लॉन्चच्या आधी Motorola Nio ची लाइव इमेज झाली लीक, 6 कॅमेरा आणि पवारफुल बॅटरी सह करेल एंट्री

Credit: David Imel / Android Authority

स्मार्टफोन मार्केट मध्ये खूप आक्रमक दिसत असलेली मोटोराला लवकरच एक नवीन फोन लॉन्च करण्याची योजना बनवत असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी भारतात सर्वात स्वस्त 5G मोबाईल Motorola Moto G 5G लॉन्च केल्यांनतर Motorola बद्दल अफवा आहे कि कंपनी लवकरच भारतात अजून एक दमदार स्मार्टफोन Motorola Nio लॉन्च करू शकते. आता या फोनच्या एंट्रीच्या आधी या डिवाइसची झलक दिसली आहे, ज्यामुळे अंदाज लावला जाऊ शकतो कि या नवीन मोबाईलचा लुक किती शानदार असेल.

Motorola Nio कंपनीचा आगामी प्रीमियम स्मार्टफोन असल्याचे बोलले जात आहे, जो 2021 च्या पहिल्या तिमाहीत लॉन्च केला जाऊ शकतो. आता फोनचा कथित लाइव फोटो Nils Ahrensmeier (@NilsAhrDE) ने वीबो वर शेयर केला आहे. मोटोरोला Nio चा फ्रंट पॅनल आधी लीक झालेल्या इमेज प्रमाणे आहे, ज्यात सेल्फी कॅमेऱ्यांसाठी डुअल पंच-होल कटआउट आहे. फोटोज मध्ये दाखवण्यात आलेल्या सेटिंग्स मेनू वरून समजते कि यात Plus मोटोरोला एज प्लसचा उल्लेख आहे, याचा अर्थ हा एक प्रोटोटाइप आहे.

हे देखील वाचा : TV स्क्रीन वर दिसणाऱ्या या नंबर्स मागे कोणते कारण आहे, जाणून घ्या का हे घालवतात टीव्ही बघण्याची मजा

डिजाइन

Motorola Nio ची डिजाइन पाहता हा फ्लॅट डिस्प्ले आणि स्लिम बेजल सह दिसला आहे. फोनच्या उजव्या कोपऱ्यावर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन आहे. डिवाइस मध्ये पावर बटन मधेच फिंगरप्रिंट सेंसर एम्बडेड असेल. डावीकडे एक डेडिकेटड बटन असू शकतो जो गुगल असिस्टेंटसाठी काम करेल. फोन मध्ये चौकोनी क्वाड-कॅम सेटअप मागे असेल. या सेटअप मध्ये 64MP आणि ऑडियो झूम त्याखाली दिसत आहे. Motorola Nio मध्ये ग्लोसी फिनिश मागे दिला जाऊ शकतो.

हे देखील वाचा : 5000mAh बॅटरी असलेले टॉप 5 लेटेस्ट स्मार्टफोन, किंमत सुरु होत आहे फक्त 5,999 रुपयांपासून

स्पेसिफिकेशन्स

मोटोरोला Nio चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 1,080 × 2,520 पिक्सल रिजोल्यूशन सह 6.7 इंच FHD + डिस्प्ले आणि हाई 105Hz रिफ्रेश रेट असेल. सोबत फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 865 SoC एड्रिनो 650 जीपीयू सह येईल. हँडसेट मध्ये 256GB स्टोरेज आणि 8 जीबी रॅम सह 12 जीबी रॅम मॉडेल पण असू शकतो.

फोन एंड्रॉइड 11 ओएस वर काम करेल. फोन फ्यूल करण्यासाठी 5,000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते, पण फास्ट चार्जिंगची माहिती अजून समोर आली नाही.

मोटोरोला Nio मध्ये 64MP OmniVision OV64B प्राइमरी सेंसर, 16MP OmniVision OV16A10 अल्ट्रा वाइड-अँगल लेंस आणि 2MP चा OmniVision OV162B1B डेप्थ सेंसर असू शकतो. तसेच फ्रंटला 16MP चा प्राइमरी सेंसर आणि 8MP चा सेकेंडरी सेंसर असू शकतो. हे स्पेसिफिकेशन्स लीकच्या आधारावर सांगण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here