ASUS ROG Phone 2 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 23 Jul 2019 09:50:20 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 12जीबी रॅम, 6000एमएएच बॅटरी आणि स्नॅपड्रॅगॉन 855 प्लस सह लॉन्च झाला ASUS ROG Phone 2 https://www.91mobiles.com/marathi/asus-rog-phone-2-officially-launched-6000mah-battery-snapdragon-855-plus-120hz-amoled/ https://www.91mobiles.com/marathi/asus-rog-phone-2-officially-launched-6000mah-battery-snapdragon-855-plus-120hz-amoled/#respond Tue, 23 Jul 2019 09:50:20 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4872 कंपनीने फोनची किंमत सांगितली नाही पण पावरफुल स्पेसिफिकेशन्स हि ASUS ROG Phone 2 ची सर्वात मोठी यूएसपी आहे.

The post 12जीबी रॅम, 6000एमएएच बॅटरी आणि स्नॅपड्रॅगॉन 855 प्लस सह लॉन्च झाला ASUS ROG Phone 2 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ASUS ने आज टेक मंचावर आपल्या फ्लॅगशिप अंतर्गत ROG Phone 2 स्मार्टफोन सादर केला आहे. ROG म्हणजे Republic of Gamers. यावरून स्पष्ट होते कि हा फोन एक गेमिंग स्मार्टफोन म्हणून लॉन्च केला गेला आहे जो हाईएंड स्पेसिफिकेशन्स सह येतो. ASUS द्वारा लॉन्च हा लेटेस्ट डिवाईस आज चीनी बाजारात उतरवण्यात आला आहे जो आगामी काळात ग्लोबल मार्केट मध्ये येईल. कंपनीने फोनची किंमत सांगितली नाही पण पावरफुल स्पेसिफिकेशन्स हि ASUS ROG Phone 2 ची सर्वात मोठी यूएसपी आहे. चला एक नजर टाकू ROG Phone 2 च्या ताकदीवर.

स्नॅपड्रॅगॉन 855+

फोनच्या स्पेसिफिकेशन्सची सुरवात याच्या प्रोसेसर पासून करायची झाल्यास ROG Phone 2 जगातील टॉप स्मार्टफोन्स मध्ये सामील होतो जे क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 855 प्लस चिपसेट सह येतात. स्नॅपड्रॅगॉन 855 प्लस क्वालकॉमचा सर्वात नवीन आणि सर्वात जास्त पावरफुल फोन आहे. हा चिपसेट 4 कोरयो गोल्ड कोर आणि 4 कोरयो सिल्वर कोरने बनला आहे जो जीपीयू प्रोसेसिंग 15 टक्क्यांपर्यंत जास्त बूस्ट करू शकतो. तसेच फोन मध्ये 675मेगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वर काम करणारा एड्रेनो 640 जीपीयू आहे.

डिस्प्ले

ASUS ROG Phone 2 मध्ये 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.6-इंचाचा मोठा फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेची पिक्सल डेनसिटी 391पीपीआई आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेशरेट वर विजुअल देतो. त्याचबरोबर ROG Phone 2 चा डिस्प्ले पॅनल 10बिट एचडीआर ला सपोर्ट करतो.

रॅम व स्टोरेज

या पावरफुल गेमिंग फोन मध्ये प्रोसेसिंग अजूनच स्मूद करण्यासाठी कंपनीने ASUS ROG Phone 2 मध्ये 12जीबी चा दमदार रॅम दिला आहे. चीन मध्ये 12जीबी रॅम सोबत हा फोन 256जीबी इंटरनल मेमरी आणि 512जीबी इंटरनल मेमरीच्या दोन स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे.

फोटोग्राफी

ASUS ROG Phone 2 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल एलईडी फ्लॅश सह 48-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स586 सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 13-मेगापिक्सलचा सेकेंडरी वाइड-एंगल सेंसर आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन एफ/2.2 अपर्चर वाल्या 24-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

बॅटरी

ROG Phone 2 मध्ये पावर बॅकअप साठी ASUS द्वारा 6,000एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. फोनची बॅटरी 30वॉट ROG HyperCharge ला सपोर्ट करते जी 3A केबलने चार्ज करता येईल. विशेष म्हणजे या फोनची बॅटरी क्विक चार्ज 4.0 टेक्नॉलॉजीने पण चार्ज करता येईल.

The post 12जीबी रॅम, 6000एमएएच बॅटरी आणि स्नॅपड्रॅगॉन 855 प्लस सह लॉन्च झाला ASUS ROG Phone 2 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/asus-rog-phone-2-officially-launched-6000mah-battery-snapdragon-855-plus-120hz-amoled/feed/ 0
12जीबी रॅम असलेला ASUS फोन वेबसाइट वर लिस्ट, 23 जुलैला होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/asus-rog-phone-2-with-12gb-ram-snapdragon-855-listed-on-geekbench/ https://www.91mobiles.com/marathi/asus-rog-phone-2-with-12gb-ram-snapdragon-855-listed-on-geekbench/#respond Wed, 17 Jul 2019 15:41:17 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4820 इंडियन करंसीनुसार जवळपास 44,300 रुपये असेल. आता गीकबेंचच्या लिस्टिंग मध्ये ROG Phone 2 चे स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत.

