Categories: बातम्या

Realme 12+ 5G सोबत Realme 12 5G पण होत आहे लाँच, ब्रँडने केले कंफर्म

Highlights
  • Realme 12 5G 108 मेगापिक्सल कॅमेरासोबत असणार आहे.
  • या मोबाईलची प्री-ऑर्डर आजपासून सुरु झाली आहे.
  • फोनची किंमत 12 ते 15 हजार रुपये असू शकते.


मोबाईल ब्रँड Realme येत्या 6 मार्चला भारतात Realme 12+ 5G ला लाँच करणार आहे. तसेच, आता त्याचबरोबर Realme 12 5G पण याच दिवशी येत आहे. कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि आपल्या वेबसाईटवर नवीन टीजर शेअर करत याची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे यात जबरदस्त 108MP रिअर कॅमेरा मिळण्याची पुष्टी करण्यात आली आहे. तर चला, पुढे रियलमी 12 5 जी सादर होण्याची तारीख आणि अन्य संभावित माहिती सविस्तर जाणून घेऊया.

Realme 12 5G च्या लाँचची तारीख आणि प्री आर्डरची माहिती

  • सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स आणि कंपनीच्या वेबसाईटवर Realme 12 5G च्या लाँचची माहिती समोर आली आहे.
  • नवीन टीजरनुसार Realme 12 5G 6 मार्चला Realme 12+ 5G सह दुपारी 12:00 वाजता लाँच केला जाईल.
  • ब्रँडने दोन्ही मोबाईलच्या प्री-ऑर्डरची माहिती पण शेअर केली आहे. यानुसार हा फोन आज दुपारी 2:00 वाजता प्री-ऑर्डर सोबत उपलब्ध होईल.
  • टीजरमध्ये एक मोठी गोष्ट ही पण समोर आली आहे की नवीन रियलमी 12 5G 108 मेगापिक्सल क्लियर पोर्ट्रेट मास्टर कॅमेरासह असणार आहे. यात 3x झूम सुविधा मिळणार आहे.

Realme 12 5G ची किंमत (संभाव्य)

  • आतापर्यंत रियलमी 12 सीरीजमध्ये 12 प्रो आणि प्रो प्लस मॉडेल बाजारात आहेत. त्याचबरोबर आता सामान्य 12 आणि प्लस मॉडेल पण येणार आहेत.
  • अपेक्षा आहे की Realme 12 5G या सीरीजचा सर्वात स्वस्त मॉडेल बनू शकते.
  • रियलमी 12 प्लस मॉडेलबद्दल समोर आले आहे की हा 20 हजार रुपयांच्या रेंजमध्ये येऊ शकतो. तर रियलमी 12 5जी पण 12 ते 15 हजार रुपयांमध्ये येण्याची शक्यता आहे.

Realme 12 5G चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • डिस्प्ले: लीकनुसार, Realme 12 5G मध्ये 6.72-इंचाचा IPS LCD डिस्प्ले असू शकतो. यात FHD+ रिजॉल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट मिळू शकतो. सुरक्षेसाठी साईड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर असू शकतो.
  • प्रोसेसर: गीकबेंचनुसार फोन MediaTek Dimensity 6100+ चिपसेटवर काम करू शकतो.
  • स्टोरेज: स्मार्टफोनमध्ये मेमरी स्टोरेजसाठी 8 जीबी +128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेले बेस मॉडेल लाँच केले जाऊ शकते.
  • बॅटरी: टीयूवी रीनलँड लिस्टिंगनुसार फोनमध्ये 4,880mAh बॅटरी दिली जाऊ शकते. तसेच, लाँचच्या वेळी हा 5,000mAh बॅटरीसह येऊ शकतो.
  • कॅमेरा: टीजरमध्ये Realme 12 5G मोठ्या गोलाकार कॅमेरा मॉड्यूलमध्ये दिसला आहे. यात ड्युअल किंवा ट्रिपल कॅमेरा LED लिस्टसह देण्यात आला आहे.
  • ओएस: Realme 12 5G लेटेस्ट Android 14 ओएसवर आधारित ठेवला जाऊ शकतो.
Published by
Kamal Kant