व्हॅलेंटाइन डे ची भेट, ऍप्पल आईफोन एक्सआर वर कंपनी देत आहे मोठी सूट

ऍप्पल ने गेल्यावर्षी आईफोन 10एस आणि 10एस मॅक्स सारख्या महाग स्मार्टफोन्स सोबत आईफोन एक्सआर पण लॉन्च केला होता. हा आईफोनचा स्वस्त मॉडेल होता जो भारतात तीन वेरिएंट्स मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. व्हॅलेंटाइन च्या निमिताने तरुणांना आकर्षित करण्यासाठी ऍप्पल ने आपला हा मोबाईल आईफोन एक्सआर मोठ्या डिस्काउंट सह सेल साठी उपलब्ध केला आहे. ऍप्पल ने आईफोन एक्सआर च्या सर्व वेरिएंट्सच्या किंमतीती 5,300 रुपयांची कपात केली आहे ज्यामुळे व्हॅलेंटाइन डे पर्यंत आईफोन एक्सआर स्वस्तात विकत घेता येईल.

अशी आहे ऑफर
ऍप्पलने आईफोन एक्सआर च्या सर्व वेरिएंट्सच्या किंमती थेट 5,300 रुपयांनी कमी केल्या आहेत. या डिस्काउंट नंतर 76,900 रुपयांचा आईफोन एक्सआर चा 64जीबी स्टोरेज वेरिएंट 71,600 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 81,900 रुपयांचा आईफोन एक्सआर चा 128जीबी वेरिएंट 76,600 रुपये तसेच 91,900 रुपयांचा आईफोन एक्सआर चा 256जीबी स्टोरेज वेरिएंट 86,600 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

कधी आणि कुठून घ्यावा विकत
ऍप्पल ने आईफोन एक्सआर वर हा डिस्काउंट खासकरून व्हॅलेंटाइन डे साठी सादर केला आहे. आईफोन एक्सआर च्या सर्व वेरिएंट्स वर हा प्राइज कट आज पासून सुरु झाला आहे आणि व्हॅलेंटाइन ईव म्हणजे 13 फेब्रुवारी पर्यंत चालेल. आईफोन एक्सआर वर हि सूट कंपनी ने फक्त ऑफलाईन प्लॅटफॉर्म वरच दिली आहे. आईफोन एक्सआर चे सर्व वेरिएंट्स डिस्काउंट सह अधिकृत स्टोर्स तसेच रिटेल चेन मधून विकत घेता येतील.

ऍप्पल आईफोन एक्सआर
आईफोन एक्सआर पाहता हा फोन एलसीडी डिस्प्ले सह सादर केला गेला आहे. हा फोन नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. फ्रंट पॅनल वरील नॉच मध्ये सेल्फी कॅमेरा आणि 3डी सेंसर आहे. या फोन मध्ये 6.1-इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे जो 1729 X 828 पिक्सल रेज्ल्यूशन ला सपोर्ट करतो. फोन एल्युमिनियम फ्रेम सह ग्लास बॉडी वर बनला आहे जो प्रीमियम लुक देतो. फोनच्या डिस्प्ले ला कंपनी ने लिक्विड रेटिना डिस्प्ले नाव दिले आहे.

या व्हॅलेंटाईनला राहू नका सिंगल, हे 5 डेटिंग ऍप्स शोधून देतील तुम्हाला तुमचा सोबती

हा फोन कंपनी च्या ए12 बायोनिक चिपसेट वर चालतो. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता आयफोन एक्सआर च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर 12-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशनला सपोर्ट करतो. हा फोन पण बोके मोड आणि पोट्रेड मोड ला सपोर्ट करू शकतो. त्याचप्रमाणे फोनच्या फ्रंट पॅनल वर 12-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात फेस आईडी फीचर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here