Android TV - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 19 Jan 2021 14:15:14 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 फक्त 19,999 रुपयांमध्ये लॉन्च झाली हि 42 इंच डिस्प्ले असलेली शानदार अँड्रॉइड स्मार्टटीव्ही https://www.91mobiles.com/marathi/kodak-android-tv-42-inch-fhdx7xpro-launch-in-7xpro-series-price-at-rs-19-999/ https://www.91mobiles.com/marathi/kodak-android-tv-42-inch-fhdx7xpro-launch-in-7xpro-series-price-at-rs-19-999/#respond Tue, 19 Jan 2021 14:15:14 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9701 नवीन कोडॅक टीव्ही पाहता याचा 42 इंच मॉडेल हां फुलएचडी डिस्प्लेला सपोर्ट करतो तर 50 इंच मॉडेल अल्ट्राएचडी डिस्प्ले पॅनल वर लॉन्च केला गेला आहे.

The post फक्त 19,999 रुपयांमध्ये लॉन्च झाली हि 42 इंच डिस्प्ले असलेली शानदार अँड्रॉइड स्मार्टटीव्ही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या दोन वर्षात भारतीय टेलीविजन बाजारात मोठे बदल झाले आहेत. स्वस्त झालेल्या इंटरनेट पॅकने स्मार्ट टेलीविजन मार्केट मध्ये नवीन उभारी आणली आहे आणि कमी किंमतीत शानदार फीचर्स असलेले अँड्रॉइड टीव्ही उपलब्ध झाले आहेत. असेच स्वस्त अँड्रॉइड टेलीविजन घेऊन येणाऱ्या टेक कंपनी Kodak ने साल 2021 चा आपला पहिला प्रोडक्ट सादर करत भारतीय बाजारात नवीन स्मार्ट टेलीविजन FHDX7XPRO TV लॉन्च केला आहे जो फक्त 19,999 रुपयांच्या बेस किंमतीत विकत घेता येईल.

Kodak चा हा नवीन एलईडी स्मार्ट टीव्ही 7XPRO Android सीरीज अंतगर्त आला आहे. कंपनीने आपला हा स्मार्टटीव्ही दोन मॉडेल मध्ये बाजारात आणला आहे जे 42 इंच आणि 50 इंच डिस्प्लेला सपोर्ट करतात. 42-inch UHDX7XPRO TV 19,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे तर 50-inch UHDX7XPRO TV 29,999 रुपयांमध्ये मार्केट मध्ये आला आहे. हि नवीन Kodak HD LED TV शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर विक्रीसाठी उपलब्ध होईल.

हे देखील वाचा : लॉन्चच्या आधी Motorola Nio ची लाइव इमेज झाली लीक, 6 कॅमेरा आणि पवारफुल बॅटरी सह करेल एंट्री

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

नवीन कोडॅक टीव्ही पाहता याचा 42 इंच मॉडेल हां फुलएचडी डिस्प्लेला सपोर्ट करतो तर 50 इंच मॉडेल अल्ट्राएचडी डिस्प्ले पॅनल वर लॉन्च केला गेला आहे. हा अँड्रॉइड टीव्ही क्रोमकॉस्टला सपोर्ट करतो ज्यात प्रोसेसिंगसाठी 1.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वर काम करणारा एआएम कोर्टेक्स-ए53 क्चॉड-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी या स्मार्टटीव्ही मध्ये माली450 जीपीयू आहे. हा टीव्ही गुगल असिस्टेंटला सपोर्ट करतो.

Kodak चा हा नवीन एलईडी स्मार्ट टीव्ही 7XPRO Android सीरीज अंतगर्त आला आहे.

Kodak Android TV कंपनीने 2 जीबी इंटरनल रॅम वर लॉन्च केला आहे सोबत 8 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. टीव्हीचा डिस्प्ले 500 निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो तर चांगल्या म्यूजिक व साउंड क्वॉलिटीसाठी या टीव्ही मध्ये 30वॉट स्पीकर आहे. या अँड्रॉइड टीव्ही मध्ये YouTube, Prime Video, Disney+ Hotstar, Sony Liv, MX player आणि Zee5 सोबतच इतर ओटीटी ऍप्स प्रीइंस्टाल्ड आहेत. नवीन अँड्रॉइड स्मार्टटीव्ही मध्ये 3 एचडीएमआई पोर्ट, 2 यूएसबी पोर्ट आणि एक 3.5एमएम हेडफोन जॅक सोबतच ए.वी. पॅनल देण्यात आला आहे.

