Asus ZenFone 8 Flip - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 13 May 2021 12:00:32 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Asus ने आणला अनोखा फ्लिप कॅमेरा असलेला ZenFone 8 Flip, डिजाइन करेल तुम्हाला हैराण https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-8-flip-launch-price-features-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-8-flip-launch-price-features-specifications/#respond Thu, 13 May 2021 12:00:32 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10906 ZenFone 8 प्रमाणेच ZenFone 8 Flip मध्ये क्वालकॉमचा लेटेस्ट आणि सर्वात शक्तीशाली मोबाईल चिपसेट देण्यात आला आहे.

The post Asus ने आणला अनोखा फ्लिप कॅमेरा असलेला ZenFone 8 Flip, डिजाइन करेल तुम्हाला हैराण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ASUS ZenFone 8 सीरीजबद्दल अनेक दिवसांपासून लीक व माहिती समोर येत होती. आता यावर पूर्णविराम देत कंपनीने एक ग्लोबल लॉन्च इवेंटमध्ये ZenFone 8 आणि ZenFone 8 Flip सादर केला आहे. या दोन्ही फोन्सबद्दल बोलायचे झाले तर यात पावरफुल प्रोसेसर आणि मागे असलेला प्राइमरी कॅमेरा एकसारखा आहे. याव्यतिरिक्त या हँडसेटची डिजाइन आणि इतर फीचर्स वेगवेगळे आहेत. या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला अनोख्या डिजाइनसह आलेल्या ASUS ZenFone 8 Flip बाबत माहिती देत पाहतो. (Asus Zenfone 8 Flip launch price features specifications)

ASUS ZenFone 8 Flip ची अनोखी डिजाइन

हा फोन पाहिल्यावर तुम्हाला असूस झेनफोन 6 ची आठवण येईल. कंपनीने ZenFone 8 Flip मध्ये पण ZenFone 6 प्रमाणेच अनोखा फ्लिप कॅमेरा देण्यात आला आहे जो रियर आणि सेल्फी दोन्हीचे काम करेल. फोनमधील कॅमेरा मॉड्यूल या फोनला जगातील सर्व स्मार्टफोनपेक्षा वेगळा बनवते. पॉप-अप आणि स्लाइड आउट कॅमेऱ्याच्या पुढे असूसने पुन्हा एकदा आपल्या फोनमध्ये फ्लिप-अप सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनचा बॅक कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा एकच आहे. रियर कॅमेरा सेटअप फोनच्या बॅक पॅनलवर देण्यात आला आहे. हा सेटअप फ्लिप हिंजवर आहे. सेल्फीची कमांड देताच हा कॅमेरा सेटअप वर येतो आणि फ्रंट कॅमेऱ्याचे काम करतो. तसेच यात मोशन कंट्रोल पण आहे त्यामुळे कॅमेरा आपोआप फिरतो. कंपनीने हा ऑटो लेजर फोकस आणि डुअल एलईडी फ्लॅशने सुसज्ज केला आहे. कॅमेरा तुम्ही मॅन्युअली पण फिरवू शकता.

हे देखील वाचा : लो बजेटमध्ये लॉन्च झाला स्वस्त स्मार्टफोन Vivo Y12s 2021, बघा या फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

asus zenfone 8 flip

शानदार कॅमेरा

फोनमधील अनोखे कॅमेरा पाहता या कॅमेरा मॉड्यूलमध्ये तुम्हाला 64MP प्राइमरी कॅमेरा, 12MP अल्ट्रा-वाइड लेंस आणि 8MP चा टेलिफोटो कॅमेरा मिळेल जो 3x ऑप्टिकल झूमचे काम करेल. तसेच व्हिडीओ कॉलिंगसाठी पण या कॅमेऱ्याचा वापर करता येईल. इतकेच नव्हे तर Zenfone 8 Flip मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे.

प्रोसेसिंग पावर

ZenFone 8 प्रमाणेच ZenFone 8 Flip मध्ये क्वालकॉमचा लेटेस्ट आणि सर्वात शक्तीशाली मोबाईल चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 888 प्रोसेसरसह येतो. ग्राफिक्ससाठी फोनमध्ये Adreno 660 GPU देण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर फोनमध्ये 8GB RAM सह 256GB ची स्टोरेज देण्यात आली आहे. प्रोसेसिंग पावरनुसार फोन मार्केटमधील मोठ्या मोठ्या फोन्सना आव्हान सादर करेल.

Asus Zenfone 8 Flip

सुंदर डिस्प्ले

Zenfone 8 Flip मध्ये झेनफोन 8 च्या तुलनेत मोठा 6.67-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले FHD+ पिक्सल रेजोल्यूशन सपोर्टसह येतो. तसेच या फोनमधील 90Hz रिफ्रेश रेट आणि 1000 nits पीक ब्राइटनेस आहे.

हे देखील वाचा : Nubia लॉन्च करेल स्वस्त गेमिंग स्मार्टफोन Red Magic 6R, जाणून घ्या याची वैशिष्टये

पावरफुल बॅटरी आणि कनेक्टिविटी फीचर्स

स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी 30W फास्ट-चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी डुअल-सिम सपोर्ट, 5G, वाय-फाय 6, ब्लूटूथ v5.2, GPS, एक 3.5 मिमी ऑडियो जॅक आणि एक USB टाइप- C पोर्ट आहे.

किंमत

ASUS Zenfone 8 Flip कंपनीने ग्लेशियर सिल्वर आणि गॅलेक्टिक ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये सादर केला आहे. Zenfone 8 Flip EUR 799 (71,023 रुपये) मध्ये विकला जाईल. हि किंमत फोनच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलची आहे. झेनफोन 8 प्रमाणेच हा हँडसेट यूरोप आणि तैवानच्या बाजारांमध्ये प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध झाला आहे.

The post Asus ने आणला अनोखा फ्लिप कॅमेरा असलेला ZenFone 8 Flip, डिजाइन करेल तुम्हाला हैराण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-8-flip-launch-price-features-specifications/feed/ 0