Apple iPhone XR - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 05 Feb 2020 15:28:42 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 प्रीमियम स्मार्टफोन कॅटगरी मध्ये OnePlus ची हवा, iPhone XR बनला बेस्टसेलिंग फोन https://www.91mobiles.com/marathi/counterpoint-report-oneplus-was-the-top-selling-premium-phone-brand-in-india-in-2019/ https://www.91mobiles.com/marathi/counterpoint-report-oneplus-was-the-top-selling-premium-phone-brand-in-india-in-2019/#respond Wed, 05 Feb 2020 15:28:42 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6520 भारतात ऍप्पलचा मार्केट शेयर 25 टक्के आहे.

The post प्रीमियम स्मार्टफोन कॅटगरी मध्ये OnePlus ची हवा, iPhone XR बनला बेस्टसेलिंग फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काउंटरपॉइंट रिसर्चने आपला एक नवीन रिपोर्ट सादर केला आहे, ज्यानुसार साल 2019 मध्ये भारतीय बाजारात प्रीमियम सेगमेंट मध्ये 29 टक्के वार्षिक वाढ नोंदवण्यात आली आहे. यात वनप्लसच्या शिपमेंट मध्ये 28 टक्के वार्षिक वाढ दिसली आहे. त्यामुळे असे म्हणता येईल कि भारतीय स्मार्टफेन मार्केटच्या प्रीमियम सेगमेंट मध्ये वनप्लसची हवा आहे.

इतकेच नव्हे तर रिपोर्टनुसार 2019 मध्ये आईफोन XR अल्ट्रा प्रीमियम सेगमेंटचा बेस्टसेलिंग स्मार्टफोन आहे. कंपनीने हा डिवाइस साल 2018 मध्ये भारतीय बाजारात लॉन्च केला होता जो भारतात लोकप्रिय ठरला. या रिपोर्टमुळे स्पष्ट झाले आहे कि आज पण भारतीय ग्राहकांना हा फोन आवडत आहे.

सॅमसंग दुसऱ्या क्रमांकावर आहे. कंपनीच्या प्रीमियम सेगमेंट शिपमेंट मध्ये 2 टक्क्यांची घाट झाली आहे. तरीही बाजाराचा 26 टक्के हिस्सा कंपनीच्या ताब्यात आहे तर तिसऱ्या स्थानावर Apple आहे. भारतात ऍप्पलचा मार्केट शेयर 25 टक्के आहे.

अलीकडेच एक दुसरा रिपोर्ट समोर आला होता, ज्यानुसार भारतात आता 50 कोटी पेक्षा जास्त लोक स्मार्टफोनचा वापर करत आहेत. यावर्षी 2018 च्या तुलनेत 15 टक्के वाढ झाली आहे. रिसर्च फर्म techARC ने एक रिपोर्ट जाहीर केला आहे. या रिपोर्टनुसार डिसेंबर 2019 पर्यंत इंडियन मार्केट मध्ये स्मार्टफोन यूजर्सची संख्या 502.2 मिलियन (50.22 कोटी) वर पोहोचली आहे. तसेच साल 2019 मध्ये स्मार्टफोन विक्रीच्या बाबतीत सॅमसंग टॉप वर राहिली आहे.

सॅमसंगचा मार्केट शेयर सर्वात जास्त 34 टक्के होता. तर दुसऱ्या क्रमांकावर वर शाओमी 20 टक्क्यांसह आणि वीवो तिसऱ्या नंबर वर 9 टक्क्यांसह पोहचली आहे. techARC चे फाउंडर आणि चीफ अनॅलिस्ट फैजल कउसा यांच्या मते ‘गेल्या काही वर्षांपासून फीचर फोन यूजर्स कमी प्रमाणात स्मार्टफोन कडे वळले होते. पण या वेळी स्मार्टफोन कडे जास्त ग्राहक पोहचले आहेत.

या रिपोर्ट नुसार भारतात जास्तीत जास्त यूजर्स आपला पहिला स्मार्टफोन बेसिक सेग्मेंट (5001 ते 10,000 रुपयांपर्यंत) मध्ये विकत घेण्यास पसंती देतात. 2019 मधील कंपन्यांच्या यूजर बेस बद्दल बोलायचे तर रियलमीच्या यूजर बेस मध्ये 49 टक्के, वीवोच्या यूजर बेस मध्ये 44 टक्के आणि वनप्लसच्या यूजर बेस मध्ये 41 टक्के वाढ झाली आहे.

