Categories: बातम्या

200MP कॅमेरा असलेला Redmi Note 13 Pro+ वर्ल्ड चॅम्पियन्स एडिशन भारतात झाले लाँच, जाणून घ्या किंमत

शाओमीने अर्जेंटीना फुटबॉल एसोसिएशनसह मिळून Redmi Note 13 Pro+ World Champions Edition फोन लाँच केला आहे. या ब्रँडच्या 10 व्या वर्धापन दिनानिमित्त फुटबॉल प्रेमी आणि खेळ प्रेमी ग्राहकांना खूप पसंद येऊ शकतो. डिव्हाईसला ब्लू कलर आणि आकर्षक डिझाईन पॅटर्नची एंट्री मिळाली आहे. चला, पुढे किंमत आणि स्पेसिफिकेशन सविस्तर जाणून घेऊया.

Redmi Note 13 Pro+ वर्ल्ड चॅम्पियन्स एडिशनचा फोटो

  • नवीन रेडमी नोट 13 प्रो+ वर्ल्ड चॅम्पियन्स एडिशन ब्लू कलरमध्ये येतो. यात बॅक पॅनलवर फुटबॉल क्लबचा झेंडा छापलेला आहे, ज्यात ’10’ नंबर आणि ‘अर्जेंटीना’ लिहिले आहे.
  • फोनच्या ट्रिपल कॅमेरा मॉड्यूलमध्ये गोल्ड कलर केसिंग आहे, जो खूप शार्प दिसत आहे. तसेच फ्रेम पण ब्लू कलरची आहे.
  • नवीन रेडमी नोट 13 प्रो+ वर्ल्ड चॅम्पियन्स एडिशन 120W चार्जर आणि केबल पण फोनसारखी ब्लू कलरची आहे.

Redmi Note 13 Pro+ वर्ल्ड चॅम्पियन्स एडिशनची किंमत आणि उपलब्धता

  • रेडमी नोट 13 प्रो+ वर्ल्ड चॅम्पियन्स एडिशन फक्त 12GB + 512GB स्टोरेज ऑप्शनमध्ये आला आहे. डिव्हाईस ची किंमत भारतात 34,999 रुपये ठेवण्यात आली आहे.
  • नवीन स्पेशल एडिशन मोबाईलचा सेल येत्या 15 मे पासून फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन, Mi.com आणि Xiaomi रिटेल स्टोरवर सुरु होईल.
  • सेल दरम्यान कंपनी 3,000 रुपये पर्यंतचा ICICI बँक डिस्काऊंट या 3,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस पण देणार आहे.

Redmi Note 13 Pro+ वर्ल्ड चॅम्पियन्स एडिशनचे स्पेसिफिकेशन

  • डिस्प्ले: Redmi Note 13 Pro+ वर्ल्ड चॅम्पियन्स एडिशनमध्ये 6.67-इंचाचा 1.5K अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे. यावर 2712 x 1220 पिक्सल रिजॉल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टसचे प्रोटेक्शन मिळते.
  • प्रोसेसर: हा तगडा मोबाईल MediaTek Dimensity 7200 Ultra चिपसेटसह सादर झाला आहे.
  • रॅम आणि स्टोरेज: फोनमध्ये तुम्हाला 12GB पर्यंत रॅम + 512GB पर्यंत इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे.
  • कॅमेरा: नवीन फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप LED फ्लॅशसह मिळतो ज्यात OIS सह 200MP Samsung ISOCELL HP3 प्रायमरी, 8MP अल्ट्रा-वाईड अँगल आणि 2MP मॅक्रो सेन्सर लावला आहे. तसेच, सेल्फीसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे.
  • बॅटरी: फोनमध्ये 120W फास्ट चार्जिंगसह 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
  • इतर: मोबाईल फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, USB टाइप-C पोर्ट, NFC, डॉल्बी अ‍ॅटमॉस आणि पाणी आणि धूळीपासून वाचण्यासाठी IP68 रेटिंगसह आहे.
  • ओएस: ऑपरेटिंग सिस्टम पाहता Redmi Note 13 Pro+ WC Edition अँड्रॉईड 13 आधारित MIUI 14.3 वर चालतो. ज्याला लेटेस्ट सॉफ्टवेअर अपडेट पण मिळतील.
Published by
Kamal Kant