12जीबी रॅम, 6000एमएएच बॅटरी आणि स्नॅपड्रॅगॉन 855 प्लस सह लॉन्च झाला ASUS ROG Phone 2

ASUS ने आज टेक मंचावर आपल्या फ्लॅगशिप अंतर्गत ROG Phone 2 स्मार्टफोन सादर केला आहे. ROG म्हणजे Republic of Gamers. यावरून स्पष्ट होते कि हा फोन एक गेमिंग स्मार्टफोन म्हणून लॉन्च केला गेला आहे जो हाईएंड स्पेसिफिकेशन्स सह येतो. ASUS द्वारा लॉन्च हा लेटेस्ट डिवाईस आज चीनी बाजारात उतरवण्यात आला आहे जो आगामी काळात ग्लोबल मार्केट मध्ये येईल. कंपनीने फोनची किंमत सांगितली नाही पण पावरफुल स्पेसिफिकेशन्स हि ASUS ROG Phone 2 ची सर्वात मोठी यूएसपी आहे. चला एक नजर टाकू ROG Phone 2 च्या ताकदीवर.

स्नॅपड्रॅगॉन 855+

फोनच्या स्पेसिफिकेशन्सची सुरवात याच्या प्रोसेसर पासून करायची झाल्यास ROG Phone 2 जगातील टॉप स्मार्टफोन्स मध्ये सामील होतो जे क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 855 प्लस चिपसेट सह येतात. स्नॅपड्रॅगॉन 855 प्लस क्वालकॉमचा सर्वात नवीन आणि सर्वात जास्त पावरफुल फोन आहे. हा चिपसेट 4 कोरयो गोल्ड कोर आणि 4 कोरयो सिल्वर कोरने बनला आहे जो जीपीयू प्रोसेसिंग 15 टक्क्यांपर्यंत जास्त बूस्ट करू शकतो. तसेच फोन मध्ये 675मेगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वर काम करणारा एड्रेनो 640 जीपीयू आहे.

डिस्प्ले

ASUS ROG Phone 2 मध्ये 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.6-इंचाचा मोठा फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेची पिक्सल डेनसिटी 391पीपीआई आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेशरेट वर विजुअल देतो. त्याचबरोबर ROG Phone 2 चा डिस्प्ले पॅनल 10बिट एचडीआर ला सपोर्ट करतो.

रॅम व स्टोरेज

या पावरफुल गेमिंग फोन मध्ये प्रोसेसिंग अजूनच स्मूद करण्यासाठी कंपनीने ASUS ROG Phone 2 मध्ये 12जीबी चा दमदार रॅम दिला आहे. चीन मध्ये 12जीबी रॅम सोबत हा फोन 256जीबी इंटरनल मेमरी आणि 512जीबी इंटरनल मेमरीच्या दोन स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे.

फोटोग्राफी

ASUS ROG Phone 2 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल एलईडी फ्लॅश सह 48-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स586 सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 13-मेगापिक्सलचा सेकेंडरी वाइड-एंगल सेंसर आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन एफ/2.2 अपर्चर वाल्या 24-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

बॅटरी

ROG Phone 2 मध्ये पावर बॅकअप साठी ASUS द्वारा 6,000एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. फोनची बॅटरी 30वॉट ROG HyperCharge ला सपोर्ट करते जी 3A केबलने चार्ज करता येईल. विशेष म्हणजे या फोनची बॅटरी क्विक चार्ज 4.0 टेक्नॉलॉजीने पण चार्ज करता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here