Categories: बातम्या

Realme X आला भारतात, पॉप-अप सेल्फी, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, 8जीबी रॅम आणि किंमत 16,999 रुपयांपासून सुरु

Realme ने गेल्याच महिन्यात सांगितले होते कि कंपनी भारतात आपला पहिला पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन Realme X घेऊन येणार आहे. आज रियलमी ने आपल्या फॅन्सना भेट देत हा स्मार्टफोन सादर केला आहे. शानदार लुक आणि दमदार स्पेसिफिकेशन्स असलेला Realme X इंडियन टेक मार्केट मध्ये आला आहे. हा फोन 16,999 रुपयांच्या सुरवातीच्या किंमतीत लॉन्च झाला आहे जो 24 जुलै पासून फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल.

Realme X डिजाईन

या फोनची सर्वात मोठी खासियत Realme X चा लुक आणि याची डिजाईन आहे. हा कंपनीचा पहिला असा स्मार्टफोन आहे जो पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोन मध्ये बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे ज्यावर कोणतेही फिजिकल बटण व नॉच नाही. Realme X च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. आतापर्यंत रियलमी फोन मध्ये डावीकडे रियर कॅमेरा असायचा पण या फोन मध्ये रियर कॅमेरा सेटअप पॅनलच्या मधोमध वर्टिकल शेप मध्ये देण्यात आला आहे.

Realme X च्या रियर कॅमेरा सेटअप मध्ये फ्लॅश लाईट पण आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आलेला नाही तसेच हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो. Realme X च्या उजव्या पॅनल वर पावर बटण आणि डाव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर देण्यात आला आहे. तसेच फोनच्या पॅनल वर यूएसबी पोर्ट तसेच स्पीकर आहे.

Realme X स्पेसिफिकेशन्स

फ्लॅगशिप कॅटेगरी मध्ये लॉन्च झालेला हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2340 X 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.53-इंचाच्या फुल एचडी+ ऐज-टू-ऐज ऐमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने आपला फोन अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी सह बाजारात आणला आहे ज्यामुळे फक्त डिस्प्ले वर टच करताच फोन अनलॉक होईल.

Realme X एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस 6.0 वर सादर केला गेला आहे जो 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टाकोर प्रोसेसर साथ 10एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 710 एसओसी चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी Realme X मध्ये एड्रेनो 616 जीपीयू पण आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Realme X सेल्फी साठी एफ/2.0 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलच्या पॉप-अप कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. तसेच, फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तिथे फ्लॅश लाईट सह एफ/1.7 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे.

Realme X मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये एआई हाइपरबूस्ट टेक्नोलॉजी पण आहे. हा एक डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह पावर बॅकअप साठी या फोन मध्ये VOOC फ्लॅश चार्ज 3.0 टेक्नॉलॉजी असलेली 3,765एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. इंडियन मार्केट मध्ये Realme X पोलर व्हाईट आणि स्पेस ब्लू कलर मध्ये लॉन्च झाला आहे.

वेरिएंट्स आणि किंमत

Realme X कंपनी द्वारा 2 वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे. विशेष म्हणजे Realme X सोबत कंपनीने Realme X Spider Man – Far From Home एडिशन पण लॉन्च केला आहे ज्याची किंमत 20,999 रुपये आहे. या वेरिएंट मध्ये पण 8जीबी रॅम सह 128जीबी ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

4जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज = 16,999 रुपये

8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज = 19,999 रुपये

रियलमी एक्स वीडियो

Published by
Siddhesh Jadhav