5GJio - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 22 Oct 2020 14:00:02 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 या देशात आहे सर्वात फास्ट 5G स्पीड, क्षणात होईल संपूर्ण मूवी डाउनलोड https://www.91mobiles.com/marathi/saudi-arabia-has-fastest-5g-download-speed-see-full-list/ https://www.91mobiles.com/marathi/saudi-arabia-has-fastest-5g-download-speed-see-full-list/#respond Thu, 22 Oct 2020 14:00:02 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8636 लेटेस्ट रिपोर्ट नुसार सौदी अरेबिया मध्ये 37 टक्के, कुवेत मध्ये 27.7 टक्के, थायलंड मध्ये 94.9 टक्के आणि हॉंगकॉंग मध्ये 22.9 टक्के युजर्सना 5G नेटवर्कचा ऍक्सेस मिळतो.

The post या देशात आहे सर्वात फास्ट 5G स्पीड, क्षणात होईल संपूर्ण मूवी डाउनलोड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंटरनेटचे विश्वातील कनेक्टिविटीच्या पाचव्या जेनरेशन 5G सपोर्ट असलेले फोन्स आता जगासोबतच भारतात आले आहेत. भारतात सध्या 5G कनेक्टिविटी नाही. भारतात 5G घेऊन येण्यासाठी टेलीकॉम कंपनी Jio खूप प्रयत्न करत आहे, ज्यामुळे कंपनीने अमेरिकेत आपल्या 5जी टेक्नोलॉजीची यशस्वी चाचणी केली आहे. इंडस्ट्री ट्रॅकर ओपन सिग्नलने लेटेस्ट रिपोर्ट जारी केला आहे, ज्यात त्या देशांची यादी आहे जे 5G डाउनलोड स्पीड मध्ये टॉपला आहेत, यात भारताचे नाव नाही. पण जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल कि कोणत्या देशांनी यात बाजी मारली आहे तर पुढे आम्ही याची माहिती दिली आहे.

ओपन सिग्नलच्या रिपोर्टनुसार सौदी अरेबिया सरासरी 5G इंटरनेट स्पीड 377.2Mbps आहे, ज्यामुळे काही सेकंदात फुल एचडी फिल्म आणि आहेवी डेटा डाउनलोड केला जाऊ शकतो. त्यानंतर साउथ कोरियाचा नंबर येतो, जिथे सरासरी 5G इंटरनेट स्पीड करीब 336.1 मेगाबिट्स प्रति सेकंड (Mbps) आहे.

OpenSignal ने 1 जुलै पासून 28 सप्टेंबर दरम्यान जगातील 15 देशांचा 5G इंटरनेट स्पीड टेस्ट केला होता, ज्यात समजले कि सौदी अरेबिया नंतर साउथ कोरिया दुसऱ्या स्थानावर वर आहे. पुढे बघा 5G डाउनलोड स्पीड मध्ये कोणता देश कोणत्या क्रमांकावर आहे.

1. Saudi Arabia

2. South Korea

3. Australia

4. Taiwan

5. Spain

6. Kuwait

7. Canada

8. Italy

9. Thailand

10. Switzerland

11. UK

12. Hong Kong

13. Germany

14. Netherlands

15. USA

5G ऍक्सेसिबिलिटी

लेटेस्ट रिपोर्ट नुसार सौदी अरेबिया मध्ये 37 टक्के, कुवेत मध्ये 27.7 टक्के, थायलंड मध्ये 94.9 टक्के आणि हॉंगकॉंग मध्ये 22.9 टक्के युजर्सना 5G नेटवर्कचा ऍक्सेस मिळतो. सध्या साउथ कोरिया मध्ये जवळपास 87 लाख 5G मोबाईल अकाउंट्स आहेत, त्यातले अनेक गेल्या महिन्यात या नेटवर्क वर आले आहेत.

हे देखील वाचा : BSNL घेऊन आली फेस्टिव सीजन ऑफर, युजर्सना मिळेल बंपर लाभ

भारतात लवकरच होईल 5G सर्विसची सुरवात

भारतीय टेलीकॉम कंपनी रिलायंस जियोने यावर्षी आपल्या 43व्या एजीएम मध्ये भारतात 5G ची टेस्टिंग करणार असल्याचे म्हटले होते. जियोने अमेरिकेत क्वालकॉम सह मिळून 5G ची यशस्वी चाचणी केली आहे. या टेस्ट मध्ये 1Gbps पर्यंत 5G स्पीड मिळाला आहे. इतकेच नव्हे तर जियो भारतात सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन आणण्याची तयारी करत आहे, ज्याबाबत अनेक दिवसांपासून बातम्या येत आहेत.

The post या देशात आहे सर्वात फास्ट 5G स्पीड, क्षणात होईल संपूर्ण मूवी डाउनलोड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/saudi-arabia-has-fastest-5g-download-speed-see-full-list/feed/ 0