePlus Ace 3V बद्दल टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशनने मायक्रो ब्लॉगिंग साइट वीबोच्या माध्यमातून प्रमुख फिचर्स शेअर केले आहेत.
  • मोठी गोष्ट ही पण समोर आली आहे की नवीन वनप्लस स्मार्टफोन SM7675 चिपसेटसह येऊ शकतो.
  • हा नवीन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7+ जेन 3 चिपसेट असू शकतो. जो आतापर्यंत बाजारात आलेला नाही. तर याआधी टिप्सटरने Snapdragon 7 Gen 3 मिळण्याची गोष्ट सांगितली होती.
  • हा प्रोसेसर 2.9GHz च्या हाई क्लॉक स्पीडवर काम करू शकतो. त्याचबरोबर ग्राफिक्ससाठी Adreno 732 GPU मिळू शकतो.
  • लीकनुसार फोनमध्ये 1.5K रिजॉल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट असलेला डिस्प्ले दिला जाऊ शकतो.
  • मोबाईलमध्ये सुरक्षेसाठी खास ऑप्टिकल फिंगरप्रिंट स्कॅनर मिळण्याची गोष्ट पण समोर आली आहे.
  • स्टोरेजच्या बाबतीत OnePlus Ace 3V ला चीनमध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेजसह आणले जाऊ शकते.
    फोनमध्ये 5500mAh बॅटरी आणि 100 वॉट फास्ट चार्जिंग दिली जाऊ शकते.

OnePlus Ace 3V लाँच टाईमलाईन (संभाव्य)

अजून ब्रँडकडून OnePlus Ace 3V च्या लाँचची माहिती समोर आली नाही, परंतु लीकमध्ये जो प्रोसेसर सांगण्यात आला आहे तो पुढील महिन्यात मार्चमध्ये येण्याची शक्यता आहे. ज्यामुळे असे वाटत आहे की चिपसेटच्या लाँचसह फोन पण या महिन्यात एंट्री घेऊ शकतो. तसेच, अजून पुढे ब्रँडकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

OnePlus Ace 3V स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • डिझाईन: OnePlus Ace 3V फोन ग्लास बॅक आणि प्लास्टिक फ्रेम सह येऊ शकते. याला दोन मॉडेलमध्ये सादर केले जाऊ शकते. ज्यात एक फ्लॅट आणि दुसरा कर्व्ड-एज बॉडी असू शकते.
  • डिस्प्ले: डिस्प्ले साइजची माहिती अजून मिळालेली नाही परंतु हा फोन 1.5K रिजॉल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट स्क्रीनसह येऊ शकतो.
  • चिपसेट: लीकनुसार फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7+ जेन 3 चिपसेट आणि Adreno 732 GPU मिळू शकतो.
  • स्टोरेज: स्टोरेजच्या बाबतीत स्मार्टफोनमध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत इंटरनल स्टोरेज दिले जाऊ शकते.
  • बॅटरी: Oneplus Ace 3V मध्ये 100W फास्ट-वायर्ड चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,500mAh ची बॅटरी मिळू शकते.
Published by
Kamal Kant