Categories: बातम्या

Realme 10 Series चे स्पेसिफिकेशन्स लीक

Realme 10 Launch: रियलमीनं काही दिवसांपूर्वी आपल्या सी सीरिज अंतर्गत दोन स्मार्टफोन सादर केले होते. कंपनीची ही सीरिज एंट्री लेव्हल स्मार्टफोनसाठी लोकप्रिय आहे. परंतु त्यापेक्षा जास्त रियलमी कंपनीची नंबर सीरीज लोकप्रिय आहे. नंबर या सीरीजमध्ये असे स्मार्टफोन लाँच केले जातात जे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत दमदार असतात तसेच यांची किंमत देखील किफायतशीर असते. भारतात सध्या Realme 9 Series मध्ये 7 मॉडेल लाँच करण्यात आले आहेत आणि आता कंपनी आपली नवीन आणि अ‍ॅडव्हान्स Realme 10 सीरिज जगासमोर ठेऊ शकते.

Realme 10 चे लीक स्पेसिफिकेशन्स

रियलमी 10 संबंधित ही नवीन बातमी CB test certification च्या माध्यमातून समोर आली आहे. या सर्टिफिकेशन्स साइटवर फोन RMX3630 मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे जिथे Realme 10 च्या Battery चा खुलासा झाला आहे. या लिस्टिंगनुसार हा नवीन रियलमी मोबाइल फोन 5,000एमएएच बॅटरीसह बाजारात लाँच केला जाऊ शकतो. Realme 10 Series पुढील वर्षी मार्केटमध्ये येऊ शकते, या सीरिजमध्ये किती हँडसेट येतील याची माहिती मात्र मिळाली नाही.

Realme GT Neo 3T 5G Price

अलीकडेच रियलमी जीटी नियो 3टी 5जी फोन भारतात तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 6 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची प्राइस 29,999 रुपये आहे. फोनचा दुसरा व्हेरिएंट 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह 31,999 रुपये तर सर्वात मोठा व्हेरिएंट 8 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेजसह 33,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. Realme GT Neo 3T 5G 23 सप्टेंबरपासून Dash Yellow, Drifting White आणि Shade Black कलरमध्ये विकत घेता येईल.

Realme GT Neo 3T 5G Specifications

रियलमी जीटी नियो 3टी स्मार्टफोन 6.62 इंचाच्या फुलएचडी+ Samsung E4 AMOLED डिस्प्लेसह लाँच केला गेला आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट तथा 1000हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी स्मार्टफोनमध्ये 3.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 870 5जी चिपसेट देण्यात आला आहे. या रियलमी मोबाइल 80वॉट सुपरडार्ट चार्ज टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. हे देखील वाचा: रेडमीला बाजारातून हद्दपार करण्यासाठी रियलमी सज्ज; फक्त 7,499 रुपयांमध्ये लो बजेट Realme C30s लाँच

फोटोग्राफीसाठी रियलमी जीटी नियो 3टी ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला एफ/2.3 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलच 4सीएम मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा रियलमी मोबाइल एफ/2.45 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Published by
Siddhesh Jadhav