The post 12जीबी रॅम असलेला ASUS फोन वेबसाइट वर लिस्ट, 23 जुलैला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ASUS ने गेल्यावर्षी गेमिंग स्मार्टफोन म्हणून ROG Phone सादर केला होता जो फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये आला होता आणि त्यात हाईएंड स्पेसिफिकेशन्स होते. कंपनी या फोनचा नवीन वर्जन घेऊन येणार आहे. आधीच बातमी समोर आली आहे कि कंपनी येत्या 23 जुलैला ASUS ROG Phone 2 टेक मंचावर लॉन्च करेल. हा फोन सध्या चीनी बाजारात सादर केला जाईल जो नंतर इतर मार्केट्स मध्ये सेल साठी उपलब्ध होईल. तसेच आज फोन लॉन्चच्या आधीच हा डिवाईस चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर पण लिस्ट झाला आहे.

ROG चा अर्थ Republic of Gamers. ASUS चा ROG Phone 2 पण गेमिंग डिवाईसच्या स्वरूपात येईल. अलीकडेच एक रिपोर्ट समोर आला होता ज्यात सांगण्यात आले होते कि असूस 23 जुलैला चीनच्या बिजिंग मध्ये ईवेंटचे आयोजन करेल आणि या ईवेंटच्या मंचावरून ROG Phone 2 टेक मंचावर सादर केला जाईल. लॉन्च डेटची माहिती देण्यासोबतच या रिपोर्ट मध्ये असे पण सांगण्यात आले होते कि हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च होईल ज्यातील एका वेरिएंटची किंमत 4,399 युआन म्हणजे इंडियन करंसीनुसार जवळपास 44,300 रुपये असेल. आता गीकबेंचच्या लिस्टिंग मध्ये ROG Phone 2 चे स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत.

लिस्टिंग डिटेल

गीकबेंच वर ASUS ROG Phone 2 ASUS_I001DC मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. याआधी हा फोन वाई-फाई अलायंस, एनसीसी आणि 3सी वेबसाइट वर पण याच मॉडेल नंबर सह समोर आला होता. सर्वात आधी गीकबेंच स्कोर बद्दल बोलायचे तर तिथे ROG Phone 2 ला सिंगल-कोर मध्ये 3616 स्कोर मिळाला आहे तर मल्टी-कोर मध्ये ROG Phone 2 ला 11103 स्कोर देण्यात आला आहे.

लिस्टिंग नुसार ASUS चा हा पावरफुल फोन क्वालकॉमच्या ताकदवान स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर लॉन्च केला जाईल. तर ROG Phone 2 एंडरॉयड 9.0 पाई आधारित असेल, सोबतच फोन मध्ये 12जीबी चा दमदार रॅम दिला जाईल. गीकबेंच वर फोन डिस्प्लेची माहिती तर नाही पण बेंचमार्किंग साइट वर असे समोर आले आहे कि ASUS ROG Phone 2 मध्ये 120हर्ट्ज रेट वाला नॉच नसलेला डिस्प्ले दिला जाईल.

स्पेसिफिकेशन्स

ASUS ROG Phone 2 पण गेमिंग डिवाईसच्या स्वरूपात बाजारात येईल. फोन बद्दल कंपनीने कोणतीही माहिती दिली नाही पण आतापर्यंत समोर आलेल्या लीक्स नुसार ROG Phone 2 दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाईल. या वेरिएंट्स मध्ये एक रॅम वेरिएंट 10जीबी रॅमला सपोर्ट करेल तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 12जीबी रॅम दिला जाऊ शकतो. तसेच फोन मध्ये 512जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते.

ASUS ROG Phone 2 एंडरॉयडच्या नवीन आपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9 पाई वर सादर केला जाऊ शकतो तसेच प्रोसेसिंग साठी फोन मध्ये क्वालकॉमचा सर्वात फास्ट आणि पावरफुल प्रोसेसर स्नॅपड्रॅगॉन 855 मिळू शकतो. या फोन मध्ये 120हर्ट्ज रिफ्रेश रेट वाला डिस्प्ले मिळू शकतो. त्याचबरोबर असूसच्या आगामी स्मार्टफोन मध्ये इंप्रूव गेम कूल सिस्टम, चांगला कॅमेरा आणि मोठ्या बॅटरी सह फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.

The post 12जीबी रॅम असलेला ASUS फोन वेबसाइट वर लिस्ट, 23 जुलैला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/asus-rog-phone-2-with-12gb-ram-snapdragon-855-listed-on-geekbench/feed/ 0