The post प्रीमियम स्मार्टफोन कॅटगरी मध्ये OnePlus ची हवा, iPhone XR बनला बेस्टसेलिंग फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/counterpoint-report-oneplus-was-the-top-selling-premium-phone-brand-in-india-in-2019/feed/ 0
व्हॅलेंटाइन डे ची भेट, ऍप्पल आईफोन एक्सआर वर कंपनी देत आहे मोठी सूट https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-xr-price-discount-rs-5300-offline-stores-in-india-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-xr-price-discount-rs-5300-offline-stores-in-india-in-marathi/#respond Mon, 11 Feb 2019 14:25:20 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3601 आईफोन एक्सआर चे सर्व वेरिएंट्स डिस्काउंट सह अधिकृत स्टोर्स तसेच रिटेल चेन मधून विकत घेता येतील.

The post व्हॅलेंटाइन डे ची भेट, ऍप्पल आईफोन एक्सआर वर कंपनी देत आहे मोठी सूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ऍप्पल ने गेल्यावर्षी आईफोन 10एस आणि 10एस मॅक्स सारख्या महाग स्मार्टफोन्स सोबत आईफोन एक्सआर पण लॉन्च केला होता. हा आईफोनचा स्वस्त मॉडेल होता जो भारतात तीन वेरिएंट्स मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. व्हॅलेंटाइन च्या निमिताने तरुणांना आकर्षित करण्यासाठी ऍप्पल ने आपला हा मोबाईल आईफोन एक्सआर मोठ्या डिस्काउंट सह सेल साठी उपलब्ध केला आहे. ऍप्पल ने आईफोन एक्सआर च्या सर्व वेरिएंट्सच्या किंमतीती 5,300 रुपयांची कपात केली आहे ज्यामुळे व्हॅलेंटाइन डे पर्यंत आईफोन एक्सआर स्वस्तात विकत घेता येईल.

अशी आहे ऑफर
ऍप्पलने आईफोन एक्सआर च्या सर्व वेरिएंट्सच्या किंमती थेट 5,300 रुपयांनी कमी केल्या आहेत. या डिस्काउंट नंतर 76,900 रुपयांचा आईफोन एक्सआर चा 64जीबी स्टोरेज वेरिएंट 71,600 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 81,900 रुपयांचा आईफोन एक्सआर चा 128जीबी वेरिएंट 76,600 रुपये तसेच 91,900 रुपयांचा आईफोन एक्सआर चा 256जीबी स्टोरेज वेरिएंट 86,600 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

कधी आणि कुठून घ्यावा विकत
ऍप्पल ने आईफोन एक्सआर वर हा डिस्काउंट खासकरून व्हॅलेंटाइन डे साठी सादर केला आहे. आईफोन एक्सआर च्या सर्व वेरिएंट्स वर हा प्राइज कट आज पासून सुरु झाला आहे आणि व्हॅलेंटाइन ईव म्हणजे 13 फेब्रुवारी पर्यंत चालेल. आईफोन एक्सआर वर हि सूट कंपनी ने फक्त ऑफलाईन प्लॅटफॉर्म वरच दिली आहे. आईफोन एक्सआर चे सर्व वेरिएंट्स डिस्काउंट सह अधिकृत स्टोर्स तसेच रिटेल चेन मधून विकत घेता येतील.

ऍप्पल आईफोन एक्सआर
आईफोन एक्सआर पाहता हा फोन एलसीडी डिस्प्ले सह सादर केला गेला आहे. हा फोन नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. फ्रंट पॅनल वरील नॉच मध्ये सेल्फी कॅमेरा आणि 3डी सेंसर आहे. या फोन मध्ये 6.1-इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे जो 1729 X 828 पिक्सल रेज्ल्यूशन ला सपोर्ट करतो. फोन एल्युमिनियम फ्रेम सह ग्लास बॉडी वर बनला आहे जो प्रीमियम लुक देतो. फोनच्या डिस्प्ले ला कंपनी ने लिक्विड रेटिना डिस्प्ले नाव दिले आहे.

