6,000 रुपये स्वस्त मिळत आहेत Samsung Galaxy Note 10 आणि Note 10+, जाणून घ्या कुठे आणि कसे घ्यावे विकत

Samsung ने ऑगस्ट मध्ये भारतीय बाजारात आपली ‘नोट सीरीज’ वाढवत पावरफुल डिवाईस Galaxy Note 10 आणि Galaxy Note 10+ लॉन्च केले होते. हे दोन्ही डिवाईस हाईएंड स्पेसिफिकेशन्स सह येतात जे फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये आले आहेत. दमदार स्पेसिफिकेशन्स असलेल्या या स्मार्टफोन्सची किंमत पण हाई बजेट आहे. पण आता Samsung आपल्या फॅन्सना Galaxy Note 10 आणि Note 10+ डिवाईस स्वस्तात विकत घेण्याची संधी देत आहे. गॅलेक्सी नोट सीरीजच्या या दोन्ही स्मार्टफोन्सचे सर्व मॉडेल्स थेट 6,000 रुपये स्वस्तात विकत घेता येतील.

Samsung चे हे डिवाईसेज डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म Paytm वर स्वस्तात विकत घेता येतील. पेटीएम वर Galaxy Note 10 आणि Note 10+ चे सर्व वेरिएंट डिस्काउंट सह सेल साठी लिस्ट करण्यात आले आहेत. Paytm ने गॅलेक्सी नोट 10 सीरीजचे सर्व मॉडेल्स आणि वेरिएंट्स वर थेट 6,000 रुपयांची सूट दिली आहे. या डिस्काउंट सोबत पेटीएम 5 टक्क्यांचा अतिरिक्त कॅशबॅक आणि नो कॉस्ट ईएमआई ऑफर पण देत आहे.

अशी आहे नवीन किंमत

पेटीएम ऑफर बद्दल बोलायचे तर या प्लॅटफॉर्म वरून Galaxy Note 10 स्मार्टफोन विकत घेतल्यास फोन साठी 63,999 रुपये द्यावे लागतील. हा स्मार्टफोन 8जीबी रॅम सोबत 256जीबी इंटरनल स्टोरेज सह लॉन्च झाला होता ज्याची खरी किंमत 69,999 रुपये आहे. त्याचप्रमाणे 79,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला Galaxy Note 10+ 12जीबी रॅम + 256जीबी स्टोरेज वेरिएंट Paytm वर ऑफर अंतर्गत 73,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

Samsung Galaxy Note 10+ चा 12जीबी रॅम व 512जीबी स्टोरेज वेरिएंट कंपनीने 89,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. पण पेटीएम वर हा स्मार्टफोन वेरिएंट ऑफर अंतर्गत 83,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होत आहे.

असा मिळेल फायदा

Samsung Galaxy Note 10 आणि Galaxy Note 10+ वर Paytm देत असलेल्या ऑफर अंतर्गत कंपनीने 6,000 रुपयांचा डिस्काउंट कॅशबॅकच्या स्वरूपात देत आहे. स्मार्टफोनच्या खरेदीवर यूजरला MOBSAM6K प्रोमोकोड अप्लाई करावा लागेल, ज्यानंतर आपोआप फोन प्राइज 6,000 कमी होईल. विशेष म्हणजे 6 हजारांचा हा कॅश बॅक पेटीएम वॉलेट मधेच क्रेडिट होईल आणि याचा वापर पेटीएम वर रिचार्ज, बिल पेमेंट आणि शॉपिंग साठी करता येईल.

हे पण बेनिफिट आहेत

6,000 रुपयांच्या कॅशबॅक सोबतच Paytm Samsung Galaxy Note 10 आणि Note 10+ च्या खरेदीवर 5 टक्क्यांचा अतिरिक्त कॅशबॅक पण देत आहे, ज्यासाठी एचडीएफसी बॅंकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डने पेमेंट करावे लागेल. त्याचबरोबर Samsung नोट सीरीजचे हे दोन्ही मॉडेल्स पेटीएम वर नो कास्ट ईएमआई सह पण विकत घेता येतील.

सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 प्लस वीडियो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here