realme GT Neo6 झाला लाँच, यात आहे 16GB RAM, 32MP Selfie कॅमेरा आणि 120W फास्ट चार्जिंग

रियलमीने आज घोषणा केली आहे की ते या महिन्यात भारतात realme GT 6T स्मार्टफोन लाँच करणार आहेत. तसेच दुसरीकडे कंपनीने आपल्या होम मार्केट चीनमध्ये नवीन मोबाईल realme GT Neo6 सादर केला आहे. हा स्मार्टफोन 16GB RAM आणि Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसरसह 32MP Selfie Camera आणि 120W Fast Charging सारख्या स्पेसिफिकेशनला सपोर्ट करतो ज्याची संपूर्ण माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

realme GT Neo6 ची किंमत

12GB RAM + 256GB Storage = 2099 yuan (जवळपास 24,500 रुपये)
16GB RAM + 256GB Storage = 2399 yuan (जवळपास 27,500 रुपये)
16GB RAM + 512GB Storage = 2699 yuan (जवळपास 31,000 रुपये)
16GB RAM + 1TB Storage = 2999 yuan (जवळपास 34,500 रुपये)

रियलमी जीटी नियो 6 5 जी फोन चीनमध्ये चार मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. याच्या 12 जीबी रॅम असणाऱ्या बेस व्हेरिएंटची किंमत 24,500 रुपयांच्या आसपास आहे तसेच सर्वात मोठा 16 जीबी+1 टीबी स्टोरेज भारतीय चलनानुसार जवळपास 34,500 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. कंपनीने आपल्या फोनला Lingxi purple, Liquid Knight (पांढऱ्या) आणि Cangye Hacker (हिरव्या) कलरमध्ये आणले आहे.

realme GT Neo6 चे स्पेसिफिकेशन

  • 6.78″ 120 हर्ट्झ अ‍ॅमोलेड डिस्प्ले
  • क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 एस जेन 3
  • 16 जीबी रॅम + 1 टीबी स्टोरेज
  • 50 एमपी ड्युअल रिअर कॅमेरा
  • 32 एमपी सेल्फी कॅमेरा
  • 120 वॉट सुपरवूक चार्जिंग
  • 5,500 एमएएचची बॅटरी

स्क्रीन : रियलमी जीटी नियो 6 स्मार्टफोन 2780 × 1264 पिक्सल रेजोल्यूशन असणाऱ्या 6.78 इंचाच्या पंच-होल डिस्प्लेवर लाँच झाला आहे. ही 8T LTPO AMOLED पॅनलवर बनली आहे जी 120Hz रिफ्रेश रेट, 6000nits पिक ब्राईटनेस तसेच 2160Hz पीडब्ल्यूएम डिमिंग सारख्या फिचर्सला सपोर्ट करते.

प्रोसेसर : realme GT Neo6 अँड्रॉईड 14 ओएसवर आला आहे जो रियलमी युआय 5 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वॉलकॉमचा 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला Snapdragon 8s Gen 3 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 3 गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर चालतो.

मेमरी : हा नवीन रियलमी फोन चीनमध्ये दोन रॅम मॉडेलमध्ये आला आहे. बेस व्हेरिएंटमध्ये जिथे 12GB RAM सह 256 जीबी स्टोरेज मिळते तसेच इतर व्हेरिएंट्स 16GB RAM सह 256GB, 512GB आणि 1TB मेमरीला सपोर्ट करतो. हा मोबाईल LPDDR5X RAM + UFS 4.0 storage टेक्नॉलॉजीवर चालतो.

फ्रंट कॅमेरा : सेल्फी काढणे, रिल्स बनविणे तसेच व्हिडिओ कॉलिंगसाठी realme GT Neo6 32MP Selfie Camera ला सपोर्ट करतो. हा Sony IMX615 सेन्सर आहे जो एफ/2.45 अपर्चर वर चालतो.

बॅक कॅमेरा : फोटोग्राफीसाठी रियलमी जीटी नियो 6 ड्युअल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50MP Sony IMX882 सेन्सर देण्यात आला आहे जो OIS फिचरसह आहे. तसेच त्याचबरोबर एफ/2.2 अपर्चर असलेली 8MP IMX355 112° ultra-wide लेन्स आहे.

बॅटरी : पावर बॅकअपसाठी realme GT Neo 6 5G फोनला दमदार 5500mAh battery सह आणले आहे. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी मोबाईलमध्ये 120W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी पण आहे.

इतर फिचर्स : रियलमी जीटी नियो 6 इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह आहे तसेच याच्या स्क्रीनवर कोर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस 2 ची लेअर आहे. हा फोन IP65 रेटिंगसह आला आहे तसेच यात Dolby Atmos Stereo speakers, NFC तसेच Bluetooth 5.4 सारखे फिचर्स पण मिळतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here