The post फक्त 19,999 रुपयांमध्ये लॉन्च झाली हि 42 इंच डिस्प्ले असलेली शानदार अँड्रॉइड स्मार्टटीव्ही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/kodak-android-tv-42-inch-fhdx7xpro-launch-in-7xpro-series-price-at-rs-19-999/feed/ 0
1 मार्च पासून टीव्ही बघणे होणार स्वस्त, सरकारने दिली नव्या वर्षाची भेट https://www.91mobiles.com/marathi/tv-customers-will-get-200-channels-in-130-rupees-trai-gives-big-gift-this-new-year-2020/ https://www.91mobiles.com/marathi/tv-customers-will-get-200-channels-in-130-rupees-trai-gives-big-gift-this-new-year-2020/#respond Fri, 03 Jan 2020 10:53:35 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6181 ट्राईच्या या नवीन नियमांचा फायदा त्या सर्व ग्राहकांना मिळेल ज्यांना टीव्ही बघायला आवडते.

The post 1 मार्च पासून टीव्ही बघणे होणार स्वस्त, सरकारने दिली नव्या वर्षाची भेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे ट्राई देशातील टीव्ही ग्राहकांसाठी खुशखबर दिली आहे. ट्राईच्या नवीन नियमांनुसार आता येत्या 1 मार्च 2020 पासून टीव्ही ग्राहकांना 130 रुपयांमध्ये (टॅक्स वगळता) कमीत कमी 200 फ्री टू एयर चॅनेल बघायला मिळतील. याआधी ग्राहकांना 130 रुपयांमध्ये फक्त 100 चॅनेल मिळत होते.

पुन्हा बदलेल चॅनेल्सची किंमत

ट्राईने स्पष्ट केले आहे कि कंपन्यांना नवीन टॅरिफची माहिती 15 जानेवारी पर्यंत आपल्या वेबसाइट वर अपडेट करावी लागेल. 30 जानेवारी पर्यंत पुन्हा सर्व चॅनेल्सची रेट लिस्ट अपडेट केली जाईल, ज्यानंतर ग्राहक चॅनेल नवीन किंमतींसह निवडू शकतील. ट्राईच्या या नवीन नियमांचा फायदा त्या सर्व ग्राहकांना मिळेल ज्यांना टीव्ही बघायला आवडते.

https://img.hi.91mobiles.com/uploads/2019/09/oneplus-tv-main-image.jpg

ट्राईच्या नवीन नियमानंतर केबल ऑपरेटर आपल्या ग्राहकांकडून फ्री चॅनल्ससाठी प्रतिमाह 160 रुपयांपेक्षा जास्त पैसे घेऊ शकणार नाही. इतकेच नव्हे तर 12 रुपयांपेक्षा जास्त किंमत असणारे सर्व टीव्ही चॅनेल कोणत्याही बुकेचा भाग असणार नाहीत. जर ग्राहकनाची इच्छा असेल तर ते हे चॅनल्स घेऊ शकतील. याआधी ग्राहकांना जबरदस्तीने 12 रुपयांपेक्षा जास्त किंमत किंमत असणारे टीव्ही चॅनेल बुके मध्ये घ्यावे लागत होते.

साल 2019 मध्ये भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरण म्हणजे ट्राईने केबल आणि डीटीएच सब्सक्राइबर्सना आपल्या आवडीचे चॅनेल्स निवडण्याचे स्वातंत्र्य दिले होते. या नवीन नियमानंतर ग्राहक आपल्या वापरानुसार, चॅनेलची लोकप्रियता तसेच भाषेच्या आधारावर निवड करू शकत होते. यामुळे त्यांना फक्त त्याच चॅनेल्ससाठी पैसे द्यावे लागतात जे त्यांना बघायचे आहेत. यात किड्स चॅनेल्स, मूवीज, न्यूज, इंफोटेंमेंट व स्पोर्ट्स चॅनेल्स सह प्रादेशिक भाषांचा पण समावेश आहे.

त्याआधी केबल ऑपरेटर व डीटीएच सर्विसेजकडून ग्राहकांना मंथली पॅकेज मिळायचे. या पॅकेज मध्ये कोणत्या चॅनेलची किंमत किती आहे तसेच कोणता चॅनेल फ्री आहे हि माहिती कधीही यूजर्सना मिळत नसे. पण आता असे होत नाही.

The post 1 मार्च पासून टीव्ही बघणे होणार स्वस्त, सरकारने दिली नव्या वर्षाची भेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tv-customers-will-get-200-channels-in-130-rupees-trai-gives-big-gift-this-new-year-2020/feed/ 0