Nubia लॉन्च करेल स्वस्त गेमिंग स्मार्टफोन Red Magic 6R, जाणून घ्या याची वैशिष्टये

Red magic 6

अपकमिंग Nubia Red Magic 6R स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स FCC वेबसाइटवर लीक झाले आहेत. हा गेमिंग फोन गेल्यावर्षी लॉन्च केल्या गेलेल्या RedMagic 6 चा टोन डाउन वेरिएंट असेल. लॉन्चपूर्वी आलेल्या Nubia Red Magic 6R स्मार्टफोनच्या लीक स्पेसिफिकेशन्सनुसार, हा फोन 8GB RAM, 128GB स्टोरेज आणि Bluetooth 5.2 आणि Bluetooth LE सपोर्टसह 4,100mAh बॅटरीसह सादर केला जाऊ शकतो. या गेमिंग स्मार्टफोनच्या चार्जिंग स्पीडबद्दल लीक रिपोर्ट्समध्ये वेगवेगळे दावे केले जात आहेत. काही रिपोर्टमध्ये दावा केला जात आहे कि हा फोन 30W फास्ट चार्ज सपोर्टसह येऊ शकतो. तर काही मध्ये दावा केला जात होता कि यात 40W फास्ट चार्जला सपोर्ट दिला जाऊ शकतो. विशेष म्हणजे 3C च्या लिस्टिंगमध्ये समोर आले आहे कि हा गेमिंग स्मार्टफोन 55W फास्ट चार्जला सपोर्ट करू शकतो. (Nubia Red Magic 6R specifications leaked ahead of launch check details)

Nubia Red Magic 6R स्मार्टफोनच्या डिजाइनबद्दल सध्या अधिकृत माहिती शेयर करण्यात आली नाही. समोर आलेल्या काही चित्रांमध्ये या स्मार्टफोनची डिजाइन समोर आली आहे, ज्यात मागे चार कॅमेरा सेंसर दिसत आहे. कॅमेरा सेटअपसह मोठा फ्लॅश मॉड्यूल दिसत आहे.

हे देखील वाचा : 15 मे नंतर WhatsApp मध्ये होतील हे मोठे बदल, Privacy Policy मान्य न केल्यास होईल मोठे नुकसान

Nubia Red Magic 6R स्मार्टफोनच्या नावावरून समजत आहे कि हा फोन Red Magic 6 पेक्षा कमी किंमतीत सादर केला जाऊ शकतो. नुबियाच्या या अपकमिंग गेमिंग स्मार्टफोनबाबत बोलले जात आहे कि हा फोन हाई रिफ्रेश रेट डिस्प्लेसह सादर केला जाऊ शकतो. लीक रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे कि Red Magic 6R स्मार्टफोनमध्ये 165Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले पॅनल दिला जाऊ शकतो. शक्यतो या फोनमध्ये 120Hz किंवा 144Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले दिला जाऊ शकतो.

हे देखील वाचा : लो बजेटमध्ये लॉन्च झाला स्वस्त स्मार्टफोन Vivo Y12s 2021, बघा या फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

Red Magic 6R स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 870 चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो. सध्या अनेक स्मार्टफोन कंपन्या आपला फ्लॅगशिप स्मार्टफोनचे टोन डाउनवेरिएंट R, S किंवा Lite नावाने सादर करत आहेत. बोलले जात आहे कि Red Magic 6R स्मार्टफोन येत्या काही दिवसांत सादर केला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here