Categories: बातम्या

ओपो बनवत आहे फाइंड एक्स चा स्वस्त वेरिएंट, स्लाइडर कॅमेरा सह लो बजट मध्ये होईल लॉन्च

मागच्या महिन्यात ओपो ने अंर्तराष्ट्रीय बाजारात खुप स्टाइलिश आणि अनोखा स्मार्टफोन फाइंड एक्स लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी भारतात लॉन्च करण्यात आला आहे. देशात या फोन ची किंमत 59,990 रुपये ठेवण्यात आली आहे. हाई बजट वाल्या या शानदार स्मार्टफोन नंतर कंपनी आता याचा स्वस्त वेरिएंट आणण्याची तयारी करत आहे. चीनी सर्टिफिकेशन साइट टेना वर ओपो चा हा स्मार्टफोन दिसला आहे तिथून या फोन ची माहिती मिळाली आहे.

ओपो चा हा आगामी स्मार्टफोन टेना वर ओपो पीएएचएम00 मॉडेल नंबर सह लिस्ट करण्यात आला आहे. लीक मधून समजले आहे की या नवीन स्मार्टफोन ची डिजाईन पूर्णपणे ओपो फांइड एक्स सारखी असेल. म्हणजे या फोन मध्ये पण ​स्लाईडर कॅमेरा असेल जो फोटो ची कमांड देताच बाहेर येईल. लिस्टिंग मध्ये फोन चे स्पेसिफिकेशन्स समोर आले नाहीत पण एवढे नक्की की ओपो हा वेरिएंट कमी किंमतीत लॉन्च करेल.

ओपो फाइंड एक्स चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 93.08 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो देण्यात आला आहे. फोन मध्ये 6.4-इंचाचा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. फ्रंट पॅनल वर फक्त खालच्या बाजूला बारीक बेजल आहे पण इतर तिन किनारे पूर्णपणे स्क्रीनला स्पर्श करत आहेत. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित कलर ओएस 5.1 सह सादर करण्यात आला आहे त्याचबरोबर हा क्वालकॉम च्या सर्वात ताकदवान चिपसेट स्नॅपड्रॅगन 845 वर चालतो.

कंपनी ने या फोन मध्ये 8जीबी रॅम तसेच 256जीबी इंटरनल स्टोरेज दिली आहे. तसेच ग्राफिक्स साठी यात ऐड्रेनो 630जीपीयू आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल आणि 20-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच यात 25-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे.

या फोन मध्ये 3डी फेस अनलॉक टेक्निक आहे. फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. 4जी सह हा फोन 5जी कनेक्टिविटी क्षमते सह लॉन्च करण्यात आला आहे. तर पावर बॅकअप साठी ओपो फाइंड एक्स मध्ये 3,730एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच कपंनी ने फाइंड एक्स चा लेंबोरगिनी एडिशन पण सादर केला आहे जो सुपर वीओओएसी चार्जिंग टेक्निक सह येतो. या वेरिएंट मध्ये 8जीबी रॅम सह 512जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

किंमत पाहता ओपो फाइंड एक्स 59,990 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. जो 30 जुलै पासून फ्लिपकार्ट वर आपल्या पहिल्या सेल साठी उपलब्ध होईल तसेच 3 ऑगस्ट पासून देशातील आॅफलाईन चॅनल्स वर उपलब्ध होईल.

Published by
Siddhesh Jadhav