या व्हॅलेंटाईनला राहू नका सिंगल, हे 5 डेटिंग ऍप्स शोधून देतील तुम्हाला तुमचा सोबती

हा फोन कंपनी च्या ए12 बायोनिक चिपसेट वर चालतो. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता आयफोन एक्सआर च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर 12-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशनला सपोर्ट करतो. हा फोन पण बोके मोड आणि पोट्रेड मोड ला सपोर्ट करू शकतो. त्याचप्रमाणे फोनच्या फ्रंट पॅनल वर 12-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात फेस आईडी फीचर आहे.

The post व्हॅलेंटाइन डे ची भेट, ऍप्पल आईफोन एक्सआर वर कंपनी देत आहे मोठी सूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-xr-price-discount-rs-5300-offline-stores-in-india-in-marathi/feed/ 0
महाग आयफोन 10एस सोबत अॅप्पल ने आणाल स्वस्त आयफोन 10आर, यात आहे नॉच डिस्प्ले आणि फेस आईडी https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-xr-launched-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-xr-launched-feature-specifications-price-in-marathi/#respond Thu, 13 Sep 2018 07:52:22 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2113 आयफोन 10आर अॅप्पल ने या वर्षी लॉन्च केलेल्या आयफोन्स मध्ये एकमेव फोन आहे जो एलसीडी डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे.

The post महाग आयफोन 10एस सोबत अॅप्पल ने आणाल स्वस्त आयफोन 10आर, यात आहे नॉच डिस्प्ले आणि फेस आईडी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षी पण अॅप्पल ने आपल्या स्मार्टफोन सीरीज मध्ये एक साथ तीन मॉडल सादर केले आहेत. आयफोन 10एस आणि 10एस मॅक्स महाग आहेत त्याचबरोबर कंपनी ने एक स्वस्त मॉडेल सादर केला आहे. अॅप्पल ने आयफोन 10आर लॉन्च केला आहे. काही दिवसांपूर्वी या फोन बद्दल बातम्या आल्या होत्या. आयफोन 10आर अॅप्पल ने या वर्षी लॉन्च केलेल्या आयफोन्स मध्ये एकमेव फोन आहे जो एलसीडी डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. आयफोन 10 प्रमाणे हा फोन पण नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. फ्रंट पॅनल वरील नॉच मध्ये सेल्फी कॅमेरा आणि 3डी सेंसर आहे.

या फोन मध्ये 6.1-इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे जो 1729 X 828 पिक्सल रेज्ल्यूशन ला सपोर्ट करतो. फोन एल्युमिनियम फ्रेम सह ग्लास बॉडी वर बनला आहे जो प्रीमियम लुक देतो. फोनच्या डिस्प्ले ला कंपनी ने लिक्विड रेटिना डिस्प्ले नाव दिले आहे.

हा फोन कंपनी च्या ए12 बायोनिक चिपसेट वर चालतो. स्टोरेज पाहता आयफोन 10आर 64जीबी, 128जीबी आणि 256जीबी च्या दोन स्टोरेज आॅप्शन्स मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. जरी अॅप्पल ने फोन च्या रॅम चा उल्लेख केला नाही पण बातमी नुसार यात 3जीबी रॅम देण्यात आला आहे.

आयफोन 10आर च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर 12-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो आॅप्टिकल इमेज स्टेबलाइजेशनला सपोर्ट करतो. हा फोन पण बोके मोड आणि पोट्रेड मोड ला सपोर्ट करू शकतो. त्याचप्रमाणे फोनच्या फ्रंट पॅनल वर 12-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात फेस आईडी फीचर आहे.

आयफोन 10आर आईपी67 रेटिड आहे. हा फोन पण डुअल सिम ला सपोर्ट करतो तसेच हा वायरलेस पद्धतीने चार्ज केला जाऊ शकतो.

किंमत पाहता अॅप्पल ने आयफोन 10आर चा बेस वेरिएंट 749 यूएस डॉलर मध्ये लॉन्च केला आहे. फोनचा बेस वेरिएंट 64जीबी स्टोरेज ला सपोर्ट करतो ज्याची भारतीय करंसी नुसार किंमत 53,800 रुपये आहे. भारतीय यूजर आयफोन 10आर 19 ऑक्टोबर पासून प्री-आॅर्डर करू शकतील तसेच देशात हा फोन 26 ऑक्टोबर पासून सेल साठी उपलब्ध होईल.

The post महाग आयफोन 10एस सोबत अॅप्पल ने आणाल स्वस्त आयफोन 10आर, यात आहे नॉच डिस्प्ले आणि फेस आईडी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-xr-launched-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0