फेस्टिवल सीजन पाहता बीएसएनएल (BSNL) म्हणजे भारत संचार निगम लिमिटेडने आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर सादर केली आहे. कंपनी द्वारे सादर केल्या गेलेल्या या बंपर ऑफर मध्ये युजर्सना अनेक प्रीपेड वाउचर्स आणि स्पेशल टॅरिफ वाउचर्स वर वैधता वाढवून मिळेल. बीएसएनएलने ऑफर अंतर्गत 1999 रुपये सोबतच 699, 247 आणि 147 च्या प्रीपेड वाउचर्स आणि स्पेशल टॅरिफ वाउचर्स वर वैधता वाढवली आहे.
30 नोव्हेंबर पर्यंत मिळेल ऑफर
या ऑफरची सुरवात 17 ऑक्टोबर पासून झाली आहे जी 30 नोव्हेंबर पर्यंत चालेल. बीएसएनएलच्या प्रीपेड आणि टॅरिफ रिचार्ज प्लानचा फायदा घेण्यासाठी युजर्सकडे 30 नोव्हेंबर पर्यंतची वेळ आहे. जर युजर्स या दरम्यान बीएसएनएलच्या एखाद्या स्पेशल प्रीपेड आणि टॅरिफ वाउचरने रिचार्ज करत असतील तर त्यांना याचा फायदा प्लान्सनुसार मिळू शकतो.
या रिचार्ज वर मिळेल जास्त फायदा
युजर्सनी जर 1,999 रुपयांचा प्रीपेड प्लान घेतला तर त्यांना 365 दिवसांच्या ऐवजी 425 दिवसांची वॅलिडिटी मिळेल. या प्लान मध्ये युजर्सना अनलिमिटेड वॉयस कॉल सोबतच 3 जीबी प्रति दिन डेटा मिळेल. तसेच इतर लाभ बीएसएनएल यूजर पण मिळवू शकतात, ज्यात 2 महिन्याचे इरॉस नाऊ सब्सक्रिप्शन आणि बीएसएनएल ट्यून्स पण आहेत.
699 रुपये आणि 247 रुपयांच्या रिचार्ज वर मिळेल हा फायदा
बीएसएनएलच्या या ऑफर अंतर्गत युजर्सनी 699 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज केला तर त्यांना आता 160 दिवसांच्या ऐवजी 180 दिवसांची वॅलिडिटी मिळेल. तसेच यात युजर्सना प्रति दिन 0.5 जीबी डेटा सोबतच रोज 100 एसएमएस आणि 60 दिवस फ्री बीएसएनएल ट्यून्सचा लाभ मिळेल.
हे देखील वाचा : BSNL चा धमाका, लॉन्च केले 4 नवीन Bharat Fiber प्लान, Jio ला मिळेल आव्हान
दुसरीकडे 247 रुपयांच्या रिचार्ज मध्ये युजर्सना 30 दिवसांच्या ऐवजी 40 दिवसांची वॅलिडिटी मिळेल. इतकेच नव्हे तर या प्लान मध्ये युजर्सना अनलिमिटेड वॉयस कॉल सोबतच रोज 3जीबी डेटा मिळेल.
147 रुपयांच्या रिचार्ज वर मिळेल हा फायदा
प्रोमोशन ऑफर मध्ये युजर्सनी 147 रुपयांचा रिचार्ज केला तर त्यांना 30 दिवसांच्या ऐवजी 35 दिवसांची वैधता दिली जाईल. वैधतेव्यतिरिक्त या प्लान मध्ये युजर्स एकूण 10 जीबी डेटा आणि 30 दिवसांसाठी बीएसएनएल ट्यून्सची सुविधा फ्री मिळेल.














