65W Super - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 13 Sep 2019 11:48:24 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 OPPO घेऊन येत आहे जगातील सर्वात वेगवान चार्ज होणारा फोन Reno Ace, येईल 65W SuperVOOC टेक्नोलॉजी सह https://www.91mobiles.com/marathi/brian-shen-confirmed-oppo-65w-super-vooc-fast-charging-technology-reno-ace/ https://www.91mobiles.com/marathi/brian-shen-confirmed-oppo-65w-super-vooc-fast-charging-technology-reno-ace/#respond Fri, 13 Sep 2019 11:48:24 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5300 OPPO ने अलीकडेच भारतात आपली ‘रेनो सीरीज’ वाढवत तीन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. यात Oppo Reno 2, Reno 2Z आणि Reno 2F चा समावेश आहे. हे तिन्ही स्मार्टफोन जगात सर्वात आधी भारतातच लॉन्च केले गेले आहेत. विशेष म्हणजे Oppo Reno 2 जगातील पहिला असा स्मार्टफोन आहे जो क्वॉड रियर कॅमेरा सह 20x digital zoom […]

The post OPPO घेऊन येत आहे जगातील सर्वात वेगवान चार्ज होणारा फोन Reno Ace, येईल 65W SuperVOOC टेक्नोलॉजी सह first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने अलीकडेच भारतात आपली ‘रेनो सीरीज’ वाढवत तीन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. यात Oppo Reno 2, Reno 2Z आणि Reno 2F चा समावेश आहे. हे तिन्ही स्मार्टफोन जगात सर्वात आधी भारतातच लॉन्च केले गेले आहेत. विशेष म्हणजे Oppo Reno 2 जगातील पहिला असा स्मार्टफोन आहे जो क्वॉड रियर कॅमेरा सह 20x digital zoom आणि 5x hybrid zoom ला सपोर्ट करतो. Reno 2 द्वारे हा रेकॉर्ड करणारी OPPO एवढयावर थांबणार नाही. OPPO ने सांगितले आहे कि कंपनी 65W SuperVOOC टेक्नॉलॉजी वर काम करत आहे आणि लवकरच हि टेक्नोलॉजी असलेला स्मार्टफोन टेक मंचावर सादर करेल.

या सुपर फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीची माहिती स्वतः OPPO Vice President Brian Shen यांनी दिली आहे. ब्रायन यांनी चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर पोस्ट करून कंफर्म केले आहे कि Oppo 65W SuperVOOC टेक्नॉलॉजी सह येणाऱ्या स्मार्टफोन साठी तयार आहे आणि हा स्मार्टफोन ब्रँडच्या रेनो सीरीज अंतर्गत लॉन्च केला जाईल. ओपोच्या अधिकाऱ्यांनी फोनचे नाव Oppo Reno Ace सांगितले आणि कंपनी ऑक्टोबर मध्ये Reno Ace चे मास प्रोडक्शन सुरु करेल.

65W SuperVOOC

मोबाईल फोन चार्जिंगची नवीन टेक्नॉलॉजी 65W SuperVOOC fast charging technology कंपनीने अजुनारी अधिकृतपणे सादर केली नाही. पण आशा आहे कि या 16 सप्टेंबरला OPPO आपली नवीन चार्जिंग टेक्नॉलॉजी 65W SuperVOOC टेक मंचावर सादर करेल. हि टेक्नॉलॉजी जगातील सर्वात वेगवान मोबाईल चार्जिंग टेक्नॉलॉजी असेल जी कदाचित 10 मिनिटांच्या चार्ज मध्ये फोनची बॅटरी 50 टक्क्यांपर्यंत चार्ज करेल.

हे देखील वाचा: Exclusive: लवकरच भारतात लॉन्च होईल Samsung चा 64 MP कॅमेरा असलेला Galaxy A70s, पोस्टर झाला लीक

Oppo Reno Ace

कंपनीच्या वाइस प्रेजिडेंटने Oppo Reno Ace स्मार्टफोनच्या नावाचा खुलासा करत असे सांगितले आहे कि पुढल्या महिन्यात हा फोन मास प्रोडक्शन साठी जाईल. पण या फोनचे स्पेसिफिकेशन्स कसे असतील हि माहिती अजूनह गुप्त ठेवण्यात आली आहे. हे निश्चित झाले आहे कि Oppo Reno Ace कंपनी 65W SuperVOOC fast charging technology सह लॉन्च होईल. Oppo Reno Ace जगातील सर्वात वेगवान चार्जिंग असलेला स्मार्टफोन असेल.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी ब्रायन यांनी एक फोनचा फोटो पण शेयर केला होता जो आता Oppo Reno Ace असल्याचे बोलले जात आहे. फोटो मध्ये फोन कर्व्ड बेजल लेस डिस्प्ले सह दिसला होता ज्यात स्क्रीनच्या दोन्ही बाजूला बॉडी पार्ट नव्हता आणि डिस्प्ले बॅक पॅनलकडे कर्व्ड होता. या फोटो मध्ये डिस्प्लेचा वरचा आणि खालचा भाग पण अल्ट्रा स्लीम दाखवण्यात आला होता. फोनच्या फ्रंट पॅनल वर कोणतेही सेंसर, बटण व नॉच नाही.

हे देखील वाचा: 6,000 रुपये स्वस्त मिळत आहेत Samsung Galaxy Note 10 आणि Note 10+, जाणून घ्या कुठे आणि कसे घ्यावे विकत

Oppo Reno Ace बद्दल बोलले जात आहे कि हा फोन एक प्रीमियम डिवाईस आले जो फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये लॉन्च केला जाईल. या फोन मध्ये 90हर्ट्ज रिफ्रेश रेट वाली डिस्प्ले दिला जाऊ शकतो. तसेच चर्चा अशी आहे कि Oppo Reno Ace क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 855+ चिपसेट वर लॉन्च केला जाऊ शकतो. येत्या 16 सप्टेंबरला Oppo Reno Ace बद्दल एखादी घोषणा केली जाऊ शकते.

ओपो रेनो 2 वीडियो

The post OPPO घेऊन येत आहे जगातील सर्वात वेगवान चार्ज होणारा फोन Reno Ace, येईल 65W SuperVOOC टेक्नोलॉजी सह first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/brian-shen-confirmed-oppo-65w-super-vooc-fast-charging-technology-reno-ace/feed/ 0